सिद्दी जौहर आणि शिवराय यांचा संघर्ष
भाग 2
भाग 2
■ सिद्दी जौहर स्वराज्य विघाताकडे : -
जौहर आला , स्वराज्याच्या रोखाने , वाटेत कत्तल करत , लुटमार करत आला . त्यावेळेस राजे , मिरजेच्या आदिलशाही ठाण्यास वेढा घालून बसले होते , त्यांना जेव्हा बातमी मिळाली , जौहर जवळ आलाय ,
तेव्हा राजांनी वेढा उठवून , पन्हाळ्याकडे माघार घेतली .
सिद्दी जौहर हा स्वराज्यात शिरतच होता , तेव्हा त्यास खबर लागली कि , " शिवाजी महाराज हे पन्हाळ्यात मात्र
३ ते ४ हजार फौझेनिशी आहेत " . सिद्दी आणि त्याचे हशम , पन्हाळ्याच्या दिशेने चाल करू लागले , दि. २ मार्च १६६० , राजे दुर्ग पन्हाळ्यावर सिद्दीच्या वेढ्यात अडकले .

● शाहिस्तेखानाची स्वारी : -
राजे सिद्दीविरुद्ध रणनीती , आखत होते ; परंतु शास्ताखान ७७ हजार फौझेनिशी , हिंदवी स्वराज्यावर चालून आला . शास्ताखान म्हणजे खुद्द औरंगजेबाचा उजवा हातच , एक मातब्बर सेनापती . ह्याचे मूळ नाव , " अबू तालिब " होते , तर " शाईस्तेखान " , हा किताब होता . उत्तरेकडून शास्ता आणि दक्षिणेतून जौहर असा दुहेरी लढा , शिवरायांच्या वाटेला आला होता , परंतु राजे निर्भयपणे आव्हान स्वीकारलं होतं .

■ सिद्दी जौहरचा चक्रव्यूह : -
दुर्ग पन्हाळ्यावर शिवराय , जौहरच्या वेढ्यात अडकले होते , जौहर अतिशय तापट , कडक शिस्तीचा , त्याने वेढा अतिशय कडक केला , एवढंच काय , तर मुंगीलाही दुर्गात प्रवेश करायला वा दुर्गातून बाहेर जायला मार्ग दिला नाही .
सिद्दी जौहरने , वेढा
हा चार विभागात विभागला होता , ते खालीलप्रमाणे : -

◆ पूर्वेस = खुद्द जौहर , आणि फाजलखान ;
◆ पश्चिमेस = सिद्दी मसूद , आणि बाजी घोरपडे ;
◆ उत्तरेस = भाईखान , आणि सादातखान ;
◆ दक्षिणेस = रुस्तुमे झमान , आणि बडेखान .

तसेच जौहरने , पन्हाळ्याच्या सर्वत्र भागात त्याचे हेर पसरविले होते , जेणेकरून सर्वच बाबींवर नजर राहील .
■ शिवराय आणि मराठे : -
राजे सिद्दीच्या प्रत्येक बारीक , हालचालींवर नजर ठेवत होते , सिद्दी खूप सावध आणि चाणाक्ष आहे , हे राजांनी पुरते ओळखले होते . राजे सुद्धा , वेढा खरच कडक आहे कि नुसता दिखावा आहे हेही तपासत होते , परंतु वेढा हा खूपच कडक होता . रात्री ८ - १० मावळे खाली उतरायचे , पण पहाऱ्यात दक्षता असल्यामुळे , हशमांकडून मारले जायचे . असा दोन ते तीनदा प्रयत्न झाला ; परंतु विफलचं झाला . त्यावेळी राजांबरोबर दुर्गावर , रणवीर बाजीप्रभु देशपांडे , महावीर कुडतोजी गुजर , तसेच बाजीप्रभूंचे बंधूही होते .

No comments:
Post a Comment