सिद्दी जौहर आणि शिवराय यांचा संघर्ष
भाग १
भाग १
मार्गशीष शुद्ध सप्तमी , दि. १० नोव्हेंबर १६५९ , गुरुवारी मध्यानाला , छत्रपती शिवाजी महाराजांनी ,
विजापूर दरबारचा महाबली अफजलखान ह्याचा , दुर्ग
' प्रतापगड ' , येथे वध केला . अफजलवधामुळे सर्वत्र
शिवरायांची दहशत पसरली , राजांनी ह्याच हुकमी संधीचा फायदा घायचा ठरविला ,आणि त्याच रात्री प्रतापगडावरून जलद वेगाने हिंदवी स्वराज्याच्या कमानीतून ३ बाण सुटले , प्रथम सरदार दोरोजीराव ( ह्यांनी कोकण मारले , दाभोळ मुलुख जिंकला ) , सरनौबत नेतोजी पालकर ( ह्यांनी टिकोटा लुटला , पार विजापूरपर्यंत मजल मारली , प्रचंड लूट केली ) , व दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापूर प्रांतात स्वारी केली , देशावर चाकण मारलं , मिरजेला वेढा घातला . दि. २८ नोव्हेंबर १६५९ , अफजलवधानंतर नीव्वल १८ दिवसांत राजांनी पन्हाळा जिंकला , प्रचंड दहशत !!!! दुर्ग पन्हाळा हा आदिलशाहीची दक्षिणेतील उपराजधानी होता , पन्हाळा ताब्यात असणे म्हणजे कोकणात गोव्यापर्यंतचा व देशावर बेळगाव
धारवाडपर्यंतचा प्रदेश जरबेत असणे , असे त्या शतकातले राजकीय गणित होते .

अफजलवधामुळे शिवरायांची दखल सर्वत्र घेतली जाऊ लागली , मुघल बादशहा औरंगजेब सुद्धा हबकला .
ह्याचा परिणाम असा झाला कि भविष्यामध्ये , " भारतात कुठेही लढाई झाली , तर त्याचा शिल्पकार शिवाजीच असेल " , असे धूर्त पोर्तुगीज म्हणत असत . महाराजांच्या ह्या अद्वितीय पराक्रमामुळे हिंदवी स्वराज्य खऱ्या अर्थाने साकारू लागले .

अफजलवधामुळे आदिलशाहीतील सरदार ,
अमीर - उमरावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची चांगलीच जरब बसली होती , असाच एकदा विजापूरात शाही दरबार भरला असता , बडी बेगम बोलती झाली , " इस दरबार में कोई , मर्द बचा है कि नही ? " , सर्व दरबार शांत होता . तेवढ्यात एका कोपऱ्यातून हळूवारपणे आवाज आला जौहर ! ! ! ! आदिलशहा म्हणाला , " कर्नूल का सिंह , सिद्दी जौहर " , बडी बेगमही विचारात पडली , तात्काळ रुस्तुम झुम्याला एक १२ हजाराची फौज देऊन स्वराज्यावर चाल करून जावयास सांगितले , वास्तविक त्याचा काही फायदा झाला नाही ; कारण राक्षसीवृत्ती असणारा क्रूर अफजलखान दस्तुरखुद्द शिवरायांपुढे अपयशी ठरला होता , आणि पुढे तसेच झाले , रुस्तुम झमान मार खाऊन परतला .

■ सिद्दी जौहर : -
रुस्तुमझम्याच्या पराभवानंतर आदिलशहाच्या आणि बड्या बेगमेच्या पुढे सिद्दी जौहर हाच एकमात्र पर्याय उरला होता , बादशहाने सिद्दीस तातडीने , विजापुरास बोलावून घेतले . अलीआदिलशहाने सिद्दी जौहरास , " सलाबतखान " हा किताब दिला , मोठा नजराणा दिला , आणि स्वराज्यावर चालून जायला सांगितले , जौहरच्या दिमतीला २० हजार घोडदळ , ३५ हजार पायदळ , ४० तोफा अशी फौज , तसेच रुस्तुम झमान , फाजलखान , सिद्दी मसूद ( जौहरचा जावई ) , बाजी घोरपडे असे नामचीन सेनानी दिले . सिद्दी जौहर हा महाधूर्त आणि कसलेला सेनापती होता , " कर्नूलचा सिंह " , असा त्याचा नावलौकिक होता , तो हेरांकडून मिळालेल्या बातम्यांवर त्याच्या मोहिमांची रणनीती ठरवीत असे , आणि विशेष म्हणजे तो फारच शिस्तप्रिय होता , ठरलेल्या योजनेत त्यास काडीमात्र बदल तो जुमानत नसे आणि त्याच्याशी जो गद्दारी करायचा त्याची मान तो स्वतः धडावेगळी करायचा , हा अफजखानाप्रमानेच दैत्य होता .

No comments:
Post a Comment