विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 August 2019

" चौलची लढाई " 【 शंभूराजांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण पराक्रम 】

" चौलची लढाई "
【 शंभूराजांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण पराक्रम 】
दि. ११ सप्टेंबर १६८१ रोजी , मोगल बादशहा , औरंगजेब , स्वराज्य गिलंकृत करण्यासाठी , दक्षिणेत आला ( येताना ८ लक्ष लष्कर , भरपुर खजिना , प्रभावी
तोफखाना , हत्तींचा बेढा , अमीर उमराव , नामचीन वा
अनुभवी सरदार सोबत आणले ) . इकडे स्वराज्यात आलेल्या शत्रूचा पराभव करण्यासाठी , " शंभूराजे " बेखाँफ , तत्पर होते .
पुढील काही महिन्यांमधील मोगली सेनापतींच्या
आक्रमकांना , शंभूराजांनी चोख प्रत्युत्तर दिले , व त्यांचे
मनसुबे नाकामयाब केले .
छत्रपती संभाजी महाराजांनी , सन १६८२ मध्ये , बिचौली येथे , दारूचे कारखाने सुरू केले . आपल्या राज्याच्या वेषेवरच कारखाने उभारण्याचे , शंभूराजांचे धाडस पाहून , पोर्तुगीज दबकले आणि त्यांनी कोकणा -तील रयतेला त्रास देण्यास प्रारंभ केला . याचवेळी मराठे आणि सिद्दी यांच्यात लढाईस तोंड फुटले होते .पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी , यावेळी सिद्दीच्या हशमांना तसेच गलबतांना आसरा दिला . यासगळ्या धामधुमीत शंभूराजे कोकणपरिसरातच होते , पोर्तुगिजांच्या कृत्याची खबर लागताच , राजांना राग अनावर झाला .
शंभूराजांनी , चौलच्या ठाण्यावर , हमला करण्याची अचूक मोहीम आखली . या मोहिमेसाठी राजांबरोबर अंताजी भास्कर , नागोजी वाघमारे , आणि
जाणोजी फर्जंद हे स्थानिक ( तसेच पराक्रमी ) सरदार
होते . शंभुराजांनी चौलच्या ठाण्याबाहेर तट बांधून त्या
तटाच्या साहाय्याने मराठी फौजांना , पोर्तुगिजांवर हल्ला
करायचा अशी रणनीती आखलेली व सर्व काही त्या प्रमाणेच घडले (तट बांधून झाला) .
पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी , गोव्याहून परवानगी येताच , मराठ्यांवर हल्ले सुरू केले . परंतु तटाच्या मदतीने , मराठ्यांनी चौलवर हमला करून , चौलचे ठाणे ताब्यात घेतले आणि मराठ्यांचा भगवा चौलवर अभिमानाने फडकू लागला .
【शंभूराजांनी पोर्तुगिजांबरोबर ३४ युद्धे लढली आणि सर्व युद्धात , शंभूराजे विजयी झाले .】
" अखंड भारताचा विजय आहे ".
~ राहुल रमेशजी पाटील .
(शंभूमहितीगार) .
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 / 7741923346 .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...