विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 December 2019

सांगलीचा इतिहास इ. स. १००० ते इ. स. १८००

इतिहास इ. स. १००० ते इ. स. १८००


सांगलीचा इतिहास इ. स. १००० ते इ. स. १८००
१०२४ गोंक या शिलाहार राजाच्या ताब्यात ' मिरिच' (मिरज) व ' करहाटक' (कराड) व दक्षिण कोंकण हा प्रांत होता. यातच सांगलीचा भूभाग समाविष्ट होता.
१२०५ शिलाहार राजा गंगादित्य याने मिरज भागांत इसकुडी येथे तलाव बांधला. कोल्हापूर, मिरज, शेडबाळ व तेरदाळ येथे याबाबतचे शिलालेख आहेत.
१२५० - १३१८
देवगिरीच्या यादव राजानी या भागावर राज्य केले त्यावेळी ' मिरिच' प्रांतात तीन हजार गांवे होती.
१३१९ - १३४७
दिल्लीच्या खिलजी व तुघलकानी या भागावर राज्य केले.
१३४८ - १४८९
बहामनी सुलतानानी या भागावर राज्य केले.
१४९० - १६५९
विजापूरच्या अदिलशहाने या भागावर राज्य केले. यावेळी मिरज प्रांत रायबाग महालात होता.
१६५९ छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनापती नेताजी पालकर याने हा भाग जिंकून घेतला. परत अदिलशहाने हा भाग जिंकून घेतला.
१६७२
पन्हाळयापासून मिरजे पर्यंतचा सर्व भाग शिवाजी महाराजांनी जिंकला. या नंतर मुसलमान सरदार विजापुरास निघून गेले. तेव्हापासून या भागाची सरदारकी मिरजेचे सरदार कदम यांच्याकडे होती.
१७३० बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी मिरजेचे सरदार इंद्रोजी कदम यांच्या पागेची फडणीशी गोविंद हरी पटवर्धन यांना दिली.
१७३६ सरदार इंद्रोजी कदम हे दिल्लीवरील मोहिमेत कामास आले. ते निपुत्रिक होते. पुणं मुक्कामी त्याची मोठी पागा होती. आजही या पागेला `हुजूर पागा' असे नांव आहे.
१७४१ सरदार इंद्रोजी कदम यांच्या पागेची सरदारकी गोविंद हरी पटवर्धन यांना देण्यात आली.
१७६१ माधवराव पेशवे यांनी गोविंद हरी पटवर्धन यांना फौजेच्या खर्चाकरिता मिरजेचा किल्ला व आसपासची कांही ठाणी दिली.
१७६४ गोविंद हरी पटवर्धन व त्यांचे पुतणे परशुराम रामचंद्र व निळकंठ त्रिंबक यांचे नांवे आठ हजार स्वार ठेवण्याकरिता २५ लक्ष मुलुखाचा बहडा करुन दिला.
१७६८
गोविंद हरी यांनी आपल्या वडिलंच्या स्मारकाकरिता सांगलीची सहाशे बिघे जमीन स्वतंत्र काढून हरीपूर हे गांव वसविले व ते गांव शंभर ब्राह्मणांना अग्न्हार दिले. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी हे गांव बसविण्यास मंजुरी दिली. यानंतर हरीपूर हे क्षेत्र झाले. या टुमदार गावाची त्यावेळची लोकसंख्या दोन हजार होती व सांगलीची लोकसंख्या मात्र एक हजार होती. यावेळी हरीपूर हे सांगलीपेक्षा मोठे होते.
१७७१ मिरज मुक्कामी गोविंद हरी पुत्रशोकाने निधन पावले.
१७७३ वामनराव गोविंद पटवर्धन यांच्या नांवे मिरज प्रांताचा बेहडा झाला.
१७७६
वामनराव गोविंद पटवर्धन खानदेशात स्वारीवर असताना वरणगांव मुक्कामी निधन पावले. यांना पुत्र संतान नव्हते. म्हणून पांडुरंग गाविंद पटवर्धन यांना जहागिरीचा अधिकार मिळाला.
१७७७ हैदरवर स्वारी करण्यास गेले असता पराभव पावले. हैदरने त्यांना अटक केली. अटकेतच ते नवज्वर होऊन निधन पावले.
१७७९ हरिहर पांडुरंग पटवर्धन यांना सरदारकीची वस्त्रे मिळाली.
१७८२ हरिहर पांडुरंग यांचा ज्वराने मृत्यू झाला. ते निपुत्रिक होते.
१७८३
हरिहर पांडुरंग यांचे बंधु चिंतामणराव आप्पासाहेब यांना मिरजेच्या सरदारकीची वस्त्रे मिळाली तेव्हा त्याचे वय आठ वर्षाचे होते. म्हणून त्याचे चुलते गंगाधरपंत काम पहात होते.
१७८६ नाना फडणीस मिरजेस आले होते.
१७९५
निजाम व पेशवे यांच्या खडर्याच्या लढाईत पटवर्धन यानी शौर्य गाजविले म्हणून चिंतामणराव आप्पासाहेब यांचे नावे २५ हजार ५२१ रुपयांचा नवा सरंजाम बेहडा पेशव्यांनी करुन दिला.
१७९९
दुसरे बाजीराव पेशवे यांनी मिरज जहागिरीच्या वाटण्या करण्यास परवानगी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...