विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 June 2019

!! चौथ व सरदेशमुखी !!

!! चौथ व सरदेशमुखी !!
चौथ व सरदेशमुखी वसुलीची सुरुवातच छत्रपती शिवराय महाराज यानी चालु केलेली आहे. एकंदरीत जमीनमहसुलाचा एक चतुर्थांश भाग त्या त्या प्रदेशाने शिवराय महाराजाना द्यावा लागे आणी त्या बद्दल शिवराय महाराज आपले सैन्य तेथे ठेऊन परशत्रुपासुन त्या प्रदेशाचे संरक्षण करत असत.असा हा चौथ करार होता....आणी विशेष हा कर वसुल करण्यासाठी शिवरायानी कधी कोणत्या बादशहाची परवानगी किंवा सनद मिळवली नव्हती किंवा यासाठी प्रयत्नही केला नव्हता.....ते मोगल, आदिलशाही आदींच्या प्रदेशातुन हा चौथाई कर व सरदेशमुखी बिनदिक्कतपणे जमा करत होते......हा शिरस्ता पुढे छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती राजाराम महाराज ,छत्रपती ताराबाईसाहेब यानी देखिल चालवलेला आहे,तसेच तीच परंपरा थोरले छत्रपती शाहु महाराज यानी देखिल १७ वर्षे औरंगजेबाच्या कैदेत राहिल्यानंतर सुटुन आल्यानंतर देखिल हाच चौथ व सरदेशमुखी वसुलीचा शिरस्ता इ सन १७०८ पासुनच वसुल करण्यास प्रारंभ केलेला दिसुन येतो,यास कोणाच्याही परवानगीची गरज त्याना भासली नाही की आड आली नाही....उलट थोरले छत्रपती शाहु महाराज यानी छत्रपती शिवराय महाराज यांच्या पुढे एक पाऊल टाकुन इ सन १७०८ पासुनच मोगलाच्या सहा प्रांतातुन चौथ व सरदेशमुखी वसुली तर केलीच परंतु या प्रांतात सरंक्षणाच्या नावाखाली प्रत्येक १०० मैलावर एक गढी स्थापन करुन त्या प्रांतात एक चौथ वसुली अधिकारी,एक सरदेशमुखी अधिकारी व एक रहदारी कर वसुली अधिकारी ठेऊन तेथील वसुली व सरंक्षणाचा जिम्माही स्वतःच उचलुन मराठा स्वराज्याच्या विस्ताराची मुहुर्तपेढच स्वतःच घालुन दिलेली आहे.....आणी या मोगल प्रांतात इ सन १७०८ पासुनच आपल्या सरदाराना इनाम,मोकासा व सरंजाम देखिल देऊन टाकलेले दिसुन येतात.......म्हणजे आजोबा छत्रपती शिवराय महाराजांच्या पुढे नातु थोरले छत्रपती शाहु महाराज यानी पाऊल टाकुन मराठा स्वराज्याच्या विस्ताराची मुहुर्तपेढ स्वतःच रोवलेली दिसुन येते.....म्हणुनच थोरले छत्रपती शाहु महाराज याना मराठा स्वराज्याचे विस्ताराचे जनक म्हटले जाते.
विशेष वयाच्या ८-९ वर्षी कैद झालेले छत्रपती शाहु महाराज यांचे पुढील १७ वर्षे आयुष्य ओरंगजेबाच्या कैदेत गेले आसताना देखिल सुटुन आल्यापासुन सातारात राज्याभिषेक करेपर्यंत सतत युद्धास स्वतः सामोरे जाऊन मराठा सरदार जोडुन मराठा स्वराज्याची घडी व्यवस्थीत स्थापन केलेली दिसुन येते. सुटून आल्यानंतर लगेच आजोबानी चालु केलेली चौथ व सरदेशमुखी कर वसुली चालु केली आणी हे संस्कार शाहु महाराज कैदेत आसताना माता येसुसाईसाहेब यानीच दिलेले दिसुन येतात,याचे संपुर्ण श्रेय येसूबाईसाहेबानाच जाते कारण कैदेत असुन देखिल यानी शाहु महाराजांवर छत्रपती शिवराय महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तुत्वाचे संस्कार केलेले दिसुन येतात........ या कार्यात सुटुन येत आसताना रायभानजीराजे भोसले,पिलाजीराव जाधवराव,कान्होजी शिर्के,रुस्तुमराव जाधवराव,ज्योत्याजी केसरकर आदी मराठा सरदार मंडळी होती.पुढे त्याना येऊन मिळालेल्या सरदारात परसोजी व साबाजी भोसले,सुजानसिंह रावल,हैबतराव निंबाळकर,खंडो बल्लाळ ही मंडळी होत......खेडच्या रणसंग्रामात सरसेनापती धनाजीराव जाधवराव हे देखिल येऊन मिळाले आणी त्यानी स्वतंत्र गादीचे स्थापनेचे मुहुर्त केला . आणी १२ जानेवारी १७०८ लाच राज्याभिषेक करवुन घेऊन सातारा ही राजधानी जाहीर केली .याच सालापासुन त्यानी मराठा स्वराज्याचा आरंभ चालु केलेला दिसुन येतो....परंतु मराठी इतिहासकार मात्र मराठा स्वराज्याचा विस्ताराचा प्रारंभ हा इ सन १७१९ सांगतात, हे साफ चुकिचे आहे. तसेच इ सन १७१३ साली बाळाजी विश्वनाथ याना पेशवाची वस्त्रे दिली गेली.... सुरुवातीस छत्रपती शाहु महाराज यांचे मूख्य सल्लागार हे रायभानराजे भोसले हे होत,नंतर यांच्या म्रुत्युनंतर मात्र मुख्य सल्लागाराची भुमिका ही पिलाजीराव जाधवराव यानी पार पाडलेली दिसुन येते...........

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...