विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 26 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 20

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 20
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांची कारकीर्द.--------------------------------5
दौलतराव शिंदे उत्तर हिंदुस्थानांत गेले, त्या वेळी त्यांच्या सैन्याची पूर्वीची शिस्त सर्व बिघडली होती; व सर्व लष्करी सरदारांमध्ये परस्परांचा मत्सर व द्वेष हे दुष्ट ग्रह उत्पन्न झाले होते. ज्या वेळी डी बॉयन ह्या फ्रेंच सरदाराने शिंद्यांच्या नौकरीचा राजीनामा दिला, त्या वेळीं फक्त त्याच्या एकट्याच्या हाताखाली २४००० पायदळ, ३०००३१ घोडेस्वार व १२० तोफा इतके जय्यद सैन्य होते. डी बॉयन ह्याच्या मागून पेरन हा त्या सैन्याचा अधिपति झाला. त्याच्या ताब्यांत चंबळा नदीपासून पतियाळापर्यंत सर्व शिंद्यांचा प्रांत होता. परंतु त्याचें व लखबादादाचे वैर उत्पन्न होऊन शिंद्यांच्या सैन्यामध्ये फूट झाली. व हीच फूट शेवटी शिंद्यांची उत्तर हिंदुस्थानांतील सत्ता व स्वातंत्र्य हीं संपुष्टात आणायास कारणीभूत झाली. दौलतराव शिंदे ह्यांस बालपणापासून लष्करी शिक्षण नसल्यामुळे व त्यांनी स्वतः कधीं सेनापतीचे काम केले नसल्यामुळे, त्यांना सैन्याची व्यवस्था कशी करावी ह्याचे विशेष ज्ञान नव्हते. त्यामुळे त्यांना निरनिराळ्या अधिका-यांवर अवलंबून राहून, त्यांच्या तंत्राने चालण्या-2 वांचून गत्यंतर नव्हते. परंतु त्यांस तारुण्याची उमेद व अभिमान विशेष असल्यामुळे, जुन्या लोकांचे अनुभवही केव्हां केव्हां त्यांना अप्रिय वाटत असत. त्यांची विशेष प्रवृत्ति डामडौल व बाह्य देखावा ह्यांकडे फार असे. हीच प्रवृत्ति त्यांच्या नाशास कारण झाली. ह्या संबंधाने अशी एक गोष्ट प्रसिद्ध आहे कीं, दौलतराव शिंदे ह्यांनी उत्तर हिंदुस्थानांत जातांच, प्रथम उज्जनी एथे आपली टोलेजंग छावणी बांधण्याचा निश्चय केला. त्या वेळी गोपाळरावभाऊ नामक एका जुन्या सरदाराने भर दुरबारामध्ये त्यांची कानउघाडणी केली. त्यांनी सांगितले की, ज्या आमच्या वाडवडिलांनी मराठी राज्य स्थापन केले, त्यांनीं घोड्याच्या पाठीवर आपली घरे केली होती. ह्मणजे ते रात्रंदिवस घोड्यावर स्वार होऊन कालक्रमणा करीत असत. परंतु हळूहळू पुढे घोड्याच्या पाठीवरील घरे जाऊन, त्याऐवजी कापडाची घरे ह्मणजे तंबू डेरे वगैरे अस्तित्वांत आली; आणि आता तुह्मी मातीची घरे बांधून लष्कराची छावणी उभारीत आहां. परंतु हे लक्ष्यांत ठेवा कीं, ही छावणी अल्पकाळांत मातीमोल किंमतीची होईल. दौलतराव शिंदे ह्यांनी हे भाषण३२ ऐकून किंचित् स्मित केले, व त्यांस उत्तर केलें कीं, माझ्याजवळ एवढी प्रचंड पायदळ फौज व भरभक्कम तोफखाना असतांना, माझ्याशीं कोण टक्कर देणार आहे ??? त्या वेळी ह्या वयोवृद्ध सरदाराने उत्तर दिलें कीं, 4 हीच पायदळ फौज व ह्याच तोफा तुमच्या नाशास कारण होतीले ! " तीच गोष्ट पुढे अक्षरशः अनुभवास आली. असो.Image may contain: one or more people and outdoor

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...