विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 23 April 2020

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’ भाग 4

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’
postsaambhar:अशोक इंदलकर, पोलिस निरीक्षक
भाग 4Image may contain: one or more people and outdoor
पुराणकाळात भगवान महादेवाची पत्नी सतीच्या शरीराचे तुकडे पृथ्वीतलावर ज्या ज्या ठिकाणी पडले ते मुख्य शक्तिपीठ हिंगलजा माता मंदिर ‘नानी का मंदिर’ हे बलुचिस्तानात आहे. या हिंदू धर्मस्थळावर पाकिस्तानी सैनिकांनी आक्रमण करून ते उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला होता; पण बलुच लोकांनी प्राणांची आहुती देऊन त्याचे रक्षण केले.
1947 साली पाकिस्तान स्वतंत्र झाला नव्हता, तेव्हा बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग नव्हता; पण पाकिस्तान शासकांनी सैन्य पाठवून त्याचा ताबा घेतला. तेव्हापासून आजपर्यंत त्याचा विकास झाला नाही. पाकिस्तानच्या एकूण भूभागापैकी 44 टक्के इतका हा भूभाग आहे. तो सुजलाम्-सुफलाम् आहे. तांबे, पितळ, युरेनियम अशी प्रचंड खनिज संपत्ती मात्र पाकिस्तान लुटून नेतो... बलुचींना दुजाभावाची वागणूक मिळते. त्यामुळे स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. पाकिस्तानी सैनिक हे आंदोलन चिरडण्याकरिता बलुच लोकांवर अनन्वित अत्याचार करतात. नुकत्याच लंडन येथे झालेल्या क्रिकेट विश्वचषक सामन्यादरम्यान एका विमानाच्या मागे ‘फ्री बलुचिस्तान’ असा फलक फडकत होता. तर एका सामन्याच्या वेळी स्टेडियमबाहेर पाकिस्तानच्या प्रेक्षकांना बलुच प्रेक्षकांनी ठोकून काढले.
भारताचा बलुच लोकांना पाठिंबा आहे. पाकिस्तानी शासक, ‘आयएसआय’ ही त्यांची गुप्तचर संघटना इंडियन आर्मीला जेवढी घाबरत नाही, तेवढी फक्त एका अधिकार्‍याला घाबरते... तो अधिकारी म्हणजे अजित डोवाल. पंतप्रधानांचे खास असे सुरक्षा सल्लागार. ज्यांना पाकिस्तानची नस अन् नस माहीत आहे. सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाईंड... बलुचिस्तानातील जनता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद घालते की, आम्हाला मदत करा... 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील एका ऐतिहासिक भाषणात मोदींनी बलुच लोकांवरील ‘पापी’स्तानच्या आत्याचाराचा निषेध केला होता. त्यांना सहानुभूती दाखवली होती. नुकतेच दिल्लीमधे हिंंद बलोच फोरमद्वारे बलुच महिलांनी फोरमच्या हिंदू सदस्यांना राख्या बांधल्या. आजही बलुच युवक यूट्यूबवरून ‘दि ग्रेट मराठा’ ही सीरियल डाऊनलोड करून घेतात. कारण, आपण मूळचे मराठी असल्याची काहींची भावना आहे.
जावळीचे प्रवेशद्वार असे कमानीवर लिहिले आहे त्या सातार्‍याजवळ हायवेवरील आनेवाडी टोल नाक्याजवळील आनेवाडी गावाचे व मुंबईत स्थायिक झालेल्या सहायक पोलिस आयुक्त जाधव यांचा सुपुत्र निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानच्या कैदेत आहेत. त्यांना बलुचिस्तानात हेरगिरीच्या आरोपावरून पकडल्याचे पाकिस्तान सांगतो... असो उद्या बलुचिस्तान स्वतंत्र होईल न होईल तो वेगळा भाग आहे; पण महाराष्ट्रापासून दीड हजार किलोमीटर दूर असणार्‍या बलुचिस्तानचे मराठी कनेक्शन हे असे आहे... खासदार संभाजीराजांनी रायगड, दिल्ली येथे शिवराज्याभिषेक उत्सव सुरू केला आहे. छत्रपती शिवरायांच्या आज्ञेेने सरदार हिरोजी इंदलकरांनी बांधलेल्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात संभाजीराजेंनी केली होती, त्यावेळी आम्ही मोजकीच मंडळी त्यांच्यासोबत होतो. नंतर त्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी नंतर दिल्लीमध्ये शिवराज्याभिषेक यशस्वीरीत्या सुरू केला. उद्या बलुचिस्तानात तो सुरू केला, तर त्याला नक्कीच तेथे प्रचंड पाठिंबा मिळेल याची खात्री आहे आणि आंतरराष्ट्रीय डावपेचाच्या द़ृष्टिकोनातून भारतासाठी ते एक उपयुक्त पाऊल पडेल.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...