विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 19 June 2019

धाडसाची परिसीमा - आग्र्याहून सुटका

धाडसाची परिसीमा - आग्र्याहून सुटका
शिवाजी महाराज आग्र्याहून कसे सुटले,काय युक्त्या वापरल्या हे सारे आपण अनेक पुस्तकात,लेखात आजवर वाचले असेल पण शिवाजी महाराज कसल्या भयानक संकटातून सुटले याची कल्पना आपल्यापैकी कोणालाच नसेल.
शिवाजी महाराज कोणत्या दिव्यातून सुटले हे सांगणे केवळ अशक्य होय.
औरंगजेब अतिशय खुनशी बादशहा होता.मोगली लेखकांनी आणि कवींनी त्याच्या विरतेची अनेक वर्णने लिहली आहेत मात्र त्याच्या शृंगारिक कल्पना,क्रूरता आणि मोगली राजगादीचा हव्यास कोणास ठाऊक सुद्धा नसेल.
औरंगजेब 89 वर्षे जगला.दीर्घायुषी औरंगजेब अखेर महाराष्ट्रातच गेला.अहमदनगर जिल्ह्याजवळ भिंगार गावी तो मेला.शत्रूच्या मुंडक्यांचे मिनार रचणाऱ्या बादशहाला शेवटी महाराष्ट्राच्या मातीतच जागा मिळाली.त्याच्या सत्तेवर येण्याची क्रूरकथा ज्यांना माहीत आहे त्यांनाच शिवाजी महाराजांच्या धाडसाची आणि बुद्धीचातुर्याची पुरती जाण असेल.
औरंगजेबाचे वडील शहाजहान याने त्याचा थोरला मुलगा म्हणजे औरंगजेबाचा थोरला भाऊ दारा शुकोह याला सत्तेवर येण्याची तरतूद पूर्ण केली होती.दारा शुकोह हा हिंदुधर्माचा द्वेष्टा बिलकुल नव्हता. त्याने हिंदू-मुस्लिमऐक्यावर दोन संस्कृतीचा मिलाफ अश्या आशयाचा ग्रंथ सुद्धा लिहून ठेवला आहे.मचमूह-अल-बेहरिन हे या ग्रंथाचे नाव.बेहर म्हणजे समुद्र,दोन संस्कृतीचे मिलन असा याचा अर्थ होतो.कित्येक हिंदू मुस्लिम वाद मिटवण्यासाठी तो वादसभा घ्यायचा.त्याने आपल्या उपनिषदांचे फारसी भाषेत भाषांतर सुद्धा केले आहे त्याचे नाव त्याने "अल्लोपनिषध" असे दिले आहे.
शेख सरमद नावाचा त्याचा एक गुरू होता त्याच्याशी तो नेहमी हिंदू धर्मातील अनेक गोष्टीवर चर्चा करत असे.
या शेख सरमदाचे मुंडके सुद्धा औरंगजेबाने परत तोडले.
उत्तरेत सामुगड जवळ औरंगजेब विरुद्ध दारा शुकोह लढाई झाली ,या लढाईचा निष्कर्ष केवळ दिल्ली तख्तावर कोण बसणार हाच होता.अखेर या लढाईत दारा शुकोह पळून गेला.पळताना त्याच्या डोक्यावरचा किमांश पडला जो कोणीतरी औरंगजेबाकडे आणून दिला.
औरंग्या व दारा चा अजून एक भाऊ होता त्याचे नाव मुरादबक्ष.या मुराद ला औरंग्या ने सांगितले की दारा ला मारल्यानंतर बादशहा तूच व्हायचे.तुला मी बादशहा करतो.त्यामुळे सामुगड येथे मुराद ने जीवतोड लढाई करून दारा ला पळवून लावला.
आत्ताच्या पाकिस्तानात म्हणजे पूर्वीच्या अखंड हिंदुस्थानात असणारे भक्कड आणि पक्कड हे दोन जुळे किल्ले आहेत यात दारा ने आसरा घेतला मात्र दारा ला जीवन मलिक नावाच्या औरंगजेबाच्या फितूर सरदाराने पकडला आणि औरंग्या च्या ताब्यात दिला.
दिल्लीत खिजरबाग नावाची एक बाग आहे.अल्लाउद्दीन खिलजी चा एक मुलगा होता त्याचे नाव खिजरखान होते.त्याने ही बाग वसवली म्हणून याचे नाव खिजरबाग असे ठेवले आहे.या बागेत दारा व त्याचा मुलगा सुलेमान शुकोह याला ठेवला.
नजर बेग चिला नावाचा औरंग्या चा एक गुलाम होता.दारा शुकोह ला मारण्यासाठी औरंग्या ने शुभ मुहूर्त काढला आणि या नजर बेग ला दारा ला मारायला पाठवले.
खिजरबागेत दारा शुकोह ला समजले की आज आपला मृत्यू ठरलेला आहे.दारा चा मुलगा सुलेमान नजर बेग च्या आडवा गेला आणि वडिलांच्या अगोदर मला मारा असे म्हणाला मात्र नजरबेग ने त्याला ढकलून दिले आणि दारा खाली पाडून त्याच्या छातीवर पाय दिला.हातपाय बांधले आणि त्याचे मुंडके कट्यारीने भाजी चिरतो तसे चिरून बाजूला काढले.
हसत हसत ते मुंडके सुलेमान ला दाखवत तो औरंगजेबाकडे गेला.
संध्याकाळ च्या वेळेत औरंग्या बागेत बसला असताना हा नजरबेग चिला दारा शुकोह चे म्हणजे शहाजहान बादशहा च्या थोरल्या चिरंजीवांचे आणि औरंग्या च्या सख्ख्या थोरल्या भावाचे मुंडके घेऊन आला.
औरंग्या ने ते मुंडके पाहिले,त्याच्या नाकातून ओठातून येणारे रक्त पुसायला लावले.संध्याकाळ होती म्हणून चिरागदान आणायला लावले आणि चिरागदाण्याच्या लख्ख प्रकाशात ते मुंडके पाहू लागला.
सामुगड लढाईत सापडलेले किमांश त्याने मागवले आणि त्या मुंडक्यावर बसवून बघितले की बसते का.
बघा..किती शंकेखोर, क्रूर आणि हरामखोर होता हा औरंगजेब.
स्वतःच्या भावाला सुद्धा शंकेखोर पद्धतीने मेल्यावर सुद्धा वागणूक देत होता.
विचार करा शिवाजी महाराजांना आग्ऱ्यात असेच दारा शुकोह सारखे मारायचे नियोजन औरंगजेबाने केले होते.कल्पना करा महाराज कसल्या मोठ्या संकटात होते.
आणि अश्या महाक्रूर,महा शंकेखोर औरंगजेबाच्या तावडीतून शिवाजी महाराज सहीसलामत सुटले,अगदी बरोबर नेलेले हत्ती घोडे आणि सर्वच्या सर्व माणसे जिवंत परत घेऊन महाराज महाराष्ट्रात परतले.
विचार करा हे कसले धाडस, कसले बुद्धी चातुर्य...
यामागे एकच प्रेरणा होती ती म्हणजे तुम्ही जर धर्माच्या नावावर आमची मुंडकी उडवत असाल तर आमच्या देवतांच्या माळेत नरमुंड माळा आहेत व आम्हीही तिचेच भक्त आहोत.तुला भिऊन मृत्यूची वाट बघणारे आम्ही कालीचे भक्त नाही आहोत...तुझ्या मृत्यूचे कारण आम्ही होणार हे मात्र नक्की.
महाराजांच्या याच विचाराने ते प्रत्येक जीवघेण्या संकटातून सुटत होते,जिंकत होते.
शिवचरित्रातून आपल्याला शिकायचे आहे तर हे शिकायचे आहे.
"जास्तीत जास्त share करा"
बहिर्जी.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...