विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 August 2019

सिद्दी जौहर आणि शिवराय यांचा संघर्ष भाग 4

सिद्दी जौहर आणि शिवराय यांचा संघर्ष 
भाग 4
■ सरनौबतांचे आक्रमण : -
सरनौबत नेतोजी पालकर ,
जोरदार वेगाने , राजगडावरून पन्हाळगडाच्या रोखाने
गेले , नेतोजी दुर्गाच्या जवळ आले होते , मराठ्यांनी आदिलशाही हशमांवर जोरदार आक्रमण केले , सिद्दी जौहरही हबकला ; परंतु जौहरच्या योग्य योजनाबद्ध
हमल्यामुळे नेतोजींस मागे फिरावे लागले . राजांस ,
या घटनेचे खूप दुःख झाले , इकडे सिद्दीच्या छावणीत
आनंदाचे वातावरण होते , कारणच असे होते , " मराठ्यांच्या सरसेनापतीस माघार घ्यावी लागली होती " .
आता शिवरायांपुढे अडचणी वाढल्या होत्या , परंतु ह्यावर राजांनी मार्ग काढला , राजांनी विलक्षण योजना आखली होती , ती अशी कि जौहरच्या सैन्यावर दुहेरी हल्ला करायचा , एका बाजूने नेतोजीराव आणि दुसऱ्या बाजूने
गडातून खुद्द शिवरायांच्या नेतृत्वाखाली मावळे सिद्दीवर तुटून पडतील . ठरल्याप्रमाणे सरनौबत नेतोजींनी हल्ला केला ; परंतु सिद्दी मसूदने पराक्रम दाखवीत मराठ्यांची कत्तल सुरू केली , मराठेही तीव्र प्रतिकार करत होते ,
घनघोर युद्ध सुरू होते , पण सरशी आदिलशाही हशमांची
होत होती , मराठ्यांनी पळ काढला , अचानक शूरवीर मराठा सरदार सिद्दी हलाल ह्यांचा पुत्र सिद्दी वाहवाह , हा
मागे राहिला , आणि आदिलशाही फौझेच्या ताब्यात सापडला , मराठ्यांना सिद्दी वाहवाह ह्यांचा देह सुद्धा मिळाला नाही , नेतोजींनी सिद्दी हिलालचे सांत्वन केले , त्यावर सिद्दी हिलाल नेतोजींस म्हटले , " राव मुलगा गेला
ह्याचे खूप दुःख झाले ; परंतू राजांची सुटका नाही झाली
ह्याची सल आयुष्यभर राहील " . शिवरायही दुखी होते .
■ शिवरायांचा गनिमीकावा : -
" शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ " ,
हे तत्वचं खरे , आता शिवरायांनी आपला डाव टाकला ,
राजांनी आपला वकील , गंगाधरपंत ह्यास सिद्दी जौहरच्या छावणीत पाठविला , राजे वकीलामार्फत असे म्हणतात कि , ' अलिअदिलशाहा आपले सर्व गुन्हे माफ करीत असेल तर आपण जिंकलेला सर्व मुलुख दुर्गांसाहित परत देऊ ' , असा प्रस्ताव पाठविला . गंगाधरपंतांनी उत्तम काम बजावले , सिद्दी मनोमन खुश झाला , त्याने तर सर्वत्र मिठाई वाटायला सांगितली . जे कार्य अफजलखानास जमले नाही , ते आपण करून दाखविले त्यामुळे तो आनंदी झाला . ह्या बातमीने आदिलशाही फौझेत उत्साह निर्माण झाला , आणि वेढा थोडा थंडावला .
जुलै १६६० , च्या प्रथम आठवड्यातला हा प्रकार , राजांनी डाव उत्तमच टाकला होता , आता राजांनी एके रात्री आपल्या हेरास एक गुप्तखलिता घेऊन , राजधानी राजगड येथे , आऊसाहेबांकडे पाठविले , खलित्यात गुप्तमजकूर असा होता कि , " आऊसाहेब , आम्ही येथून परवाच निघणार , फौज पांढरेपाणी गावाजवळ पोहचवा " . जिजाऊमाँसाहेबांनी लगोलग तजबीज केली , त्यांनी
पांढरेपाणी गावाजवळ ३०० बांदल मावळा जमा केले ,
( सिद्दीचे हेर सर्वत्र त्याने पेरले होते , आणि बांदल ह्यांनी
त्या परिसरातील सर्व गुप्तवाटा ठाऊक होत्या , म्हणून बांदल सैन्याची निवड झाली होती ) . जिजाऊंनी आपली
भूमिका चोख बजावली होती . शिवरायांस जसे हवे होते ,
तसे होत होते .संबंधित इमेज

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...