सिद्दी जौहर आणि शिवराय यांचा संघर्ष
भाग 5
शिवरायांनी शिवा काशीद , व बाजीप्रभू देशपांडे , यांस सर्व योजना समजावून सांगितली , योजना ही ,
३ मुख्य चरणात विभागली होती , ती खालीलप्रमाणे : -

● चरण - १ = दि. १२ जुलै १६६० ला , पन्हाळगडावरून
रात्री ( साधारणतः १० ते ११ वाजल्यानंतर ) , २ पालख्या
निवडक ५०० मावळे निघाले . एका पालखीमध्ये खुद्द ,
राजे होते , यांबरोबर ३०० मावळा व नरवीर बाजीप्रभू
होते , हि पालखी घोडखिंडीजवळून विशालगडाच्या
【खेळणा दुर्ग】 रोखाने जाणार होती . , तर दुसरी पालखी त्यात शिवा काशिद , शिवाजी महाराजांच्या वेशात , राजांच्या पोशाखात होता , दिमतीला २०० मावळा , मलकापूरच्या मार्गे रोखाने जाणार होती , हा सिद्दीच्या हेरांना चकवा देण्याकरिता महाराजांचा कावा होता .

● चरण - २ = घोडखिंडीजवळ असलेल्या पांढरेपाणी ह्या
गावातील ३०० हत्यारबंद बांदलांना घेऊन बाजीप्रभूंनी , पाठलाग करणाऱ्या , आदिलशाही फौझेस रोखायचे होते .

● चरण - ३ = विशालगडावर जाऊन किल्ला ताब्यात घेऊन लढाई करीता , तयार राहणे [ विशेष किल्ल्याच्या मागच्या मार्गाच्या जवळ आऊसाहेबांनी ३०० ते ४००
राखीव फौज तयार ठेवली होती .
राखीव फौज तयार ठेवली होती .
■ रणसंग्राम : -
१२ जुलै चा दिवस उजाडला , दिवसभर राजे योजना तपासून पाहत होते , कारण एक बारीकशी
चूक जीवावर बेतनार होती , रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र
केलं , राजांनी शिवा काशिद यास मिठी मारली , आणि
म्हटलं , " शिवा विशाळगडावर भेटायचं आहे " , शिवाने राजांस मनापासून हसत मुजरा केला .

राजे साध्या वेशात घोंगडी पांघरून पालखीत बसून निघाले , शिवाही पालखीत बसून निघाला , त्यावेळी गडाची जबाबदारी गुजर ह्यांवर होती , दोन्ही पालखींनी थंडाविलेला वेढा पार केला , ठरलेल्या योजनेनुसार राजे विशालगडाच्या रोखाने , तर शिवा मलकापूरच्या रोखाने जाऊ लागले .
मलकापूरच्या दिशेने पालखी , हत्यारबंद सैनिकांशी जात आहे हि , खबर मध्यरात्री सिद्दी जौहर ह्यास हेरांकडून मिळाली , जौहरने तात्काळ सिद्दी मसूद यास , त्या पालखीच्या मागावर पाठविले , सिद्दी जौहरने लगेचच सर्व सरदारांना छावणीत बोलाविले , त्यावेळी छावणीत बाजी घोरपडे , भाईखान , सादातखान , रुस्तुमे झमान , बडेखान , आणि सरदार सावंत होते . सिद्दी मसुदने शिवा ह्यास शिवाजी महाराज समजून छावणीत आणले , सिद्दी जौहर ह्याने शिवरायांस याआधी पाहिले
नव्हते हे शिवास पुरते ठाऊक होते , त्याने सोंग वटवायला सुरुवात केली , बातचीत केली , त्यावेळी छावणीत कोणालाच संशय आला नाही , शिवाने नाटकच तसे केले होते , तेवढ्यातच फाजलखान (अफजलखानाचा पुत्र) छावणीत आला , आल्या आल्या त्याने शिवाला प्रश्न विचारला , " तुम कौन हो ? " , शिवाने आत्मविश्वाने उत्तर दिले , " आम्ही शिवाजी राजे भोसले आहोत " , फाजलखान म्हणाला ठीक आहे .छावणीत तर सर्वांचीच खात्री झाली होती , शिवाजी गिरफ्तार हो गया , अपवाद फाजलखान . फाजलखानास माहित होते कि , अफजलखान आणि शिवाजीराजांची जेव्हा प्रतापगडावर भेट झाली होती , तेव्हा खानाचा वकिल कृष्णा भास्कर कुलकर्णी , ह्याने राजांच्या मस्तकावर तलवारीचा घाव केला होता , त्याचं बारीकसही निशाण शिवाच्या मस्तकावर नव्हते , पुढे फाजलखान आसनावरून शिवाच्या पाठी गेला , व म्हटला , " क्या वाकई तुम शिवाजी हो ? " , शिवा हा म्हटला , आणि त्यानंतर दुसऱ्या क्षणास फाजलखानाने आपली कट्यार शिवाच्या पाठीत घुपसली , साऱ्या छावणीत शांतता पसरली , खुद्द सिद्दी हबकला , आणि बोलला फाजल ए क्या किया तुमने ? फाजलने वरील सर्व प्रकार सांगितला , सिद्दी जौहर आपली समशेर घेऊन आला , त्याने शिवाच्या छातीवर वार केला आणि विचारलं
कौन हो तुम ? , शिवाच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला , " शिवाजी " . पुढे सिद्दी हाच प्रश्न विचारत होता , शिवा तेच उत्तर देत होता , त्यावर सिद्दी शिवावर वार करत होता , काही क्षणानंतर शिवा काशीदची प्राणज्योत मावळली . " शिवाने मृत्यूला आलिंगन दिले , पण राजांशी एकनिष्ठता दर्शविली " . सारी छावणी सुन्न झाली , पुढे हेरांकडून खबर शिवाजी राजे विशालगडाच्या रोखाने जातोय .

No comments:
Post a Comment