विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 August 2019

सिद्दी जौहर आणि शिवराय यांचा संघर्ष भाग 3

सिद्दी जौहर आणि शिवराय यांचा संघर्ष 
भाग 3
● शिवराय आणि शिवा : -
शिवा काशिद , हा व्यक्ती
पन्हाळगडावर राजांबरोबर होता , शिवा हा नाभिक समाजातील असून , हा मूळचा नेबापूर गावचा होता .
शिवा हा चतुर , बहुश्रुत , तसेच बातम्या काढण्यात पटाईत होता , आणि शस्त्राचे उत्तम ज्ञान होते . राजांनी पन्हाळा जिंकल्यानंतर , शिवा न्हावी त्यांच्या नजरेत आला , व त्यांनी त्यास ठेवून घेतला , ह्याचे प्रभावी कारण म्हणजे , " शिवा हा हुबेहब राजांसारखा दिसत होता " . राजांनी शिवा काशीदचे हे गुण पाहून त्याची हेरखात्यात नेमणूक केली होती .
■ सिद्दीची रणनीती : -
आदिलशाही फौझेने किल्ल्याला ,
वेढा उत्तम घातलेला , आता सिद्दीने पन्हाळगडाच्या भोवतीचा फास आवळायची सुरुवात केली , किल्ल्यावर
तोफांचा हमला सुरू केला , वास्तविक आदिलशाही तोफांची मर्यादा कमी होती , त्यामुळे किल्ल्याचे नुकसान कमी होत होते . मराठे वरून काहीही प्रतिकार करत नव्हते , राजे बिनघोर होते कारण किल्ला बेलाख होता , सिद्दी जौहरने आपल्या विश्वासू सरदारांना बोलवून घेतले , आणि पुढची रणनीती ठरविली . दुसरा दिवस उजाडला
तोफांचा किल्ल्यावर सुरु झाला , पहिलाच तोफगोळा प्रभावीरित्या दुर्गावर पडला , राजे बुरुजांवर येऊन बघतात तर काय टोपीकरांनी घात केला , त्यांनी सिद्दीस लांब पल्ल्याच्या तोफा व दारूगोळा दिला होता , ह्या तोफांमुळे मराठ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या , इकडे राजे पाहत होते ते , " सरनौबत नेतोजींची " !!!! सिद्दी कडवा हमला करत होता .
पन्हाळगडावरून खबर देखील बाहेर पडणे ,
देखील कठीण झाले होते , एकदे जिजाऊमांसाहेबांच्या चिंता वाढल्या होत्या , त्यांनी सरनौबतांना खलिते सुद्धा पाठविले होते , परंतु नेतोजींनी त्याचा काहीही तात्काळ जबाब पाठविला नव्हता .....
● नेतोजींचा गनिमी कावा : -
सरनौबत नेतोजींनी , एक
विलक्षण रणनीती आखली होती , विजापूरात फौज कमी
प्रमाणात होती , त्यामुळे विजापूरात जोरदार हमला करायचा ; परिणामी राजधानीच्या रक्षणाकरीता , जौहरला मागे फिरायला लागेल , आणि राजांची वेढ्यातून सुटका होईल , योजनाही अप्रतिम होती , ठरल्याप्रमाणे सर्वकाही होत होते , नेतोजींनी आक्रमण जोरदार केले , खुद्द अली - आदिलशहा आणि बड्या बेगमेस घाम फुटला ; परंतु ऐनवेळेस बादशहाला , हेरांकडून खबर मिळाली नेतोजीकडे फौज कमी आहे , ह्याचाच फायदा घेऊन , गोवळकोंड्याच्या ताज्या दमाच्या फौझेनिशी , खवासखान हा सेनापती , नेतोजींवर चालून आला , परिणामी नेतोजींना माघार घ्यावी लागली , डाव फसला .....
● माँसाहेब आणि सरनौबत : -
सरनौबत विजापूरहून ,
माघार घेऊन लगोलग , राजधानी राजगडावर आले .
सरनौबत नेतोजी पालकर येत आहेत अशी वर्दी माँसाहेबांना मिळाली , नेतोजी जिजाऊसाहेबांपुढे आले ,
जिजाऊ नेतोजींस म्हणाले , सरनौबत कुठं मुलुखगिरी
करून आलेत , नेतोजी खालच्या आवाजात हळूवारपणे
म्हटले , ' विजापूर ' ; पुन्हा जिजाऊ म्हणाल्या , " सरनौबत , आपला राजा चक्रव्यूहात अडकलाय आणि तुम्ही मुलुखगिरी करता , सरनौबतांचे प्रथम कर्तव्य काय ? तुम्हांस जर हे कर्तव्य पार पाडता येत नसेल तर आम्ही पन्हाळगडावर चालून जाऊ , आणि शिवबांना वेढ्यातून मुक्त करू " , ह्यावर नेतोजी बोलते झाले , माँसाहेब थोडं एकूण घ्या , आणि नेतोजींनी वरील सर्व योजना [ विजापूर स्वारी संदर्भात ] जिजाऊंना संगीतिली , व शेवटी हळूवार म्हटले , माँसाहेब पन्हाळ्यावर चालून जाण्याआधी आमची गर्दन मारा , आणि मग जा , आम्ही असताना जर आपणांस मोहिमेवर जावयास लागले तर आमचा उपयोग तरी काय ? नेतोजींचं बोलणं ऐकून , जिजाऊंचं मन भरून आलं , आणि जिजाऊमाँसाहेबांनी नेतोजींच्या खांद्यावर हात ठेऊन म्हटल्या , " जा नेतोजीराव आपल्या धन्याला
सुखरूप घेऊन या " , नेतोजी मुजरा करून तडख दुर्ग
पन्हाळादिशेने गेले .
सिद्दी जौहर साठी इमेज परिणाम

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...