|| शंभूराजांची युद्धनीती ||
छत्रपती संभाजी महाराज , मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासातील सुवर्ण पर्व . जगाच्या पाठीवर आजपर्यंत राजे , शासक अनेक झाले , आहेत आणि होतील , पण छत्रपती संभाजी महाराज , हे जो पर्यंत
चंद्र - सूर्य आहेत , तो पर्यंत सर्वोत्तम राजे म्हणोन राहतील . मात्र ११ , ५६८ दिवसांचे आयुष्य , परंतु शंभूराजे त्यातही जीवन जगण काय असतं हे शिकवून गेलं , ते उत्तम कवी होते , उत्तम प्रशिक्षक होते , उत्तम अभियंता होते , उत्तम वैज्ञानिक होते , उत्तम जलतज्ञ होते , उत्तम वनस्पतीशास्त्राचे जाणकार होते ,
उत्तम सेनापती होते , उत्तम शासक होते .
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर , लवकरच आलमगीर ३ लाख घोडदळ , २ लाख पायदळ , १ लाख सेवकवर्ग , ३ हजार हत्ती , ५० हजार उंट , प्रचंड तोफखाना 【 ७० लांब पल्ल्याच्या तोफा होत्या 】, १५ कोटीचा खजिना , अमीर उमराव व मनसबदार यांची संख्या साडे ३ हजार होती , शहजादा मुअज्जम , आज्जम , कामबक्ष , नातू मूईद्दीन , बेदारबखत , नामांकित सरदार असदखान [ वजीर ] , एतियार खान , शहाबुद्दीन खान , फत्तेखान , रुहुलाखान , हसनअलीखान , दाऊदखान , तरबियतखान अशा सेनानींचा ताफा होता ; परंतु औरंगजेबाचे पारिपत्य करण्याकरिता , संभाजीराजे समर्थ होते , तो येण्यापूर्वीच बुऱ्हाणपूर लुटून आणि शहजादा अकबर यास पन्हा देऊन , त्यांनी औरंगजेबास हिनवले होते . ६ महिन्यात संपूर्ण दख्खन जिंकून घेतो , असा म्हणणाऱ्या औरंगजेबाला , शंभराजांनी पूर्णतः हतबल केले , सन १६८५ नंतर त्याने स्वराज्याविरुध्द मोहीम रद्द करून , त्याने त्याचा मोर्चा आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे वळविला , एवढंच काय तर शंभूराजांच्या पराक्रमामुळे , त्याने त्याचा शाही किमौंश खाली ठेवला आणि कसम घेतली , की जोपर्यंत संभाला कैद करत नाही वा ठार मारत नाही तोपर्यंत शाही किमौंश परिधान करणार नाही . सन १६८१ मध्ये औरंगजेब काही एकटा स्वराज्यविरुद्ध चालून नव्हता आला , त्याने सिद्दी , पोर्तुगीज , व टोपीकर इंग्रज यांना स्वराज्याच्या कुरापती काढण्यास चेतविल होतं , " एकाच वेळी , उत्तम
योजनाबद्ध नियोजनामुळे , शंभूराजांनी सर्वच आघाड्यांवर विजयश्री कायम बरोबर ठेवला " .
छत्रपती संभाजी महाराजांनी वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती सुद्धा साधली होती , मात्र प्रबळ बुद्धीच्या बळावर . राजांनी युद्धभूमीवरील गरज ओळखून , जगातील पहिल्या बुलेटप्रूफ जॅकेटची निर्मिती केली होती , तसेच जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार केला , जझिरे - मेहरुब [ जंजिरा ] जिंकण्याकरिता महाकाय समुद्रात ८०० मीटर लांबीचा सेतू बांधला होता , आधुनिक शस्त्रांची निर्मिती सुद्धा राजे करत होते , स्वराज्याचे दारूगोळ्याचे कारखाने सुद्धा उभारले होते . हिंदवी स्वराज्याचे आरमार सुसज्ज करण्याकरिता परदेशातून तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य सुद्धा घेतले होते .
छत्रपती संभाजीराजे
, आदिलशाही आणि कुतूबशाहीचे पित्याप्रमाणे सांभाळ करत होते [ एका पोर्तुगीज अधिकारी याने लिहून ठेवले होते ] , तर राजे मोगलांचे कर्दनकाळ ठरले होते , आणि सिद्दी , पोर्तुगीज , टोपीकर इंग्रज यांना शक्तीच्या व प्रगल्भ बुद्धीच्या बळावर थोपवून ठेविले होते .
छत्रपती संभाजी
महाराजांनी प्रतिकूल काळातही , स्वराज्याला
आर्थिकदृष्ट्या संपन्न ठेविले होते . जगतगुरु
महान संतश्रेष्ठ तुकोबांच्या , " देहू ते पंढरपूर आषाढी वारीला संरक्षण आणि अर्थसाहाय्य दिले होते " .
एकंदर संपूर्ण भारत राष्ट्राचा , इतिहास अभ्यासला तर निष्कर्ष असा निघतो , महान व्यक्ती ही शास्त्रात किंवा शस्त्रात पारंगत असते , पण ह्या तत्वाला अपवाद ठरतात , मात्र " छत्रपती संभाजी महाराज " , त्यांनी जे महान ग्रंथ लिहले आहेत
[ बुधभूषण , नायिकाभेद , सातशातक , व
नखशिखान्त ] , त्या ग्रंथ अभ्यासल्यावर विश्वातील रहस्यांचा उलगडा होता , तर त्यांची रणांगणातील युद्धे अभ्यासली तर त्यांच्या पराक्रमाबद्दल स्तुती करण्यासाठी शब्द सुचतच नाहीत , ही व्यथा आहे , खुद्द औरंगजेब सुद्धा म्हणोन गेला की , " संभाजीला रणांगणात हरवणे नामुमकीन " .
शंभूराजांची युद्धनीती
, हा " जगविजेता संभाजी " , ह्या ऐतिहासिक माहिती दर्शविणाऱ्या फेसबुक पेजचा , अतिविशेष उपक्रम . ह्या उपक्रमात आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या युद्धनीतीचा [ युद्धशास्त्राचा ] अभ्यासूरीतीने विवेचन करणार आहोत , हा उपक्रम अनेक भागात विभागला आहे , त्यातील प्रथम भाग , " शंभूराजांचे चिक्कदेवरायास शासन " , ह्यावर प्रकाश टाकणार आहोत ....
|| भाग - १ ||
" शंभूराजांचे चिक्कदेवरायास शासन "
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ,
दक्षिणदिग्विजयानंतर , मराठ्यांचे दक्षिणेत , विशाल राज्य निर्माण झाले , हे राज्य आधीच्या स्वराज्यातील भूभागापेक्षा विशाल होते , ह्या विजयानंतर हिंदवी स्वराज्य दक्षिण प्रांतात देखील स्थापित झाले , राजांनी ह्या प्रदेशाची योग्य घडी बसविली होती , जाणती माणसं प्रशासनाकरिता राखली होती , आणि त्यासमयी शंभूराजांचे दुर्ग पन्हाळा वरून अगदी सूक्ष्म लक्ष दक्षिणेत होते . पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर , युवराज शंभूराजे , स्वराज्याचे द्वितीय छत्रपती झाले , त्यासमयी ह्या संपूर्ण दक्षिण प्रांताची जबाबदारी , छत्रपती संभाजी महाराजांनी , शूरवीर आणि स्वराज्यनिष्ठ हरजीराजे महाडिक ह्यांवर सोपविली होती [ हरजीराजे हे छत्रपतींचे जावई देखील होते ] , सप्टेंबर १६८१ रोजी औरंगजेब स्वतः जातीने ५ लाखाची फौज घेऊन चालून आला , त्यामुळे शंभुराजांना त्यावर लक्ष केंद्रित करणे अनिवार्य होते , म्हणोन राजांनी ह्या
प्रांताची समूळ जबाबदारी हरजीराजांस दिली , तसा आदेश , तेथील अधिकाऱ्यांस , किल्लेदारांस , आणि सुभेदार यांना दिला . हरजीराजे बुद्धिवान , तरबेज आणि महापराक्रमी होते .
दक्षिण प्रांतातील स्वराज्यास जोडून , म्हैसूर , तंजावर , इक्केरी , मदुरा , मरूडनाड ही राज्ये होती , ह्यात म्हैसूर राज्य तुलनेत बलवान होते . राज्यांबद्दल महत्वपूर्ण माहिती :-
(●) म्हैसूर : -
म्हैसूर हे एक मोठे राज्य होते , सन १६७२ मध्ये , चिक्कदेवराय वडियार हा राजा होता . चिक्कदेवराय हा महाधूर्त होता , दक्षिणदिग्विजयासमयी हा मराठ्यांना पुरता भिऊन होता , तरीसुद्धा हा फारच महत्वकांक्षी होता .
(●) तंजावर : -
सन १६७४ पासुन आलागिरी नायक हा तंजावरचा राजा होता , आलागिरी हा चोक्कनाथ [ मदुरेचा राजा ] ह्याचा सावत्र भाऊ होता . मुळात तंजावर हे राज्य विजापूरकरांचे मांडलिक राज्य , नंतर एकोजी राजे ह्यांनी आलागिरी ह्यास पदच्युत करून , स्वतःस तंजावरयेथे राज्याभिषेक करवून घेतला . एकोजी राजांनी उत्तम प्रशासन केले , आणि लोकप्रियता देखील मिळविली .
(●) इक्केरी : -
इक्केरी हे छोटे राज्य होते .
ह्या राज्याचा स्वामी हा शिवप्पा नायक होता .
शिवप्पा नायक हे अतिशय शिस्तप्रिय आणि उत्तम शासक होते , पुढे सन १६८९ मध्ये , छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीला जात असताना , ह्या राज्याच्या तत्कालीन महाराणीने राजांस मदत केली होती .
(●) मदुरा : -
मदुरेचा राजा हा चोक्कनाथ नायक होता , ह्याचे तंजावर राज्यसोबत भांडण होते , तर म्हैसूर राज्यासोबत सख्य होते .
(●) मरूडनाड : -
मरूडनाडचा राजा सूर्य ,
हा सन १६७४ मध्ये , आपला बाप तिरुमलाई
सेतुपती ह्याच्या खुनानंतर गादीवर आला ,
ह्या राज्यास रामनाड असेही संबोधित असत .
■ चिक्कदेवराय उच्छाद : -
चिक्कदेवराय वडियार हा
, म्हैसूरचा राजा , सन १६७२ रोजी झाला , छत्रपतींच्या दकाहींदिग्विजयामूळे हा मराठ्यांस चांगलाच भिऊन होता , पण हा खूप चलाख होता , त्याने ८ ते १० वर्षे सैन्यास गुप्त प्रशिक्षण दिले , त्याने युद्धाची पद्धत पुर्णतः बदलली , सैन्यबळ वाढविले , आणि धनुर्विद्येत त्याने त्याच्या सैन्यास निपुण बनविले , विशेष म्हणजे त्याची फौज त्याकरिता प्राणपणाने लढायची . त्याने धनुर्विद्या इतकी आत्मसात केली होती की , बाणांचे प्रकार , धनुष्य कशी असावीत , लांब पल्ला कसा गाठता येईल , ह्यावर त्याने यश मिळविले होते , तसेच ह्या काळात त्याने उत्तम योद्धे तयार केले , त्याचा सेनापती ' कुमारय्या " , हा देखील त्याच्यासारखा धूर्त आणि पराक्रमी होता . त्याने एकोजीराजांच्या सैन्याचा देखील पराभव केला होता , एकोजीराजे ह्यांनी आपली राजधानी जेव्हा बंगळूरहून तंजावरला हलविली , तेव्हा हा प्रबळ झाला , जोपर्यंत राजधानी बंगळूर होती तोपर्यंत म्हैसूरवर वचक होता .
(■) कुमारय्या आणि हरजीराजे यांचे
अपरिचित युद्ध : -
एप्रिल १६८२ , कर्नाटकात
श्रीरंगपट्टणकर व हरजीराजे , जैत्यजी काटकर
, दादाजी काकडे हे त्रिचनापल्लीस मदतीस धावून गेले . तेव्हा म्हैसूरकरांचा सेनापती कुमारय्या हा स्वतः त्रिचनापल्लीच्या विरोधात आघाडीवर होता . वास्तविक हरजीराजे आणि कुमारय्या हे दोघेही कुशल सेनानी होते ; परंतु कुमारय्या याचा असा समज होता की , आपणच युद्धकलेत निष्णात आहोत . मात्र हरजीराजे हे प्रतिभाशाली होते , थोडाही विलंब युद्धात घातकी ठरू शकतो , हे जाणत होते . शत्रू बघून रणनीती ठरवीत असत , तसेच शत्रूचे डावपेच पाहून हरजीराजे आपल्या डावपेचात लगोलग जरुरीचे ते बदल करत असत , असे दोन्हीही वीर युद्धकलेत निपुण असले , तरीही
दोघांच्या स्वभावात भिन्नता होती . ह्याप्रसंगी चिक्कदेवराय याने सैन्याची मोठी तुकडी तात्काळ म्हैसूरला बोलाविली , कुमारय्या याला आदेशाचे पालन करणे हे अनिवार्य होते , पण युद्धास पुरेसे सैन्य गरजेचे होते त्यामुळे कुमारय्याने , चिक्कदेवरायास खलिता पाठविला , " मला कुमकेची जरवत आहे " , आणि नेमकी हा खलिता मराठ्यांच्या हेरांच्या हाती लागला , आता मराठ्यांना कुमारय्याची नाजूक बाजू समजली , त्यावर हरजीराजे यांनी म्हैसूरकरांवर जोरदार हल्ला केला , हल्ला इतका जोरदार होता की , म्हैसूरकर कापले जाऊ लागले , आणि कुमारय्या पळ काढीत होता , पण नेमकी कुमारय्या मराठ्यांच्या तावडीत सापडला , पुष्कळ युद्धसाहित्य मिळाले ह्या विजयामुळे हरजीराजे ह्यांच्या नावाचा पूर्व कर्नाटकात दबदबा निर्माण झाला .
पुढे सरदार जैताजी काटकर , शंभुजी , दादाजी काकडे ह्यांनी म्हैसूरवर हल्ला केला , धर्मपुरीला वेढा घातला , पण चिक्कदेवराय ह्याने भयंकररित्या प्रतिहल्ला केला , त्यात मराठी फौजांचा दारून पराभव झाला , इतका की तेव्हा मराठ्यांचे आघाडीचे सरदार जैताजी काटकर [ ह्यांचे हात , पाय , नाक , कापून भूतांना अर्पण केले , पार हलाल करून मारले ] , दादाजी काकडे [ ह्यांचा गळा चिरला आणि मिरवणूक काढली ] ,शंभुजी यांचीदेखील अमानुषपणे हत्या केली . एकोजीराजे ह्यांचा प्रधान , यशवंतराव ह्याचा भरदरबारात नाक कापला . पुढे शंभूराजांनी एवढं होऊन सुद्धा बोलणी करण्यासाठी वकील पाठविला , तर त्यास त्याचे कपडे फाडून अपमानित केले आणि त्याचबरोबर संदेश पाठविला , " हिंमत कराल , तर शिक्षा करू " . हरजीराजांचे देखील चिक्कदेवरायापुढे काहीच चालले नाही . ही खबर दक्षिणप्रांतावरून राजधानी रायगडला येऊन धडकली छत्रपती संभाजी महाराजांस अपरिमित दुःख झाले , आणि त्यांनी कर्नाटक मोहीमेची तयारी सुरू करण्याचे आदेश कवी कलशांना दिले , तात्काळ बहिर्जी नाईक यांना कर्नाटकात पाठविले , कुतुबशाहीच्या वजीरास , बसप्पा नायकास खलिता पाठविला [ आर्थिक आणि सैनिकी सहकार्य देण्याबाबत ] , फौज सज्ज करा ....
रायगडावरून १० हजाराचे
घोडदळ घेऊन शंभूराजे , दक्षिणदिग्विजय करण्याकरिता निघाले , इकडे औरंगजेब ही विचारात पडला , त्याला राजांचे राजकारण काही केल्या समजेनात . राजांनी स्वराज्याची सर्व व्यवस्था अगदी नीटपणे लावली , संपूर्ण कारभार आणि अधिकार महाराणी येसूबाईसाहेबांस सुपूर्त केले , तसेच गडावर पेशवे निळोपंत पिंगळे , स्वराज्यनिष्ठ खंडोजी बल्लाळ [ चिटणीस ] , तसेच राजारामराजे देखील होते . रायगडावर तेव्हा २० हजाराची फौज राजधानी रक्षणार्थ होती . विशेष सरनौबत हंबीरराव ह्यांचदेखील सर्व घटनांवर सूक्ष्म लक्ष होतं , आणि कोकणात सरदार म्हालोजी घोरपडे ह्यांना शंभूराजांनी ठेविले होते , अशा प्रकारे राजांनी उत्तम व्यवस्था लावली होती .
■ राजे आले : -
जगात वेग म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असे समीकरण त्यावेळी होते , राजे अतिशय कमी वेळात बाणावर आले [ बाणावर हे चिकमंगळूरच्या ईशान्येस आणि चिकण्हळलीच्या पश्चिमेला होते ] , राजांनी बाणावर येथेच तळ ठोकला . सांगितल्यानुसार कुतुबशाही १० हजाराची फौज घेऊन आखिलखान आला , बसप्पा नायकसुद्धा ५ हजाराची फौज घेऊन आला , राजांनी स्वतः बसप्पा नायक आणि आखिलखानाची भेट घेतली . हरजीराजे सुद्धा आले होते , राजांनी त्यांची गळाभेट घेतली .
बाणावर येथे २५ हजार फौज होती , राजांनी हमल्याची रणनीती आखली , बरोबर दोन दिवसांनी हल्ला करण्याचे राजांनी योजिले होते . संभाजी आला ही खबर चिक्कदेवराय यास मिळाली , प्रथम
तो गोंधळला , तो ही अवाकच इतक्या जलद कसं काय , आणि बाणावर ला आला तोपर्यंत त्यास खबर कशी मिळाली नाही म्हणोन त्याने त्याचे गुप्तहेर खात्याच्या प्रमुखास कडवे बोल सुनावले . चिक्कदेवराय याने स्वतः पुढे चालून जाऊन संभाजीवर हल्ला करण्याचे ठरविले ,
तसा त्याने राजांना खलिता ही धाडला , तसे त्याने केलेच , चिक्कदेवराय १५ हजाराची फौज घेऊन आला , त्याने त्याच्या फौझेच्या बारीक बारीक ४ तुकड्या केल्या , ३ तुकड्या लहान होत्या मात्र ३०० सैनिकांच्या आणि दूर एका टेकडीवर उर्वरीत मोठी फौज दबा धरून बसली , दुसरा दिन उजाडला ठरल्याप्रमाणे सरदार वीरभद्र शिंग वाजवीत आला , राजे इकडे तयार होते , पण समोर बघतात तर ३०० तिरंदाज , युद्ध सुरू झाले बाणांचा हल्ला झेलत मराठी आणि मित्र पक्षांची फौज पुढे सरकत होती , कमी सैन्यबळ असल्याकारणास्तव चिक्कदेवरायाची फौज मागे सरकत होती ; पण
सर्व चिक्कदेवराय याने ठरविल्याप्रमाणे होत होत . आणि मराठी आणि मित्र पक्षाची फौज मुख्य टप्प्यात आली , तेथे दबा धरून बसलेली चिक्कदेवरायाच्या १४ हजार तिरंदाजांनी , अणकुचीदार बाणांचा वर्षाव केला , विद्युत वेगाने बाण मराठी फौजांच्या दिशेने आले , अचानक झालेल्या ह्या हल्ल्याने मराठी आणि मित्र पक्षांच्या फौझेच्या हाहाकार उडाला , आकाशातून येणारे बाण अचूक निशाणा साधत होते , ते विषारी बाण रपकन [ हा विशेष म्हणजे त्या बाणांवर विशिष्ठ प्रकारचे विष लावले होते , जेणेकरून प्राणांतिक वेदना शत्रूस व्हाव्यात ] सैनिकांच्या डोक्यात , मांड्यात , दंडात , घोड्यांच्या शरीरात रुतू लागले , असह्य वेदना होत होत्या , हैद्राबादी फौझेस जास्ती नुकसान झाले , त्यांची पळापळ झाली , अखेर राजे आखीलखानापाशी जाऊन त्या सर्वांस धीर देऊ लागले , हरजीराजे शंभूराजांजवळ आले , आणि त्यांस माघार घेण्याबाबत विचारणा केली , राजांनी त्यांस थोडा वेळ थांबण्यास सांगितले , अखेर संध्याकाळ झाली , युद्ध थांबले . " तलवारींवर , धनुष्यबाण भारी पडले " .....
चिक्कदेवरायाची फौज आनंदाने जयघोष करत गेली , इकडे मात्र असंख्य यातना , जवळपास ३०० मावळे , १५०० हून अधिक हैद्राबादी सैनिक , आणि नायकाचे ही बरेच सैनिक युद्धात मृत्युमुखी पडले , बहुतजण जखमी झाले .
त्याच दिवशी , एकोजी राजे ,
५ हजार फौझेनिशी आले . शंभुराजेंना एक मायेचा आधार मिळाला [ राजांनी स्वतःच्या हाती पत्र लिहून काकासाहेबांस पाठविले होते ] , राजांनी एकोजी राजांस नमस्कार केला , त्यावर एकोजीराजे ह्यांनी राजांना आशीर्वाद दिला , आजपर्यंतच्या शंभराजांच्या पराक्रमा -
- बद्दल काकासाहेबांनी अपार कौतुक केले . त्यादिवशी दोन्ही काका - पुत्र ह्यांनी एकत्र जेवण केले , आणि एकोजीराजे ह्यांनी अनेक गुप्त बातम्या संभाजी राजांस सांगितल्या , शंभूराजांनी त्यावर योग्य तो विचारविनिमय केला .
संभाजीराजांच्या पराजयाने , मोगली शामियान्यात औरंगजेब ह्यास फार आनंद झाला , त्याने चिक्कदेवराय ह्यास बिनशर्त मदत करण्याचे पत्र धाडले , तसेच शुजाहतखानाबरोबर फौज आणि नजराणा
देखील पाठविला , त्यामुळे चिक्कदेवराय ह्याचा आनंदही गगनात मावेना .
शंभूराजांनी जखमींच्या चिकित्सा करण्याकरीता योग्य ती व्यवस्था केली , आणि राजधानी रायगडावर एक गुप्त पत्र पेशवे निळोपंत ह्यांना पाठविले , पत्रात मजकूर असा होता की , " पेशवे तात्काळ अगदी सावधपणे ३ हजार तिरंदाजांचे पथक दक्षिणेत रवाना करा , त्यांसमवेत एका मातब्बर आसामीसही पाठवा "
, कर्तव्यदक्ष पंतांनी अत्यंत सावधपणे राजांच्या
आदेशाचे पालन केले . राजांनी झालेल्या पराभवाचे योग्यरित्या मूल्यमापन केले , आणि त्यावर राजांनी योग्य मार्ग काढला .
[◆] वैज्ञानिक शंभूराजांची रणनिती : -
छत्रपती संभाजी महाराजांना ,
विज्ञान , तंत्रज्ञान , निसर्ग , शस्त्रविद्या ह्यांबद्दल
उत्तम ज्ञान होते . राजांनी चिक्कदेवरायाचे हुकमी शस्त्र , म्हणजे तिरंदाजी युद्धकलेवर मार्ग काढला ,राजांनी एकतर चिक्कदेवरायाच्या बाणांना आव्हान म्हणून स्वराज्यातून तिरदाजांचे पथक बोलविले होते , पण ज्या चिक्कदेवरायाच्या बाणांना जे विष होते ते निकामी करण्याकरीता , कमाविलेल्या कातड्यापासून , त्यात आत जाळीदार लोखंडाचे अस्तर असे वातड , तशीच कातडी शिरस्तान बनविण्याचे योजिले , त्यानुसार राजांनी रायप्पा यास त्या सर्व परिसरातील चांभाराना एकत्र जमवायला सांगितले , तसेच ज्योत्याजी केसरकर यास त्या इलाक्यातून जेवढया नावा मिळतील त्याची जमवाजमव करण्यास सांगितले . स्थानिक भिल्ल , आदिवासी आणि चांभार ह्यांच्या साहाय्याने
वातड बनविण्याचे कार्य चालू होते . अशाप्रकारे
राजांनी चिक्कदेवरायावर मात करण्याचे ठरविले .
तळ श्रीरंगपट्टणला हलविण्याचे
ठरले , सैन्यबळ ही वाढले होते , तंजावरहून
५ हजाराची फौज तर आलेली आधीच होती , आणि बसप्पा नायक व कुतूबशाहीतून प्रत्येकी५ हजाराची फौज आली होती . १००० नावा ज्योत्याजीने जमा केल्या , त्यांवर घोडी लादण्यात आली , जड सामान नेण्याकरिता हत्तीच्या पथकाची हरजीराजांनी सोय केली .रात्रीच तळ उठला , सकाळी फौज श्रीरंगपट्टणच्या किल्ल्याजवळ पोहोचली . म्हैसूरकरांचा ह्या सर्वच गोष्टींवर विश्वास बसणे कठीण होते .पण हे वास्तव होते . किल्ल्यावर एदिरी एदिरी दुष्मन दुष्मन ओरडत होते , तटबंदीवरून
म्हैसूरकरांनी बाणांचा मारा सुरू केला , पण ह्यावेळी मराठे तयार होते , कातडी वातड चिलखत घालून , धनुष्यबाण घेऊन सैनिक पुढे सरसावले आणि प्रतिहल्ला सुरू झाला , गडावर चोक्कनाथ स्वतः होता , त्याची शिबंदी होते पण म्हैसूरकर अधिक होते आणि वर्चस्व त्यांचे होते , अचानक चोक्कनाथाचा मृत्यू झाला , त्यावर चोक्कनाथाचा एक वकील राजांस भेटावयास आला , आणि त्याने चोक्कनाथाचे पार्थिव मदुरेत नेण्यासाठी परवानगी दिली , राजांनी ती दिली , सर्व सहकाऱ्यांनी ह्या संधीचा फायदा घेऊन किल्ल्यात फौजा धाडण्याचा सल्ला शंभूराजांस दिला , परंतु राजांनी त्याला पूर्णपणे नकार दिला , राजे नीतीमत्ता अखंड धरून होते . पुढे काही दिवसांनी राजांनी १० हजार फौज किल्ल्याच्या आजूबाजूस पेरली , जवळचा खंदक बुजविला , गडावरून बाणांचा हल्ला पुन्हा सुरू झाला , मराठ्यांनी सुद्धा हल्ला सुरू केला , विशेष म्हणजे मराठे म्हैसूरकरांवर अग्नीबाणांचा वर्षाव करू लागले , सर्वत्र गडावर आग आग . लांब पल्ल्याच्या बाणांच्या माऱ्याने हमला जोरदार झाला , दारूच्या कोठाराला आग लागल्या कारणाने जोरदार भडका भरला , गस्तीच्या चौक्या जळल्या , मराठी सैन्य विद्युत वेगाने किल्ल्यात शिरले , आणि अजरपर्यंतच्या इतिहासात प्रथमच मराठी जरीपटका , भगवा ध्वज , श्रीरंगपट्टणच्या पाषाणकोटावर फडकला ..... ही बातमी एकूण औरंगजेब पूर्ण हतबल झाला .
शंभूराजांनी चिक्कदेवरायास पार एकटे पाडले , म्हैसूरमध्ये जाऊन लूट केली , मारवाडचा नायक त्यास मदत नाही करणार ह्याची दक्षता राखली , औरंगजेबाकडून त्यास मिळणारी रसद मोडली , मदुरेचा नवनिर्वाचित नायक इतका हुशार नव्हता , त्यामुळे राजांनी उत्तम राजकारण साधून चिक्कदेवराय यास
एकाकी पाडले , आणि त्याची शक्ती मूळ ताकद बाण आणि धनुष्य , पूर्णपणे कमी केली , त्यामुळे त्याने आपल्या प्रातिनिधिस , छत्रपती संभाजी महाराजांकडे तहाची बोलणी करण्याकरिता पाठविले , वास्तविक तो स्वतः शंभूराजांसमोर यायला प्रचंड भीत होता , वार्षिक एक मोठ्या रकमेची खंडणी द्यायची कबूल केली .
अतिशय कमी वेळात , छत्रपती संभाजी महाराजांनी दक्षिण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली .
■ संदर्भ ग्रंथ : -
●छत्रपती संभाजी महाराज ( श्री. वा. सी. बेंद्रे ) ,
● शिवपुत्र संभाजी ( सौ. कमळ गोखले ) , ●ज्वलनज्वलज्वतेजस संभाजीराजा ( डॉ . सदाशिव शिवदे ) ,
● मराठ्यांची इतिहासाची साधने ,
●ऐतिहासिक पत्रव्यवहार ,
●ऐतिहासिक बखरी , इंग्लिश दस्ताऐवज
● जेधे शकावली ,
● शिवकाल ,
● संभाजी ( श्री. विश्वास पाटील ) ,
● खरा संभाजी ( श्री. नामदेवराव जाधव ) ,
●इतर ग्रंथ .
=■=■=■●●●●●●■=■=■=
राजे अनेक झालेत , होतीलही परंतु छत्रपती संभाजी महाराजांसारखा , जगविजेता राजा होणे शक्य नाही ....
- शंभूमाहितीगार .
आजपर्यंत प्रकाशित झालेले , " जगविजेता संभाजी " , ह्या फेसबुक पेजवर प्रकाशित झालेले लेख : -
[◆] छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित : -
● जाणता राजा .
● दक्षिणदिग्विजय ते उत्तरदिग्विजय .
● बुऱ्हाणपुरचं धन .
● शंभूराजांची सिद्दीवर जरब .
● शंभूराजे व इंग्रज संघर्ष .
● छत्रपती संभाजी महाराज आणि शहजादा अकबर .
● अजिंक्य रामसेज .
● चौलची लढाई .
● तारापूरची लढाई .
● पुणे प्रांतावरील लढाई .
● मराठ्यांची मोगलांवर झडप .
● वैज्ञानिक शंभूराजे .
● स्वराज्यनिष्ठ शंभूराजे .
[◆] छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित : -
● छत्रपतींच्या विशेष युद्धनीती .
● पुरंदरचा रणसंग्राम .
● शिवराय【 समज व गैरसमज 】.
● राजपुती जोहार आणि शिवराय .
● शिवप्रताप【 गाथा शौर्याची 】.
● मराठ्यांचे लष्कर व्यवस्थापन .
[◆] ऐतिहासिक व्यक्तिविशेष लेख : -
● स्वराज्यसंकल्पक राजमाता जिजाऊसाहेब .
● हंबीररावांची स्वामीनिष्ठा .
● पेशवा बाजीराव - अद्वितीय योद्धा .
[◆] शिवबाचे शूरवीर ह्या उपक्रमाअंतर्गत : -
● शूरवीर येसाजी .
● शूरवीर तानाजी .
● शूरवीर कोंडाजी .
[★] विशेष लेख : -
● पानिपतचा महासंग्राम .
= =■●●●●●◆◆●●●●●■ = =
वरील सर्व लेख , आणि काही दुर्मिळ चित्रे
, काही महत्वपूर्ण चित्रफिती ह्या खाली दिलेल्या
लिंकवर आपण अभ्यासू शकता , एकवेळ लाईक नाही केले तरी चालेल पण , लेख अवश्य वाचा .
■ जगविजेता संभाजी लिंक : -
https://www.facebook.com/ जगविजेता-संभाजी-22124527290 12520/
" अखंड भारताचा विजय आहे " .
|| जय हिंद ||
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमाहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 /
व्हाट्सअप्प क्र. : 7741923346 .

https://www.facebook.com/
" अखंड भारताचा विजय आहे " .
|| जय हिंद ||
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमाहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 /
व्हाट्सअप्प क्र. : 7741923346 .
No comments:
Post a Comment