मराठ्यांच्या इतिहासातील अज्ञावसातील एक राणी दुर्गाबाई
दुर्गाबाईंचे उल्लेख इतिहासात अगदी नावापूरतेच येतात . नववाचकांचे नेहमीच मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात की या दुर्गाराणीसाहेब कोणाच्या पत्नी? .....वगैरे वगैरे अनेक प्रश्न उपस्थित राहतात . तरी हा यासाठीच अट्टाहास ....
अफजलखानवधापुर्वी सातारा कराड हा परगाणा आदिलशहीचा होता. पण शिवरायांनी खानास मारल्यावर या भागावर महाराजांनी अंमल बसवला तेव्हा कराड परगाण्यातील यादव घराण्यातील मंडळी शिवरायांकडे रूजू झाली. जावळी खोर्यात तर अर्जोजीने प्रतापगडाचे बांधकाम केले .
मुधोजी यादवास पाच पुञांपैकी अर्जोजी व गिरजोजी अगदी मातब्बर व हुशार मंडळी निघाले. अर्जोजीने अनेक गडकोट बांधले तर गिरजोजी विश्वासू चाकर बनला .
अशाच या विश्वासू यादव घराण्यातील कागदपञांमधून दुर्गांबाईची थोडीबहूत माहिती भेटती . यादव दप्तराने अनेक घटना नव्याने उजेडात आणल्यात त्यातील संभाजीक्लीन राणीची अज्ञात माहिती....
छञपती संभाजी महाराज यांना एकपत्नीच संबोधले जाते. हे जून्या कागदपञांवरूनच पण नव्याने उजेडात आलेले यादव दप्तरात दुर्गाबाईंचे नाव आढळते . या कैदेत केव्हा आणि कश्या पडल्या याची काहीच माहिती नाही. तथापी त्यांना सोडवण्याचे एकमेव प्रयत्न झाला तो संभाजी महाराज यांच्या हयातीतच म्हणजे खुद्द छञपती संभाजी महाराज यांनी दुर्गाबाईंच्या सुटकेची कामगिरी विश्वासू गिरजोजीवरच सोपवली होती.
नोव्हेंबर 1688 मध्ये संभाजी महाराज यांनी कलश व शिर्केंच्या भांडणावरून शिर्केंचे परीपत्य करण्यासाठी पन्हाळा विशालगड प्रांती जाण्यापुर्वीच त्यांनी गिरजोजीस राणी दुर्गाबाईंच्या भेटिस औरंगाबादेस धाडले होते. गिरजोजिने वरील वृत्तांत आपल्या दप्तरात मांडला तो असा .....
" गिरजोजी यादव हे मातुश्री दुर्गाबाईसासेब राजेश्री संभाजी राजे छञपती यांची राणी दौलताबादेस तांब्राचे निर्बंधी होती . "
हा उल्लेख दप्तरातील विभाजनपञात 1716 च्या नोंदित येते.
ही कामगिरी सफल झाली नसावी कारण दौलताबादेस गिरजोजी जाऊन आले होते. पुढे संभाजी महाराज यांची हत्येनंतर रायगडाचा पाडाव झाला आणि येसूबाई शाहूराजे बादशहाच्या कैदेत गेल्यावर पुढे दुर्गाबाईंना ही येसूबाईंच्या छावणीत धाडले गेले आणि शिवछञपतींच्या या दोन्ही स्नुषा अगदी 1689 ते 1718 पर्यंत नरकयातना जणू भोगत होत्या .
शाहूराजेंनी स्थापन केलेले साम्राज्य जणू येसूबाईंना आणि दुर्गाबाईंना सुटकेचा एक दिलासाच होता .
अखेर 1718 ला शाहू छञपती यांनी सय्यद हुशेनशी करार करून मराठा फौजा दिल्लीस धाडून मोहिमेत ज्या मुख्य गोष्टी साध्य करायच्या होत्या याची यादि बाळाजीस करून दिली होती ती अशी ....
स्वराज्य थोरले कैलासवासी स्वामींचेप्रमाणे रायगड वरकड गडकोटदेखील करून घेणे.
चंदिचे राज्य गडकोटदेखील घेणे
मातोश्री येसूबाई दुर्गाबाई व मदनसिंगदेखील व जानकीबाई व सेवक लोक मागून घेणे.
खटाव आकलूज कासेगाव सांगोले मंगळवेढे ठाणी मागून घेणे.
वरील यादित दुर्गाबाईंचे ही नाव दिले आहे 1718 ला वरील दिल्याप्रमाणे कबिला सातारी आला . जवळपास तीस वर्षांची कैद भोगून आलेल्या या दोन्ही मातोश्री यांनी स्वराज्यात येऊन देह सोडला .
संभाजी महाराज यांच्याबरोबर विवाहबध्द होऊन आलेल्या या राजस्ञीया ऐश्वरायसंपन्न तर झाल्याचं पण काळाने लगेच संपुर्ण हयात शञुंच्या यातना सोसण्यात घालवली अशा दुर्दैवी असलेल्या या दुर्गाबाईंना अजून देखील अज्ञातच ठेवले.
No comments:
Post a Comment