विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 19 June 2019

"शिवकन्या राणुआक्का

"शिवकन्या राणुआक्का यांचा भुईंज येथील वाडा "राणुआक्का या शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या द्वितीय कन्या. राणुआक्का म्हणजे प्रेम, त्याग ,समर्पण, ह्यांचा अखंडपणे वाहणारा झराच जणु .राणु आक्कांचा जन्म इ.स.1651 मधे राजगडावर झाला.इ.स.1660 मधे जिजाऊ माँसाहेब व शिवाजी महाराज यांनी राणुआक्का यांचा विवाह सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर एक वर्षांनी राजगडावर लावून दिला.राणुआक्का यांचा विवाह शिंदखेडचे अचलोजी जाधवराव यांच्याशी लावून दिला.जाधवरावांच्या घरी राणुआक्का देऊन जिजाऊ माँसाहेबांनी आपले माहेर तर शिवाजी महाराजांनी आपले आजोळ नव्या नात्याने जवळ केले.पुणे सातारा महामार्गावर भुईंज या गावी सिंदखेडकर लखुजी जाधवरावांचे वंशज राहतात. निजामशाहाने लखुजी जाधवरावांच्या मुला नातवासहीत त्यांची हत्या केली ,त्या नंतर सर्व जाधवराव महाराष्ट्रात विखुरले गेले. यांची प्रमुख घरे भुईंज, माळेगाव, वाघोली ,परिंचे येथे स्थायिक झाली
या प्रमुख घरापैकी भुईंज हे घर .येथेच राणुआक्का यांचे वास्तव्य होते.आजही भुईंज येथील वाडा इतिहासाच्या पाऊलखुणां जपत मोठ्या दिमाखात उभा आहे.राणुआक्का यांचे वंशज भैय्या साहेब जाधवराव तेथे वास्तव्यास आहेत
          "  शिवकन्या राणुआक्का यांना
                   मानाचा मुजरा "

No comments:

Post a Comment

दुष्काळ आणि शिवाजी महाराज...

  दुष्काळ आणि शिवाजी महाराज... महाराष्ट्रात वारंवार दुष्काळ पडल्याचे अनेक पुरावे इतिहासात आढळतात. शिवपूर्वकाळ ते शिवाजी महाराजांच्या काळापास...