विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 August 2019

सैन्यातील पदे आणि साज सरंजाम संभाजी महाराज

सैन्यातील पदे आणि साज सरंजाम पाहू.
पायदळात आणि घोडदळात पूर्वीप्रमाणेच सुभेदार, जुमलेदार, कारकून, हवालदार, बारगीर, अफराद, नाईकवाडी, सबनीस इत्यादी लोक असत.
मराठे जेव्हा लढाईस जात तेंव्हा दोन्ही बाजूला घोडदळ आणि मध्यभागी पायदळ असे.
मराठा सैन्यात अत्यंत चांगली शिस्त असल्याचे पोर्तुगीजांनी नमूद केलेले आहे.
तुकड्यांबरोबर भगवी निशाणे, पालख्या, छत्री व माल वाहून नेण्यासाठी बैल असत.
शिवाय मराठा सैनिकांजवळ ढाल तलवारी, भाले, गुर्ज, दांडपट्टे, विटा, चापाच्या बंदुका, तोफा (लहान-मोठ्या), धनुष्यबाण आणि दोऱ्या बांधून तयार केलेल्या बांबूच्या शिड्या असत. मुघल सैन्यासारखा लवाजमा त्यांच्यासोबत नसे.
सर्व हालचाली वेगात आणि चपळाईने करण्यावर त्यांचा भर असे.
आता संभाजी महाराजांचे नाविक दल आपण पाहू.
छत्रपती शिवाजी महाराजां प्रमाणेच संभाजी महाराजांनीही आपले नाविक दल उत्तम तयार केलेले होते.
त्यांच्या कारकिर्दीत आरमाराची वाढ झालेली दिसते.
गोविंद कान्होजी आंग्रे, गोविंदराव जाधव, दौलतखान, दादाजी प्रभू देशपांडे, माईना नाईक भंडारी हे आरमाराचे अधिकारी होते.
कान्होजी आंग्रेंचे आरमार हे कायम फिरते असे. ते सर्व बंदरांवर नजर ठेवीत असे.
कावजी मुहम्मद, संताजी पवळा,
सिद्दी मिस्त्री ( दिससी सांबूलचा मेव्हणा) हेही मराठा आरमारात नेतृत्व करून लढत असत.
खांदेरी आणि कुलाबा उइथे जागोजी फर्जंद आणि नागोजी वाघमारे हवालदार होते.
अंताजी भास्कर हा तिथे मुजुमदार होता. हे पेन, नायगाव, नागोठणे, चेउल येथील खाड्यांचे संरक्षण करीत.
खाली दिलेल्या ठिकाणी मराठ्यांची गुराबे, गलबते आणि नौदलातील सैनिक तयार असल्याचे आकडे मिळतात. ते पाहू.

१. राजापूर येथे ५० हजार मराठा सैनिक सज्ज असून त्यांच्याजवळ ६० गलबते ( Galvetts) आणि गुरवे होती.

२. पेन येथे ३,००० नाविक फौज होती.

३. सुंदरजी बाजी या सुभेदाराच्या हाताखाली २२ गुराबे, आणि ३००० खाडी फौज होती.

४. मुंबईवर हल्ला करण्यासाठी ८५ गलबते आणि ५००० सैनिक तयार ठेवले होते. यापैकी ४५ गलबते हि उंदेरीवर हल्ला करावयास गेली.

५. थल येथे ५००० नौसिनिक होते.

६. दादाजी नरस प्रभूच्या नेतृत्वाखाली ४००० सैनिक दंडाराजपुरीवर हल्ला करण्यासाठी गेले होते.

७. सिद्दी मिस्ट्रीच्या हाताखाली ३० गलबते आणि दौलतखानच्या जवळ ८० गलबते होती.

८. खांदेरी येथे ३० आणि नायगाव येथे ३५ गलबते सज्ज असत.

९. संभाजी महाराजांनी मुंबईजवळच्या खाडीत १०० गलबते तयार ठेऊन नायगाव ठाणा येथे २००० सैनिक तयार ठेवले होते.

१०. मराठ्यांच्या आरमारात बरीच तारवे होती. १६८३ च्या सुमारास नायगावच्या नदीत ७६ लढाऊ गलबते तयार होती.

११. १६८५ च्या सुमारास संभाजी महाराजांच्या आरमारात ६० लढाऊ गलबते, १० पाल, आणि कारवारच्या नदीत नुकतीच नवीन तयार झालेली दोन मोठी जहाजे होती. सर्व तारवांत ३०० पेक्षा adhik तोफा होत्या.

१२. कोरले, नागोठणे आणि चेउल येथील प्रदेशात संभाजी महाराजांनी १५००० मराठा सैन्य ठेवलेले होते. दंडाराजपुरी येथे १००० सिनिक आणि आरमारात १२० गलबते,
१५,गुराबे तयार होती. त्याच प्रमाणे नायगाव येथे ७६ गलबते हि लढाईसाठी सज्ज असत.


संभाजी महाराज आजून जिवंत राहिले असते तर आपल्याला हिंदुस्थान सोडून परत पोर्तुगालला जावे लागले असते” असे द सांव जुझेफ ह्या पोर्तुगीज अधिकाऱ्याने लिहून ठेवलंय.🚩🚩

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...