विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 26 August 2019

नाना फडणवीस



ओंकार ताम्हनकर (Omkar Tamhankar), इतिहास अभ्यासक

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ साली आणि मृत्यू १३ मार्च १८०० साली झाला. नानांनी पेशवाईसाठी जे अचाट कार्य करून ठेवले आहे त्याला मराठ्यांच्या इतिहासात दुसरी तोड नाही. सवाई माधवराव ४० दिवसांचे असताना त्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली आणि नाना फडणवीसांनी त्यांच्या नावे कारभार सुरु केला तो पुढची २५ पेक्षा जास्त वर्षे टिकला.
नाना फडणवीसांचा पहिला उल्लेख पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या दरम्यान येतो. सदाशिवराव भाऊं पानिपत वरच मेले हे त्यांनी नानासाहेब पेशव्यानां सांगितले. १)जिवाजीपंत चोरघडे २) सखारामबापू ३) विट्ठ्ल सुंदर आणि १/२) नाना फडणीस या साडेतीन शहाण्यांपैकी अर्धा शहाणा असा नानांचा उल्लेख येतो. अर्धा कारण ते तलवारबहद्दर नव्हते परंतु मुत्सद्दी होते म्हणून अर्धे मानले जायचे.
उत्तरपेशवाईतील रघुनाथरावांच्या कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी नाना फडणवीसांनी बारभाई मंडळ स्थापन केले. तेव्हा
१. नाना फडणीस [नेतृत्व यांच्याकडेच होते],
२. हरिपंत फडके,
३. मोरोबा फडणीस,
४. महादजी शिंदे,
५. तुकोजीराव होळकर,
६. सखारामबापू बोकील,
७. त्रिंबकराव पेठे,
८. भगवानराव प्रतिनिधी,
९. मालोजी घोरपडे,
१०. रास्ते,
११. फलटणकर आणि
१२. बाबुजी नाईक. ही प्रमुख मंडळी होती.
रघुनाथरावाला पदच्युत करून नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा; तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले. यालाच बारभाई कारस्थान म्हणतात.
सवाई माधवराव आणि नानासाहेब
"नाना आहे तर पेशवाई आहे.." असे छत्रपती रामराजा महाराजांनी म्हटले आहे. यावरून छत्रपतींचा नानांवरचा विश्वास आणि नानांचे कर्तृत्व दिसून येते. नारायणराव यांच्या खुनानंतर मराठेशाहीचा कारभार नाना फडणवीस यांनी समर्थपणे पेलला. मुत्सद्दीपणाचे जोरावर तब्बल पंचवीस वर्षे राज्य राखले.
इंग्रजी गुप्त कागदपत्रांत साहजिकच नानांबद्दल आणि त्यांच्या डावपेचांबद्दल जास्त चर्चा होत असे. त्यातीलच एक हा १७९६ मधला कागद. सवाई माधवरावांचा मृत्यू झालेला होता आणि नाना फडणवीस पुन्हा एकदा 'त्यांचा' पेशवा गादीवर बसवतील अशी अटकळ इंग्रजांना होती. त्यामुळे ह्या कागदात सरळसरळ 'Nana Furnavese's puppet Peshwa' ('नाना फडणवीसांचा कळसूत्री पेशवा') असा उल्लेख आहे!
नाना फडणीसाबद्दल इंग्रज व मराठी इतिहासकार यांनी प्रशंसोद्‍गार काढले आहेत. काहींनी त्याचा मुत्सद्दीपणा व बुद्धिमत्ता यांची स्तुती केली आहे. नानाच्या बरोबर मराठी राज्याचा शहाणपणा व नेमस्तपणा लयास गेला असेही म्हटले आहे. नाना महत्वाकांक्षी होते. तसेच त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात स्वतःच्या कामुकतेची कबुली दिली आहे. आठ लग्न करूनही त्यांना एक पुत्र झाला पण तो ही अल्पावयातच मेला. याशिवाय नानांना २ अंगवस्त्रे सुद्धा होती.
नानाचा प्रसिद्ध व अप्रसिद्ध पत्रव्यवहार वाचल्यावर तो सामान्यांच्या कल्पनेएवढा मोठा वाटत नाही. अठराव्या शतकाच्या अंतिम व एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीस इंग्रजांनी जी विलक्षण कर्तबगारी दाखविली, तिचा विचार करता नानांनी व महादजींनी मराठी सत्तेवरील इंग्रजी आक्रमणाची लाट २५ वर्षे थोपवून धरली, यात त्यांची खरी कर्तबगारी स्पष्ट होते.
नानांची मुद्रा
धन्यवाद ।

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...