!!!... सरसेनापती संताजी घोरपडे ...!!!
सरसेनापती संताजी घोरपडे यांचा अत्युच्य पराक्रम - दोड्डेरीची लढाई.
दोड्डेरी हे आज महाराष्ट्रात असंख्य लोकांना ठाऊक नाही. हे कुठे आहे, येथे काय घडले व त्याचा काय परिणाम झाला हे कुणालाच माहित नाही.
मराठे व मोगल ( औरंगजेब ) यांच्यामधील ५० वर्षाच्या संघर्षाचे आणि मराठ्यांच्या स्वराज्याच्या स्वातंत्र्ययुद्धाचे एक अत्यंत तेजस्वी, अजोड प्रकरण येथे घडले.
इ. स. १६९५ च्या ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात सेनापती संताजी घोरपडे यांनी जिंजीकडे केलेली कूच अडविण्यासाठी मोगल सैन्याने त्यांची तलाकू येथे वाट अडवली. येथे 3 दिवस झालेल्या युद्धात मोगलांचा दारुण पराभव झाला. पराभवाने घाबरलेले मोगल सरदार व सैनिक आश्रयासाठी तलाकू पासून ९ मैलांवर असलेल्या दोड्डेरी गावाकडे धावले व तेथील गढीत त्यांनी आश्रय घेतला. सेनापती संताजी घोरपडे यांनी मोगल सैन्याचा पाठलाग करून त्यांना दोड्डेरीच्या गढीत कोंडले व त्यांना मिळणाऱ्या मदतीच्या व रसदेच्या वाटा बंद करून टाकल्या.
कोंढले गेलेल्या सरदारांत मोठे मात्तबर लोक होते. औरंगजेबाचा १ मंत्री आणि त्याच्या मावसबहिणीचा नातू रुहुल्लाखान, दुसरा उलखानाजादखान, औरंगजेबाच्या तोफखान्याचा प्रमुख सफशिकखान, सरदार महंमद मुरादखान, डाकियाचा राजा दलपतराय गुंडेदार याचा मुलगा रामचंद व विजापुरातील कर्नाटकचा सुभेदार सय्यद कासीमखान हाही गढीत कोंडला गेला होता. सुभेदार सय्यद कासीमखान याला अफूचे व्यसन होते याने तेथे आत्महत्या केली पण हि आत्महत्या विष पिऊन केली का अफू खाऊन केली हे मात्र काळात नाही. १५ दिवसांत गढीत कोंडलेल्या सर्वांचे मराठ्यांनी रसद बंद केल्यामुळे उपासमारीने हाल होऊ लागले होते.
गढीतील उपासमार असह्य झाल्यामुळे मोगलानी सेनापती संताजींना शरण जाण्याचा मार्ग पत्करला.
यामुळे चिडून जाऊन औरंगजेबाने आपले ३ सरदार त्यांच्या मदतीसाठी दक्षिणेत पाठवले. सरदार हिंमतखान, सरदार हमीदउद्दीन खान व हैद्राबादच्या सुभेदाराचा मुलगा रुस्तुमदिलखान. पण सैन्य थोडे म्हणून हिंमतखानाला दोड्डेरीवर चाल करून जाण्याची हिम्मत होत नव्हती.
हिंमतखान कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील बसवापट्टण येथे थांबला तसेच हमीदउद्दीन खानालाही पुढे जाणे जमले नाही. मराठी सैन्याच्या भीतीमुळे रुस्तुमदिलखान सुद्धा मुंगीच्या पावलांनी हैद्राबाद पासून पुढे सरकू लागला. शेवटी कोठूनच मदत मिळत नाही म्हंटल्यावर मोगलानी सेनापती संताजी यांच्या बरोबर तहाची बोलणी सुरु केली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने रायगडला वेढा घातला. युवराज राजाराम रायगडावरून वेळेवर निघून पन्हाळगडा मार्गे जिंजीला पोहोचले. या दरम्यान जवळपास २ लाखांच्या वर मुगल सैन्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरले होते. युवराज राजाराम महाराज जिंजीला गेल्या मुळे औरंगजेबाला मोठी फौज जिंजीकडे पाठवणे भाग पडले. महाराणी येसूबाई, सकवारबाई साहेब व युवराज शाहू हे मोगलांच्या कैदेत सापडले होते.
अशा परिस्थितीत मराठ्यांचे नेतृत्व हे ज्या मुत्सद्दी सरदारांकडे आले होते ते म्हणजे धनाजी जाधव, संताजी घोरपडे, रामचंद्रपंत अमात्य, व इतर.
मराठ्यांनी मोगलांविरुद्ध गनिमीकाव्याचा वापर करून मोगलांकडून किल्ले परत घेण्याचा सपाट चालवला होता. गनिमीकाव्यात शत्रूची रसद तोडणे, मार्ग बंद करणे, खजिना लुटणे, धावपळीची लढाई लढणे हे प्रकार वापरले.
पण उलट हल्ला करून मोगलांचा दणदणीत प्रभाव करण्याची प्रचंड कामगिरी संताजी घोरपडे यांनी करून दाखवली. त्यांच्या पराक्रमाचा काळ अवघा सात वर्षाचा सन १६९० ते १६९७. पण ह्या सात वर्षात त्यांनी मोगलांचे जवळपास १२ सेनापती लोळविले होते.
पन्हाळगडाच्या लढाईत मुकर्रबखान, सातारच्या लढाईत सर्जाखान, रायबाग हुक्केरीच्या लढाईत जान निसारखान व तहब्बूरखान, कांजीवरमच्या लढाईत अली मर्दानखान, जिंजीच्या लढाईत जुल्फिकारखान, दोड्डेरीच्या लढाईत सय्यद कासीमखान व खानाजादखान, बसवापट्टणच्या लढाईत हिंमतखान, हमीदुद्दीनखान, सफशिकनखान, रुस्तुमखान अशी हि काही नावे आहेत. संताजींच्या ह्या लागोपाठ विजयांमुळे आणि इतर मराठा सरदारांनी चालविलेल्या धामधुमीमुळे मोगलांचे नीतिधैर्य खचू लागले. विजापूरच्या औरंगजेबाच्या छावणीपासून तामिळनाडच्या जिंजीपर्यंतच्या मार्गात सत्तर हजार मराठे घोडेस्वार पसरले होते. याला त्याकाळचे काही समकालीन इतिहासकार ग्वाही देतात.
तहाची बोलणी सुरु असताना सेनापती संताजी यांनी मोगलांना १ महत्वाची अट घातली ती म्हणजे - प्रत्येक मोगल सरदाराने मातबर ( भरपूर ) खंडणी भरावी लागेल. तसेच मोगल सैनिक व सरदार यांना सुटका व जीवनदान पाहिजे असेल तर सर्व मोगल सैन्याने त्यांचा सारा सरंजाम, वस्त्रे, अलंकार, तंबू-राहुट्या, जनावरे, आणि प्रत्येका जवळ असणारे किडूकमिडूक हे सर्व मराठ्यांच्या हवाली करावे .
या अटी पत्करून मोगलांचे सैन्य दोड्डेरीच्या गढीतून बाहेर पडले. सर्व मोगल सैन्याची अवस्था हि निर्वासितांन सारखी झाली होती. मोगल सैन्य माघारी परतत असताना वाटेत हिंमतखान, हमीदुद्दीनखान आणि अघोनीचा किल्लेदार ह्यांनी या मोगल सैन्याला वस्रे-प्रावरणे, घोडे, ओझी वाहणारे उंट, आणि खर्चास पैसे अशी मदत करुन त्यांना औरंगजेबाच्या छावणीकडे नेले. म्हणजेच सोलापूर जिल्ह्यातील भीमाकाठच्या ब्रह्मपुरीकडे पोहचवले.
सेनापती संताजी यांच्या हाती हि जी खंडणी लागली ती कमीत कमी ६५ लाख रुपयांची होती असा समकालीन इतिहासकारांचा अंदाज आहे. ( त्या रुपयांचे मूल्य पाहता त्या काळचे ६५ लाख म्हणजे आज किती होतील ह्याची कल्पना करा ).
मराठे व मोगल यांचे युद्ध हे साधारणपणे इ. स. १६५६ मध्ये सुरु झाले. एकीकडे मराठ्यांचे स्वराज्य रक्षण व स्वराज्य विस्तराचे ध्येय तर दुसऱ्या बाजूला मोगलांचे साम्राज्य विस्तार करण्याचे ध्येय असा अटीतटीचा सामना होता. महत्वाचे म्हणजे हे युद्ध जवळपास ५० वर्षांनी औरंगजेबाच्या मृत्यूनेच संपले आणि दुसरी गोष्ट हि कि शेवटची २६ वर्ष स्वतः औरंगजेब हा दक्षिणेत उतरून मराठ्यांन विरुद्धच्या मोहिमेची सूत्रे हलवत होता यावरून मराठे व मोगल यांच्यातील संघर्ष किती मोठा व महत्वाचा होता हे लक्षात येते.
या जवळपास ५० वर्षाच्या काळात मराठा स्वराज्याची हानी काही कमी झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ५३ व्या वर्षी मृत्यू, छत्रपती संभाजी महाराज यांचा अत्यंत क्रूरपणे करण्यात आलेला वध, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मपत्नी सकवारबाई साहेब ( गायकवाड घराण्यातील ) महाराणी येसूबाई व युवराज शाहू महाराज ह्यांच्या नशिबी आलेली मोगलांची कैद, छत्रपती राजाराम महाराज यांचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू, अंतर्गत कलहातून सेनापती संताजी यांचा वध अशी प्रचंड किंमत मराठ्यांना मोजावी लागली होती. परंतु औरंगजेब मृत्यू होण्याच्या अगोदर पासून मराठ्यांनी पुन्हा एकदा मोगलांच्या ताब्यातील किल्ले जिंकून परत मिळवण्यास सुरवात केली होती. या नंतर मराठ्यांनी गुजरातमध्ये प्रवेश करून नर्मदा ओलांडून माळव्यात घुसले होते या मुळे मोगल साम्राज्यालाच धोका निर्माण झाला होता. हा मराठ्यांचा सगळा इतिहास स्फुर्तीदायक आहे. पण ह्या संघर्षातील दोड्डेरी येथे मिळवलेला विजय म्हणजे मराठ्यांच्या अजोड व प्रचंड विजयाची व पराक्रमाची स्तिमित करून सोडणारी घटना आहे.
#मराठा_मोगल_संघर्ष
#शिवराय_असे_शक्तीदाता
#सेनापती_संताजी_घोरपडे
#आमच_इमान_रायगडाच्या_मातीशी
रेफरन्स - सेतुमाधवराव पगडी, डॉ. जयसिंगराव पवार, सर जदुनाथ सरकार
संकलन संतोषराजे गायकवाड

No comments:
Post a Comment