विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 June 2019

**..छञपती शिवराय महाराजांचे परराष्ट्रधोरण..**

**..छञपती शिवराय महाराजांचे परराष्ट्रधोरण..**
महाराजांचे परराष्ट्रधोरण ठरवताना काही विशिष्ठ मुलभुत बाबी लक्षात घेत असत त्या म्हणजे
1) हेरखाते- धोरण ठरवताना प्रत्येक शाहीच्या हालचाली,त्यांची आर्थिक स्थीति,कमकुवत बाजु आणी महत्वाचे म्हणजे त्यांची सर्वात मोठी जमेची बाजु.या सर्व बाबी हेरखात्याकडुन सविस्तर मिळाल्यानंतरच त्या शाहीशी कोणत्या पद्धतिचे धोरण अवलंबयाचे हे ठरवत असत.या इत्यंभुत महत्वपुर्ण माहितीवरुनच कोणत्या शाहिशी मैञी करायची व कोणत्याशी वैर करायचे हे ठरवत.या हेरखात्यामुळेच महाराज एक मोहिम फत्ते केली की तात्काळ वेळ न दडवता दुसरी मोहिम उघडत असत
2) मुत्सद्दी - दुसरा टप्पा म्हणजे हेरखात्याच्या माहितीवरुन त्या शाहिशी कोणते धोरण वापरणे यावर मुत्सद्दी लोकांचे मत घेणे .
3) वकिल- ठरवलेले धोरण प्रत्यक्षात राबवणारा व्यक्ती.हा मुत्सद्दी आणी महाराजांच्या विश्वासातिल असे. स्वराज्यहितासाठी पाहिजे तसे धोरण प्रत्यक्षात विरोधकाच्या गळी उतरवणारा व्यक्ती.याचे कसब सर्वात महत्वाचे असे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आफजल खान स्वराज्यावर चालुन आल्यानंतर त्याला प्रत्यक्ष विरोध न करता वकिलाचे कसब वापरुन मैञीचा संदेश देउन प्रतापगडाखाली येण्यास भाग पाडले आणी नंतर प्रत्यक्ष भेटीनंतर त्याचा वार झाल्यानंतर त्याला उसंत न मिळु देता त्याच्या सैन्यासकट त्याचा खात्मा केला
4) रयत - महाराज हे धोरण राबवताना "रयत" हा केँद्रबिँदु असे. रयतेला जे हितकारक असे/ रयतेला ञास होणार नाही याच पद्धतीने परराष्ट्रधोरण राबवले जात असे .
5) गनिमिकावा - महाराजानी युद्धात जसा अप्रतिम गनिमीकावा वापरला तसाच गनिमीकावा परराष्ट्र धोरण राबवताना राजकारण व नातेसंबधाचा केला.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वत: दक्षिणेत युद्धात अडकले असता स्वराज्यावर मोगल आक्रमणाची भिती असता युवराज संभाजी महाराजाना प्रत्यक्ष मोगलाकडे पाठवण्याचा गनिमीकावा केला,त्यामुळे एकतर मोगलाची आक्रमणाची धार बोथट झाली तसेच स्वराज्यातील हितशञु लक्षात आले आणी विशेष वेळ मिळाला.म्हणजे गनिमीकाव्याचा या धोरणात उत्तम वापर करवुन घेतला.
6) स्वराज्यातील मावळे - हा परराष्ट्रधोरणाचा महत्वपुर्ण भाग होय.एखाद्या शाहिने जर मैञीपुर्ण परराष्ट्रधोरणाचे नियम तोडले तर त्याला क्षणाचाही वेळ न देता धोरणात बदल करुन प्रत्यक्ष अमलबजावनी करणारा विभाग म्हणजे मावळा.
7)दुरद्रूष्टीत्व = परराष्ट्रधोरण ठरवताना स्वराज्यासाठी काय फायदेशीर राहिल त्यानुसार दुरद्रुष्टीपणे विचार करुन लगेच अमंलबजावनी करणे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुरतेवरील आक्रमण.मोगलानी मैञीपुर्ण धोरणाचे उल्लंघन करुन रयतेची लुट मांडल्यानंतर परराष्ट्रधोरणात बदल करुन स्वराज्यासाठी धनाची गरज पाहुन गनिमीकावा वापरुन सुरतेवर आक्रमण केले व मोगलावर दहशत निर्माण केले.
8) महाराजांच्या परराष्ट्रधोरनात चंचलता म्हणजे बदल होतात असे इतिहासकारांचे लेखन आढळते परंतु आपण अभ्यासक द्रुष्टीने पाहिल्यानंतर असे लक्षात येते कि ज्या शाहिनी परराष्ट्रधोरणाचे उल्लंघन केले नाही त्यांच्यावर महाराजानी कधिही आक्रमण केले नाही आणी ज्याने धोरणाचे उल्लंघन केले त्यावर तात्काळ विनाविलंब आक्रमण केले याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुतुबशहा.ज्याने धोरणाचे उल्लंघन केले नाही त्यावर आक्रमण केले नाही परंतु मोगल,आदिलशहा आणी इंग्रज यानी परराष्ट्रधोरणाचे उल्लंघन केले त्यावेळी शिवरायानी त्यांच्यावर आक्रमणच केले ....खरोखरच आपण सुक्ष्म रितिने अभ्यास केल्यावर असे लक्षात येईल कि महाराजानी वापरलेले परराष्ट्रधोरणातच त्यांच्या यशाचे गमक आहे आणी या धोरणात आपल्या समस्त उत्क्रुष्ट बाबीँचा खुबीने वापर करुन यश मिळवणे.म्हणुनच खुप कमी कालावधीत त्यानी मराठ्यांच्या स्वराज्याचा विस्तार केला पुन: असा राजा होणे नाही.....छञपती शिवराय महाराजाना मानाचा ञिवार मुजरा !! एक आवाज एकच पर्याय जय जिजाऊ जय शिवराय !!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...