तस पहिला तर नागपूरचे भोसले संस्थान स्थापन केले राघोजी भोसले यांनी. खूप बंगाली आणि भारतीय लोक बंगाल वर अनन्वित हल्ल्यासाठी जसे मराठ्यांना जबाबदार धरतात.त्यांनी हे पण लक्षात ठेवले पाहिजे जिथपर्यंत मराठ्यांनी बंगाल मध्ये धडक मारली तीच भाग हिंदू चां राहिला आहे. जिथे मराठ्यांनी धडक मारले नाही तो सर्व भाग आज बांगलादेश झालंय . बांगलादेश मध्ये मुस्लिम करण वसाठी शिवाजी महाराजांच्या हातातून पळून गेलीला शाहिस्तेखान जबाबदार आहे.
- मुळातच नागपूर शहराचा इतिहास देवगडचे गोंड राजे बख्त बुलंदशाह, त्यांचे पुत्र चांद सुल्तान व त्यानंतर राजे रघुजी भोसले यांच्या कारकीर्दीत बहरलेला आहे. १७४२ पासून भोसले राजवट सुरू झाली.
- उदयपूर च्या रानांच्या वंशज असल्याचे ते सांगतात.(महाराणा प्रताप).पूर्वी अहमदनगर निजामशाही मध्ये ते सरदार होते.त्यांनां उमरावती व भाम गांवें इनाम होतीं. या घराण्याचा मूळ पूरुष मुधोजी व त्याचा भाऊ रुपाजी यांनीं पुणें जिल्ह्यांतील मौजे हिंगणी तर्फ पाटस येथील पाटिलकी खरेदी केली. हे दोघे शिवाजी महाराज यांच्या हाताखालीं फौजेंत होते. रुपाजीस अपत्य नव्हती;मुधोजीस सात मुले होती.
- सात भावा मध्ये पारसोजी भोसले हे संभाजी महाराज च्या कटा मध्ये अण्णाजी दत्तो च्या बाजूला होते. पण संभाजी महाराजांची सरशी झाल्यावर त्याने खानदेशात निघून गेले.पण काही वर्षांनी राजाराम महाराज सत्तेवर आल्यावर पुन्हा ते परत आले . त्यावेळी परसोजि ने विदर्भात अमल बसवला.त्यावेळी राजाराम महाराज ने सेनासहेब सुभा हे पद निर्माण केलेते परासोजी साठी. राजाराम महाराजांच्या गंगा थाडीच्या प्रसिद्ध मोहिमेत पारासोजी भोसले होते.
- ज्यावेळी शाहू महाराज आणि ताराबाईच्या संघर्ष झाला टायवेली परासिजी ने शाहू महाराजांची बाजू घेतली.जेंव्हा ताराबाईने काही लोकं शाहू महाराज तोतया आहे का नाही ते पाहायला जेंव्हा काही सरदार जेंव्हा शाहू महाराज बरोबर पंक्तीला आले होते त्यावेळी परासोजि भोसले चे मोठे भाऊ बापूजी भोसले त्या पंक्तीत जेवले होते.
- शाहू महाराजांनी परासोजि भोसले यांचे सेनासहेब सुभा हे पद कायम केले .त्यावेळी परासोजि भोसले कडे 15000 फौज होती. त्यांना विदर्भ आणि गोंडवन चे सह जिल्हे शाहू महाराजांनी दिले.परासोजि भोसले 1809 मध्ये मरण पावला नंतर कान्होजी भोसले कडे जबाबदारी आली. पण तो आटिशाय तापट होता. बालाजी विश्वनाथ जेंव्हा सय्यद भावाणा मदत करायला दिल्ली का गेले तेंव्हा कान्होजी गेले नाही त्यावेळी त्यांचे चुलत भाऊ संताजी आणि राणोजी ल बाळाजी विश्वनाथ यांच्या बरोबर पाठवले. त्यात संताजी दिल्लीत मारला गेला. कान्होजी भोसले वर शाहू महाराज नाराज झाले. आणि त्याने पहिला रघुजी भोसले कडे जबाबदारी दिली.
- पारासोजि भोसले चे मोठे भाऊ बापूजी भोसले यांचे मोठे मुलगे बिंबजी . आणि या बिंबाजी च मुलगा म्हणजे रघुजी प्रथम. मूळचे पुणे प्रांतातील हिंगणीचे. त्याचा जन्म पांडववाडी (वाई-सातारा जिल्हा) येथे झाला असावा. त्याचे वडील बिंबाजी त्याच्या लहानपणीच वारले. त्याचे संगोपन आई काशीबाई व आजी बयाबायी यांनी केले असे दिसते यांनीच नागपूरच्या भोसले संस्थानचा स्थापना केली. बंड्यापासूनी चांद्यापर्यंत हे स्वराज्य झाले त्यात राघोजी भोसले च पण हात आहे. त्यांनी ओडिशा बंगाल पर्यंत धडक मारली. भास्कर पंत कोल्हटकर हे त्यांचे मुख्य सरदार. पूर्ण बंगाल राघोजी आणि भास्कर पंत का घाबरट होते.
- कान्होजी ला पुत्र नसल्यानें त्याने रघुजी आपल्याजवळ नेलें. कान्होजीस पुढें रामाजी नांवाचा पुत्र झाल्यावर, याच्यावरचें त्याचें खागा मर्जी झाली व नंतर तर दोघांत शत्रुत्व आलें. तेव्हां रघूजी हा कान्होजीवर रुसून देवगडच्या चांदसुलतान नांवाच्या गोंड राजाकडे १०० स्वारांसह गेला; तेथें कांहीं दिवस राहून, एलिचपूरच्या नबाबकडेहि थोडे दिवस राहिला आणि मग सातार्यास शाहूच्या जवळ गेला व गोविंदराव चिटणीस, फत्तेसिंग भोंसले व श्रीपतराव प्रतिनिधि यांच्या तर्फें त्यानें शाहूशीं चांगले संबंध राखले.. फतेसिंगाबरोबर कर्नाटकाच्या स्वारींत रघुजीनें जाऊन उत्तम पराक्रम केला. एकदां शाहूमहाराज शिकारीस गेला असतां, नेम चुकल्यानें वाघानें त्याच्यावर चाल केली, तेव्हां रघुजीनें मध्यें घुसून वाघास ठार केलें; रघुजीची बायको सुकाबाई व शाहूमहाराजांची धाकटी राणी सगुणाबाई या चुलतबहिणी होत्या; इत्यादि कारणानें शाहूची मर्जी रघूजीवर बसली व त्यास सेनासाहेबसुभा हें पद मिळालें
- नागपूर त्यावेळी गोंडवन साम्राज्याची राजधानी होती जिथे देवगडच्या गोंड घराण्याचे राज्य होते. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली.बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपुरास हलवली.
- १७३९ साली राजा गोंड यांचे निधनानंतर त्यांच्या वर्षांमध्ये वाद उद्भवला. रघुजी त्यावेळी मराठ्यांच्या वतीने बेरार प्रांतात शासन करीतहोते. राजाच्या विधवाने मराठ्यांच्या वतीने रघुजींची मदत मागितली. रघुजींनी मध्यस्ती करून राजा गोंडच्या दोन पुत्रांना ज्यांना आधी राज्याबाहेर काढून बेरारला धाडण्यात आले होते, राज्य दिले. पण १७४३ मध्ये दोन भावात परत वाद उद्भवला. थोरल्या भावाने परत रघुजींना विनंती करून हस्तक्षेप करण्यास सांगितले. तेव्हा रघुजींनी थोरल्या भावयाविरोधातील बंडाळी मोडून काढली. पण कमी काळात दोनदा एवढ्या जवळ हाती आलेली सत्ता परत न करण्याचा मोह रघुजींना आवरला नाही आणि त्यांनी गोंड राजा बुरहान शानला, फक्त राजकीय बाहुले बनवून खरी सत्ता आपल्या हातात घेतली.
No comments:
Post a Comment