विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 March 2020

कर्मवीर,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

कर्मवीर,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
कर्नाटक येथील जमखिंडी या गावातील प्रतिष्ठीत अशा जहागीरदार घराण्यात २३ एप्रील १८७३ रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला.पुढे जाऊन १८९१ साली त्यांनी मॅट्रिकचे शिक्षण पुर्ण केले.त्यानंतर १८९३ साली काॅलेजचे शिक्षण घेण्याच्या उद्देशाने ते पुण्यामध्ये आले.डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनमार्फत मीळालेल्या दरमहा दहा रूपयाच्या स्काॅलरशिपच्या बळावर त्यांनी शनिवार पेठेतील गद्रे वाड्यात भरणार्या फग्र्युसन काॅलेजमध्ये अॅडमीशन घेतले. प्रीव्हियस परीक्षेची वीस रूपये फी भरावयाची होती, जवळ एक दमडीही नव्हती.अशा परीस्थीतीत ही फी जमविण्यासाठी काही प्रतिष्ठीत व्यक्तींकडे हेलपाटे मारल्यानंतर १४ रूपये रक्कम कशीबशी जमा झाली.अशा कठीण प्रसंगी त्यांचे बालमीञ विष्णुपंत देशपांडे यांच्या पत्नी बहिणाबाई यांनी भाऊबीजेच्या ओवाळणीत मिळालेले वीस रूपये देऊन विठ्ठल शिंदेंना मदत केली.नंतर ते बहिण जनाक्का यांनाही शिक्षणासाठी पुण्यामध्ये घेऊन आले. पुढे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी दरमहा पंचवीस रूपये स्काॅलरशिप देऊ केली.या बळावर विठ्ठल शिंदे यांनी १८९८ साली बी.ए. च शिक्षण पुर्ण केले. १९०१ साली परदेशात (इंग्लंड)जाऊन त्यांनी समाजशास्ञ,समाज, धर्म,प्राचीन भाषा,अस्पृश्यता अशा विविध विषयांचा शास्ञशुद्ध पद्धतीने अभ्यास केला.असा अभ्यास करणारे ते भारतातील पहीले अभ्यासक होय. त्यांनी इंग्लंड,स्काॅटलंड,फ्रान्स,हाॅलंड,जर्मनी,स्वित्र्झर्लंड,इटली इत्यादी देशांना भेटी देऊन तेथील सामाजिक,सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास केला. १९०५ साली महर्षी विठ्ठल शिंदे यांनी अहमदनगरमधील भिंगार या गावातील अस्पृश्य लोकांसाठी राञी १२ वाजता सभा घेऊन तेथील लोकांना मार्गदर्शन करून आपल्या कार्यास खर्या अर्थाने सुरूवात केली.१९०६ साली त्यांनी अहमदनगरमध्ये प्रार्थना समाजातर्फे स्पृश्यांसाठी एक व अस्पृश्यांसाठी एक अशा राञशाळा काढल्या.१९०६ सालीच अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी शिंदे यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशन या स्वतंञ संस्थेची स्थापना केली.१९०८ साली सोनई ता.नेवासा येथे जाती-जातीमध्ये मोठा असंतोष माजला होता.महर्षी शिंदेंनी तेथे जाऊन जातीजातीतील वैमनस्य दुर केले.त्या ठीकाणी महर्षीनी मोठी सभा घेऊन प्रत्येक जातीचे दोन सभासद घेऊन "सत्यसमाज" नावाची चळवळ उभी केली.अस्पृश्यता निवारण कार्यासाठी महर्षी शिंदे यांनी अनेक ठीकाणी परिषदा घेतल्या."स्वाभीमानाने जगा व अन्यायाविरूद्ध लढा द्या" असे ते परिषदांमधुन सांगत. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी शिंदे यांचे संपुर्ण कुटुंब झगडत होते.महर्षी शिंदे यांच्या मातोश्रीं अस्पृश्यांच्या मुलांसाठी परकर,पोलकी,अंगडी,टोपडी बनवित असत व त्यांच संगोपन करत असत.तसेच बहीण जनाक्का त्यांना इतर कामात मदत करत असे व वडील थकले असतानासुद्धा हीशोबाचे काम करत असे.अस्पृश्य निवारणासाठी महर्षी शिंदे यांच्या संपुर्ण कुटुंबाने स्वत:ला वाहून घेतले होते.२३ मार्च १९१८ रोजी महर्षी शिंदे यांनी मुंबईत अधिवेशन भरविले.श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.त्या अधिवेशनात विशिष्ट वर्गावर लादण्यात आलेली अस्पृश्यता ताबडतोब दुर करावी असा ठराव संमत करून घेतला.१९२३ साली अस्पृश्य निवारण संघाच्या कार्यासाठी पुणे नगरपालीका,शिक्षणखाते, इंग्रज सरकार यांच्याकडुन "अहिल्याश्रम" या इमारतीचे बांधकाम करवुन घेतले.या इमारतीसाठी एकुण एक लाख बारा हजार रूपये खर्च आला होता. १९२० साली महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमानावर दुष्काळी परीस्थीती उत्पन्न झाली होती.या परास्थीतीत महर्षी शिंदेंनी दुष्काळ आपत्ती निवारण समिती स्थापन केली.या समीतीने आलेल्या मदतीतुन एक कारखाना सुरू करून दुष्काळग्रस्तांना रोजगार मीळवुन दिला.शेतकर्यांच्या विदारक परिस्थीतीची व्यवस्थेला जाणीव व्हावी या हेतुने पुणे,मुंबई,तेरदळ,बोरगाव इत्यादी ठीकाणी शेतकरी परिषदा घेतल्या.अर्थशास्ञाचा नेमका फायदा श्रीमंतांना, सत्ताधार्यांना व त्यांच्या पुढे-पुढे करणार्या पोशाखी सुशिक्षितांना आणि तोट्याचा वारसदार माञ एकटा अडाणी शेतकरीच.....!शेतकर्यांचा अडाणीपणा कमी करून त्यांनी नवीन आशा व जोमाने आपला सर्व जगाला पोसणारा हा पविञ शेतीचा धंदा करावा,म्हणुन काही स्वार्थत्यागी,बिनपोशाखाचे सुशिक्षीत व करारी माणसे पुढे आली,की कोणतेही सरकार अथवा सावकार ह्यांचेही धाबे दणाणते. १९१९ साली सक्तीच्या शिक्षणाची चळवळ झाली.यामध्ये मुलांबरोबर मुलीनाही सक्तीचे शिक्षण मीळावे त्यांनी जोरदार आवाज उठवला.प्रचंड मोठ्या सभा घेऊन प्रचारदौरे केले.या चळवळीचा परिनाम झाला.कौन्सिलमधील महर्षींचे मीञ परांजपे यांनी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. मद्यपान बंदीची चळवळही महर्षीनी जोरदारपणे चालविली. अस्पृश्यांसाठी शाळा,वसतिगृह व अनेक कल्याणकारी उपक्रम राबविणे,अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन राहणे,हिंदू धर्मातील मुरळी अशा विविध सामाजीक विषयांवर व बहिष्कृत समाजासाठी काम करणारा भारताचा नेल्सन मंडेला अर्थातच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे होय. अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मीळावा म्हणुन व्हायकोम सत्याग्रहासारख्या आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग घेणे असो कींवा महार,मातंग,भंगी,चर्मकार,मुस्लीम,ख्रिस्ती,ज्यु,मराठा अशा सर्वच दुर्लक्षीत समाजासाठी अहोराञ झटणारा महापुरूष म्हणजे महर्षी विठ्ठल शिंदे होय. महर्षी शिंदेनी सर्वप्रथम अस्पृश्यतेच्या प्रश्नावर १९०९ मध्ये बहिस्कृत भारत या नावाने पुस्तक लिहले.१९३३ मध्ये "भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न" हा सविस्तर ग्रंथ लिहला. अध्यात्म,भाषाशास्ञ,समाजशास्ञ,तत्वज्ञान,इतिहास,संशोधन व सामाजिक सुधारणा अशा विविध विषयांवर प्रगल्भ अभ्यास असणारे व्यक्तीमत्व म्हणजे महर्षी शिंदे होय. महर्षींनी महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सक्रीय सहभागही घेतला होता.इंग्रज सरकारने त्यांना मे १९३० मध्ये सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती.कारावासामध्ये महर्षींना इंग्रजांनी काथ्या वळुन त्यापासुन दोरखंड वळण्याचे काम दिले होते. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानतर्फे नोबेल पारितोषीकासारखे एक पारितोषीक ठेवले होते.पारितोषीक विजेत्याला एक हजार रूपये रोख आणि मासिक मानधन म्हणुन शंभर असे वर्षाचे बाराशे रूपये दिले जाई.१९३३ मध्ये सयाजीरावांनी या पारितोषीकिसाठी महर्षी शिंदेंची निवड केली. समाजासाठी प्रचंड मोठ कार्य करणार्या या राष्ट्रपुरूषाला येथील माणसाने विसरावे ही महाराष्ट्राच्या,भारताच्या मातीसाठी मोठी शोकांतिका आहे
©ॠषिकेश मारणे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...