विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 March 2020

पानिपतच्या युद्धावेळीं नानासाहेब पेशवे यांनी काय केले? त्यांनी 9 वर्षाच्या मुलीशी लग्न केले हे खरे का?

saambhar: Ashish Mali, रासायनिक अभियंता

त्यांनी जरी 9 वर्षाच्या मुलीशी लग्न केले असले तरी ते घसरत्या आर्थिक परिस्थिती साठी
पानिपत वरची परिस्थिती
कुंजपुरा जिंकल्यावर भाऊनी अब्दालीची अफगाणिस्तानची परतीची वाट अडवली आणि अब्दाली ने यमुना पार करून भाऊंची पुण्याची वाट अडवली . पहिल्यांदा अब्दालीचा रसद मिळण्यात खूप अडचण झाली. कारण अब्दाली अतिशय वेगाने अंतर्वेदीतून यमुना पार केली पण रसद तेवढी जलद होत नव्हती खालील छावणीतील दर पहा
अब्दालीच्या छावणीत गव्हाचे पीठ एका रुपय्यात ३ शेर मराठ्यां च्या छावणीत एका रुपय्यात १६ शेर , चणे अब्दालीच्या छावणीत एका रुपय्यात ४ शेर /मराठ्यां च्या छावणीत एका रुपय्यात १२ शेर, तूप अब्दालीच्या छावणीत एका रुपय्यात अर्धा शेर /मराठ्यां च्या छावणीत एका रुपय्यात अडीज शेर .
कारण मराठे काही काळापासून पानिपत मध्ये होते आणि काही रसद उत्तरेकडून जमवली . पन हि परिस्थिती एका महिन्यात उलटी पालटली .
अब्दालीला रसद मिळाली आणि मराठ्यांची रसद बंद झाली .
अब्दालीच्या गोट्यात रसद नसल्याची बातमी पोचल्याने पुण्यात त्या वेळी डिसेंबर मध्ये मराठ्यांना अनुकूल वातावरण आहे असा भाऊ चा समज झाला होता
नानासाहेबांच्या लग्न
सततच्या मोहीम , राघोबा दादांनी केलेले खूप कर्ज निझाम कडून आणि उत्तरेकडून बंद झालेली चौथाई यामुळे स्वराज्याला पैश्याचा अदभूत पूर्व पैश्याचा तुटवडा झालेला .
पहिला बाजीराव असो चिमाजी अप्पा किंवा नानासाहेब यांचे सर्व विवाह सावकर च्या मुलींशी झालेले त्यामुळे पैसे यायला मार्ग उपलब्ध व्हायचा . आता नानासाहेबांनी या वयात ३५ मध्ये ,केवळ पैश्या साठी दुसरा विवाह योजित केला . सिद्धटेक इथे ते मुली पाहायला गेले , पुण्याजवळच्या नांदेड मधून बाबुराव ठाकरे ची मुलगी , बाजीराव माणकेश्वराची मुलगी अशा अनेक मुलगी बघून त्यांनी पैठणच्या नारायण नाईक वाखार्यांची मुलगी राधाबाई( माहेरचे नाव) पसंद केली , २७ डिसेंबर १७६० ला त्यांनी हिरडपुर मध्ये ९ वर्षाच्या या राधाबाई शी विवाह केला .
त्याच वेळी नानासाहेब पुरंदरे च दूत यांनी बातमी आणली कि आता युद्धाचे रंग पालटले आहेत , मराठ्यांच्या छावणीत रसद संपली आहे . जानेवारी १७६१ च्या सुरुवातील नानासाहेब ४०००० ची फौज घेऊन पानिपतास निघाले .
युद्धाची बातमी
१४ जानेवारी ला पानिपत चे युद्ध झाले आणि मोठा पराभव झाला . पण त्यावेळी आधुनिक दळण वळण नसल्यामुळे नानासाहेबांना हि बातमी उशिरा कळली.
याचा पुरावा म्हणजे १८ जानेवारी ला म्हणजे पानिपतच्या ४ दिवसानंतर नानासाहेबांनी भरून पत्र लिहले ते असे
चिरंजीव राजेश्री भाऊ याशी परंतु बालाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपर . फौज कोणे मार्गे आपणास करावी ते जलद ल्याहावे पैका किती पावला, किती अटकळी ए लिहावे
भाऊंना पानिपतची पहिली धक्का देणारी बातमी एका सावकार च्या डाका मधून मिळाली . त्या पत्र यामध्ये " दो मोती गलत , दस बिस आसेरफीत , फरकात खुद्रेकू रुपायकू गणत नाही " हि सांकेतिक भाषा सावकार लिहणे काही इतिहासकार मान्य करत नाही . अब्दाली मराठ्यांचे डाक अडवायचा म्हणून एका सरदाराने असे सांकेतिक भाषेत भाऊंना कळवले असावे .
दो मोती गलत म्हणजे विश्वस राव आणि भाऊसाहेब
दस बिस आसेरफीत १० ते २० मराठा नामांकित सरदार
फरकात खुद्रेकू रुपायकू गणत नाही : खुर्द उडालेल्या सैनिकांची गणती नाही
पत्र मिळाल्यावर पानिपतची लढाई हरली याची भाऊसाहेबांना कुणकुण लागली . पण त्यांचा या बातमीवर विश्वास बसला नसावा . तसेच ते पुढे पुढे निघाले ग्वालियर जवळ तीन कोस आधी पाठोरा जवळ आले . तिथेच त्यांना मल्हारराव ,नाना पुरंदरे आणि भाऊंची पत्नी पार्वतीबाई यांची भेट झाली .
पहिल्यान्दा विश्वासराव गेल्याची पक्की बातमी मिळाली पण भाऊ विषयी कोणालाच पक्की माहिती नसावी.
नाना फडणवीस आणि हरिपंत तात्या यांनी सदाशिवभाऊ गेलेलल्याची पक्की बातमी होती ,नाना फडणवीस भाऊंच्या जवळ असलेले एकमेव जीवित मराठी माणूस होते. पण एवढा मोठा धक्का नानासाहेब आणि पार्वती बाई ना सांगितले नाही .
कारण निझाम दक्षिणेत पुंडावा करेल. लाखभर मराठा पानिपत गेले , ४०००० नानासाहेब कडे होते , राघोबा कडे एवढी मोठी फौज नसावी. त्यामुळे त्यांनी ती बातमी सांगितली नाही .
नानासाहेबांनी मात्र अब्दाली वर हल्ला करण्याचे ठरवले पण विठ्ठल विंचूरकर , मल्हारराव नारोपंत यांनी अब्दालीवर तुटून पडण्यात काही अर्थ नाही असे सांगितले
१८ फेब्रुवारी ला नानासाहेबांनी भेलसा या गावातून पुन्हा पुण्याला जायचा निर्णय घेतला
त्यांनी नानासाहेब पुरंदरे आणि विंचूरकर याना एक पात्र पाठवले त्यात ते लिहितात कि
"भाऊ या लोकांतून गेला तर हिंदुस्थान ची दौलत गेली" लेक तो अल्पायुषी होता सूर्यमंडळ भेदून गेला ते दुःख परमार्थ शास्त्रपुराणे करून टाकिलेपरंतु चिरंजीव भाऊ वाचून दुनिया दौलत व्यर्थ आहे .
म्हणजे भाऊंना एक महिना भाऊ जिवंत असेल अशी आशा वाटली आणि पुन्हा अब्दालीला गाठू असे कुठेतरी आशावाद होता . पण एक महिन्या भाऊंची काहीच खबर लागली नाही त्यामुळे भाऊ या युद्धात गेले असल्याची शक्यता दाट होऊ लागली , आणखी एक नानासाहेबांचे आपल्या चुलत भावा वर किती प्रेम आहे ते पण कळते .नाना फडणवीस करून हळू हळू बघून पानिपतच्या युद्धाची खरी बातमी कळली .

उत्तरेतून परताना पानिपतवर पडलेल्या आपल्या सैनाच्या आपल्या पुत्र आणि भाऊंच्या पराक्रमाची तुला केली नर्मदेच्या काठी ओंकारेश्वराला . त्यावेळी नानासाहेबांनी ११४ पौंड एवढे वजन झाले आणि मागची वेळी भाऊंचे वजन १८० पौंड भरले होते म्हणजे ६६ पौंड ने कमी .
६ जुन १७६१ ला नानासाहेंबी पुण्यात पोचले आणि २३ जून ला त्यांनी प्राण सोडले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...