विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 August 2019

सिद्दी जौहर आणि शिवराय यांचा संघर्ष भाग 6

सिद्दी जौहर आणि शिवराय यांचा संघर्ष  
भाग 6

■ घोडखिंड आणि मराठे : -
राजे ठरविल्याप्रमाणे घोड -
- खिंडीजवळ पोहचले , तेथेच ३०० बांदल राजांस मिळाले , आता योजनेनुसार सैन्याच्या २ तुकड्या झाल्या , पहिली तुकडी जे आधी ३०० मावळ्यांचे पथक होते , ते राजांच्या बरोबर आणि ३०० बांदल हे बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्यानेतृत्वाखाली गनिमाला रोखण्याकरिता , दिमतीस दिले , बाजीप्रभूंनी राजांस मुजरा केला . राजे पालखीत बसले , बाजीप्रभू पालखीजवळ आले आणि राजांस म्हणाले कि , " राजे विशालगडावर पोहचल्यावर तोफांचे ३ बार काढा , म्हणजे आम्ही समजू कि आमचा राजा सुखरूप पोहचला " , राजांनी मानेने इशारा दिला , बाजींनी स्मित हलकेसे केले , व राजे विशालगडाच्या रोखाने निघाले . व बाजीप्रभूंनी , प्रत्येकास आपापली जागा वाटून दिली , सर्वप्रथम दगडं - धोंडे ह्यांचे थर करण्यात आले , बाजीप्रभूंनी दोन्ही हातात दांडपट्टे घातले , तसेच विशेष म्हणजे घोडखिंड हिचे भौगोलिक स्थान असे आहे कि , खिंड रुंदीला कमी होती , त्याचाच फायदा बाजीप्रभूंनी घायचा ठरविला होता . पुढे सिद्दी मसूद सैन्य घेऊन आला , हशमांची एक एक फळी यायची आणि कापली जायची , बाजीप्रभू सपासप हशमाना कापत होते , वरना सुद्धा दगडांचा मारा करत होते , ३ तास झाले तरी एकही गनीम खिंड पार करू शकला नाही , बांदल सुद्धा थकले होते , परंतु बाजी सतत लढत होते , आणि सर्व मावळ्यांना प्रेरणा देत होते . गनीम नुसता कापला जात होता , सर्वत्र रक्तरंजित वातावरण झाले होते .
बाजीप्रभूंचा पराक्रम पहावयास
जर अलेक्सझेंडेर , सिजर सारखे योद्धे असते , तर त्यांनी
वीर बाजीप्रभू देशपांडेंचा पराक्रम पाहून , आपली हाताची बोटे तोंडात घालून कराकरा चावली असती . त्यावेळी बाजीप्रभूंचा दांडपट्टा एवढा तेज चालत होता कि , बाजींच्या दृष्टीला दिसला कि , दुसऱ्या क्षणास त्याचे मुंडके जमिनीवर पडत होते . ५ ते ६ तास मराठे त्वे्षाने लढत होते , बाजींच्या शरीरावर सर्वत्र जखमा झाल्या होत्या , मावळ्यांनी बाजींना एका दगडावर बसविले होते . एक एक मावळा पडत होता , परंतु गनिमांची संख्या काही कमी होत नव्हती . बाजींचे कान लागले होते , ते तोफांचा बार एकण्यासाठी , इकडे फुलाजीप्रभू हर हर महादेव म्हणत गनीम मारत होता .
राजे , विशालगडाच्या पायथ्याशी पोहोचले , तिथे छोटीशी लढाई झाली ,
आणि राजे गडावर पोहचले , तोफांना बत्ती दिली ,
बाजींनी तोफांचा आवाज एकला आणि हातांनीच
राजांस मुजरा केला . पुढे सिद्दी मसूद विशालगडाच्या पायथ्याशी आला , तिथे एक लढाई झाली , परंतु राजांनी त्याचा दारुण पराभव केला , सिद्दी मसूद पळून गेला .
अशाप्रकारे योग्य नियोजनाद्वारे
राजांनी आपली वेढ्यातून सुटका करून घेतली . पण ह्या
सर्व लढ्यात राजांचे काही बातमीदार , वीर शिवा काशिद , नरवीर बाजीप्रभू देशपांडे , फुलाजीप्रभू देशपांडे आणि बांदल , छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी यांनी बलिदान दिले .
पुढे शिवरायांच्याच सांगण्यावरून
, पन्हाळा किल्ला सिद्दी जौहरच्या ताब्यात दिला .सिद्दी जौहर साठी इमेज परिणाम

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...