|| शंभूराजांची युद्धनीती ||
भाग - २
" शंभुराजांचा महाविजय "
【 मराठा - पोर्तुगीज संघर्ष 】
दि. २० मे १४९८ , ला वास्को - द - गामा , हा पहिला पोर्तुगीज भारताच्या भूमीवर आला , आणि पोर्तुगाल - भारत व्यापारास सुरुवात झाली , आणि अरबांच्या व्यापाराचा अंत झाला , बॉरथोलोम्यू डायस , नंतर यशस्वी प्रवासी , म्हणोन त्याचा पोर्तुगाल मध्ये , नावलौकिक झाला , सुरुवातीला पोर्तुगीज व्यापार
करत होते , हळूहळू प्रदेशावर राज्य करू लागले , गोवा ही पोर्तुगीजांची भारतातील राजधानी होती , आणि ही लोकं महाधूर्त होती .
■ औरंगजेबाचे राजकारण : -
औरंगजेब ५ लाख फौज घेऊन ,
दख्खन मध्ये उतरला , तो मोहिमांवर मोहिमा
आखत होता , पण यश काय मिळत नव्हतं ,
कारण छत्रपती शंभूराजांच्या युद्धनीतीपुढे त्याचं वा त्याच्या सेनापतींचं वा त्याच्या सेनेच काहीही चालत नव्हतं , अखेर औरंगजेबाने धोरण बदलले , त्याने पोर्तुगीजांना हाताशी घ्यायचे ठरविले . खरोखरच औरंगजेब एक मुरब्बी राजकारणी होता , पण नेहमी छत्रपती संभाजी महाराज , सर्वच बाबतीत एक पाऊल
पुढे होते .
औरंगजेबाने , पोर्तुगिजांचा व्हाइसरॉय , विजरई कोंद - दी - आल्व्हर , सोबत पत्रव्यवहार सुरू केला .... पत्रात औरंगजेबाने , पोर्तुगीजांना आज्ञा केली की , " संभाजीच्या मुलखात धुमाकूळ घाला , लुटा , जाळपोळ करा , जो मुलुख जिंकाल तो कायमस्वरूपी तुमच्या अधिपत्याखाली राहील , तसेच लवकरच आम्ही कोकणवर स्वारी करणार आहोत , त्यामुळे कोकणप्रांत ही तुम्हांस आम्ही स्वाधीन करू ....
औरंगजेबाचे शाही पत्र मिळाल्यानंतर , व्हाईसरॉय अत्यंत खुश झाला ,
कोकण प्रांत पोर्तुगीजांच्या साम्राज्याला जोडणे
ही धूर्त पोर्तुगीजांची खूप आधीपासून इच्छा होती . लगोलग व्हाईसरॉय मराठ्यांच्याविरुद्ध
कुरघोड्या काढू लागला .
■ पोर्तुगीज व्हाईसरॉयबद्दल माहिती : -
व्हाईसरॉय फ्रान्सिस्कु द तांव्हर कोंद - दी - आल्व्हर , हा शूर व घमेंडी होता , गोव्याला येण्यापूर्वी स्पेनविरुद्ध झालेल्या अनेक लढायांत त्यानं भाग घेतला होता , तो याआधी आंगोलचा गव्हर्नर होता , युद्धविषयक त्याचा अनुभव दांडगा होता ; त्यामुळेच पुढे सन १६८१ मध्ये गोवा येथे व्हाईसरॉय झाला होता . सुरवातीला शंभूराजे आणि आल्व्हर ह्यांच्यात संबंध बरे होते , पण नंतर आल्व्हरने आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली ; कारण शंभूराजांचे सैन्य पळपुट्या शिपायांनी भरलेलं आहे , अशी त्याला गुप्त पण खात्रीशीर खबर मिळाली होती , आपल्या कवायती शिपायांच्या आणि मजबूत तोफांच्या भरवशावर आपण शंभुराजांचा सहज
पाडाव करू शकू , अशी त्याला खात्री होती . त्याच्या हालचाली वाढल्या होत्या , तो मोगलांस प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करू लागला , किनाऱ्यावरील मराठा मुलखात विनाकारण त्रास देऊ लागला , तेथील हिंदूंच्या मंदिरांना उपद्रव देत असत , आपल्या देवांच्या सुंदर मूर्त्यांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवित होत्या , स्त्रीया - मुलांना पळवून नेत असत , सक्तीने धर्मपरिवर्तन करवून घेत असत , त्यामुळे राजांनी पोर्तुगीजांना धडा शिकविण्याचे ठरविले ....
■ पोर्तुगीजांचे राज्य : -
फिरंगी पोर्तुगीजांचे किनाऱ्यावरील राज्य , दोन विभागात विभागले होते : -
भाग - १ : गोवाप्रांत ,
भाग - २ : उत्तरकोकणातील चौल ,
वसई , व ,दमण .
■ पोर्तुगीजांचे धोरण : -
सुरवातीला पोर्तुगीज मराठ्यांशी , मैत्रीचे संबंध जोडून होते , नंतर व्हाईसरॉयने सन १६८२ च्या डिसेंबरमध्ये , स्वराज्यावर हल्ला केला , आणि मोगली सैन्यास काही सवलती व वाट दिली , पोर्तुगीजांनी इतकी लगोलग आणि उतावेळपणे मदत केली की ह्याचे उत्तर आपणांस व्हाईसरॉयने औरंगजेबास पाठविलेल्या पत्रातून मिळते , पत्रात व्हाईसरॉय लिहितो , " मी आमच्या उत्तरेकडील प्रदेशाचे कॅप्टन दो मानूएल लोबु द सिलव्हेरा , तसेच चौल , वसई , व , दमण या तिन्ही ठाण्यांच्या कॅप्टनला पत्रे पाठवून आपल्या राज्यात जीवनो - पयोगी वस्तू खरेदी देण्यास परवानगी देण्याबाबत लिहिले होते . तसेच आपल्या नौकांना
आमच्या नद्यांतून वाहतूक करू देण्याकरिता आमच्या अधिकाऱ्यांना सूचना पाठविल्या होत्या [ ह्याचा औरंगजेबाला फायदा असा झाला की , त्याला उत्तरेतून व सुरतेतून मोठ्या प्रमाणात रसद जहाजामार्फत येणार होती ] , मला आशा आहे की आपणाकडून या राज्याला
उदार सवलती प्राप्त होतील " . एकंदर मराठा - मोगल संघर्षातून जेवढा अधिक फायदा आपला होईल तेवढा जमेल तसा , जमेल त्या मार्गाने करून घ्यावा असा पोर्तुगीजांचा मनसुभा होता , तर पोर्तुगीजांमार्फत संभाजीवर मात करणे , हा औरंगजेबाचा मनसुभा होता ....
■ रायगड : -
पोर्तुगीजांच्या हालचाली , त्यांनी केलेला मायमाऊलींवर केलेला अत्याचार , रयतेचे केलेले अतोनात हाल , जाळपोळ , लुटालूट , धर्मपरिवर्तन , शेतीची वा भूमीची हानी , त्यामुळे राजांनी उत्तरकोकणात चौल या पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यावर हल्ला करण्याचे ठरविले
■ चौलवर हल्ला : -
शंभूराजांनी , चौलच्या ठाण्यावर , हमला करण्याची अचूक मोहीम आखली . या मोहिमेसाठी राजांनी निळोपंत पेशवे यांच्या नेतृत्वाखाली अंताजी भास्कर , नागोजी वाघमारे , आणि जाणोजी फर्जंद हे स्थानिक ( तसेच पराक्रमी ) सरदार होते . यांनी चौलच्या ठाण्याबाहेर तट बांधून त्या तटाच्या साहाय्याने मराठी फौजांना , पोर्तुगिजांवर हल्ला करायचा अशी रणनीती आखलेली व सर्व काही त्या प्रमाणेच घडले (तट बांधून झाला) .
पेशव्यांच्या नेतृत्वाखाली , मराठे जोरदार हल्ला करत होते , चौलच्या कोटातील कॅप्टन पुरता हादरून गेला , त्याने व्हाईसरॉय मदत मागीतिली . हा लढा जून १६८३ पर्यंत चालूच होता , जवळपास ६ महिने मराठे - पोर्तुगीज यांमध्ये चकमकी होत होत्या , दस्तुरखुद्द छत्रपती संभाजी महाराज सुद्धा चौल ला आले होते . लढाई चालूच होती .
दि. ८ फेब्रुवारी १६८३ च्या , अखबरातून ह्या गोष्टीस दुजोरा मिळतो . बहादूरखान कळवितो , " फिरंग्यांचे २ किल्ले संभाजीने घेतले . त्याचा विचार आहे की तोफखाना तयार ठेवून सुरतेहून माझ्याकडे [ कल्याण ] येणाऱ्या जहाजास आडवावे .
म्हणोन मी सिद्दी याकूतखानास जमेतीसह तिकडे पाठविले आहे , नंतर खानाने एक किल्ला पाडून अनेक लोकांस मारले . किल्ला हाती आला नाही म्हणोन मी मोहरमच्या २७ तारखेस लढाई केली ; अनेकांना मारले , किल्ला पाडून टाकला , नंतर कल्याण-भिवंडीला आलो , माझ्याकडे येणाऱ्या जहाजांची ये - जा चालू आहे 【 वास्तविक , हे सरदार मंडळी बादशहाला , खोटा पराक्रम , विजय सांगत असत , बादशहा सुद्धा हे सर्व पुरता ओळखून होता , त्यात बहादूरखान ह्या सर्वच
बाबतीत अग्रेसर होता 】.
[◆] पोर्तुगीजांच्या हालचाली : -
पोर्तुगीज ही कुरापती करत होते ,
फिरंग्यांनी वेंगुर्ल्याच्या व्यापाऱ्यांचे कर्नाटकातून येणारे तांदुळाचे आणि मचवे गोव्यात पळविले . येवढ्यावरच थांबले नाहीत , मराठ्यांचा गोवे प्रांतातील वकील येसाजी गंभीरराव ह्याच्या तेथील घरावर पहारा बसविला , येसाजींच्या बारीक हालचालींवर त्यांची सूक्ष्म नजर होती . येसाजींनी ह्याची तक्रार गव्हर्नरकडे केली , पण
त्याचा वास्तविकपणे फायदा झाला नाही , त्यावर उत्तर म्हणोन , १६ मे च्या पत्रातून दिले आहे , " आपले स्वामी संभाजीराजे यांच्या सैन्याने आमच्या उत्तरेकडील प्रदेशात , जाळपोळ व लुटालूट केली , त्याचे उत्तर म्हणून तुम्हांस कैदेत ठेवणे भाग पडले आहे , आमच्या राज्यातून जाणारे मचवे व गलबते पकडली . तारापूर , सिरिगाव , साबाज या आमच्या ठाण्यांवर हल्ले केले . दोन पादऱ्यांना कैद केले , आमचे साष्टी व बारदेश या प्रांतात जाणारे गोणीचे बैल सोडल्याशिवाय आम्ही आपणांस डीचोलीस जाऊ देणार नाही ....
चौलचा लढा चालूच होता , पोर्तुगीज कॅप्टन दोम फ्रान्सिस्को द कोस्त हा होता , हा लढवय्या होता , त्याने आपल्या कोटाच्या दोओसिंग ह्या बुरूजावरून तोफा चढवून मराठ्यांनी उभारलेल्या तटावर मारा केला , तटाची पडझड झाली , पण मराठेही कमी नव्हते , अंताजींनी लगोलग चौलच्या कोटावर तोफा डागल्या , आता दोन्ही बाजूंनी तोफगोळ्यांचा मारा चालू होता , मराठ्यांनी कोटाची चांगलीच नुकसानी केली होती . लढाई चालूच होती .
■ तारापूरवर हल्ला : -
चौलच्या हल्ल्यानंतर राजांनी , वसई , डहाणू आणि तारापूर या फिरंग्यांच्या ठाण्यांवर हल्ला करण्याचे ठरविले . राजांनी आपापल्या मातब्बर सरदारांस , व्यवस्थित रणनीती समजावून , फौज देऊन पाठविले , ह्या ठाण्यांवर मराठ्यांनी मजबुत हल्ले चढविले . तारापूर सतत ८ दिवस मारा चालू होता , मराठ्यांची ३ हजाराची फौज [ १ हजार घोडदळ व २ हजार पायदळ ] " हर हर महादेव " चा जयघोष करत लढत होती , अनेक खेडी मराठ्यांनी उध्वस्त केली , तसेच १ जेजुईट आणि १ फ्रान्सिस्कन पाद्री मराठ्यांनी कैद केला . तारपूरचा कॅप्टन इमन्यूअल अलव्हरीस हा ही मराठ्यांवर प्रतिहल्ला चढवीत होता , पण मराठ्यांपुढे काहीही चालत नव्हते . पुढे मराठयांनी रेवदंड्याच्या कोटावर चालून जाण्याचे दिसते .
(●) काही महत्वपुर्ण नोंदी : -
● जेधे शकावलीतील नोंद : -
शके १६०५ ज्येष्ठ वद्य ११ , संभाजीराजे स्वार होऊन राजपुरास
गेले . फिरंग्यांशीही बिघाड केला . रेवदंडीयासी
ही वेढा घातला . 【 १० जुलै , १६८३ 】
● ३१ जुलै , १६८३ ला , सुरतकर टोपीकर ,
मुबाईकरांना कळवितात , " संभाजीराजे व
पोर्तुगीज यांचे वैर झाले आहे . आम्हाला समजले की , राजाने मोठ्या सैन्यानिशी चौलास
वेढा घातला असून , तो ते घेण्याच्या बेतात आहेत .
अशा समकालीन नोंदी आहेत .....
उत्तरकोकणातील सर्व भाग हा जनरल दोमानुयल लोबुदसिंन्हेर हा होता . रेवदंडा , चौल , इ . हा त्याच्या अखत्यारीत होता . त्यासमयी त्याच्याजवळ शिबंदी कमी प्रमाणात होती , मराठ्यांनी ह्याचा बरोबर फायदा घेतला , ' मराठे फिरंग्यांची मोठ्या प्रमाणात हानी करत होते , पण स्त्रिया , लहान मुलांस अजिबात त्रास देत नव्हते ' , जनरल व्हाईसरॉय ज्यादा कुमक आणि रसदेची मागणी करत होता , पण ते शक्य नव्हते . परंतु त्याला
त्याच्या विनवणीखातर सिद्दीने मदत केली .
【■】लांडग्यांचा छाव्याला पकडण्या कट : -
श्रावणात गोकुळ अष्टमीला , भतग्रामातील नार्वेयेथे , श्रीसप्तकोटीश्वराच्या
मंदिरात , श्रींचे दर्शन घेण्याकरिता शंभूराजे
थोरल्या महाराजांसोबत येत असत , श्रींचं दर्शन
घेऊन , जवळील पवित्र पंचगंगा नदीत स्नान करीत असत , नार्वे गाव हे हिंदवी स्वराज्याच्या अखत्यारीत येत असत . दि. १२ ऑगस्ट १६८३ ला , राजे श्रीसप्तकोटीश्वराच्या मंदिरात , येणार आहेत तेही निवडक फौझेनिशी अशी पक्की खबर , व्हाईसरॉयला मिळाली होती . त्यावर त्या पाताळयंत्री व्हाईसरॉयने राजांना श्रीसप्तकोटीश्वराच्या मंदिरायेथे , अनपेक्षितरीत्या छापा टाकून कैद करायचे , आणि बादशहा औरंगजेब अशी योजना आखली . व्हाईसरॉयने अगदी सूक्ष्म विचार करून योजना आखली होती , १२ तारखेला स्वतः व्हाईसरॉय आपल्या फिरंगी फौझेसह , नारव्याला आला ; परंतु त्याच्या दुर्दैवाने , छत्रपती संभाजी महाराज , नार्वे येथे आले नसावेत , याकारणास्तव व्हाईसरॉयचा मनसुभा सफसेल फसला , शंभुराजांना व्हाईसरॉयच्या योजनेबद्दल माहिती गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी दिली होती , त्याप्रमाणे राजांनी नारव्याला येण्याचे टाळलेले
दिसते ....
■ रौद्रशंभूराजे : -
व्हाईसरॉयच्या कताबद्दल
छत्रपती संभाजी महाराज फारच संतापले , आणि मावळेसुद्धा फिरंग्यांवर भडकले होते . राजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशात , पराक्रमी सरदार पाठवले , आधीच मराठी फौजा पाठवल्या , पेशवे पण उत्तरकोकणात होते , राजांनी खलिता पाठविला , फिरंग्यांचे मुलुख मारण्याचे आदेश पाठविले ८ हजाराची फौज पाठविली . मराठ्यांनी उत्तरकोकणात प्रचंड
धुमाकूळ घातला , जाळपोळ केली , व्हाईसरॉय
कडे रोज मदतीकरिता खलिते जाऊ लागले .
पण व्हाईसरॉयला कुमक पाठविता येत नव्हती.
चौल , तारापूर , वसई , रेवदंडा प्रदेशात मोठ्या
चकमका मराठे आणि फिरंग्यांमध्ये होत होत्या ,
इकडे औरंगजेब विचार करीत होता , अरे काय
हे मराठे आहेत , जिकडे जातात तेथे विजय
मिळवितात , म्हणून तो ही चिडला होता . पण
विजरई हतबल होता ....
■ फोंडयाचं युद्ध : -
मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या उत्तरेकडील प्रदेशाची केलेली हालत पाहून विजरई पुरता संतापला , तो उत्तर प्रदेशात मराठ्यांवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता , आणि तेथील पोर्तुगीज फिरंग्यांस मदतही पाठवू शकता नव्हता . त्यामुळे त्याने फोंडा दुर्गावर हमला करण्याचे योजिले , जेणेकरून की , मराठ्यांचे लक्ष फोंडयाकडे केंद्रित केलं जावं , असा त्या व्हाईसरॉयचा डाव होता .
● फोंडा दुर्गाबद्दल माहिती : -
दुर्ग अतिशय मजबूत बांधणीचा , तसेच भिंती रुंद व जाड होत्या , तटबंदीदेखील अभेद्य होती , बुरूज वर्तुळाकार रचनेत होते . दि. १६ मे १६७५ ला , फोंडा दुर्ग , छत्रपती शिवरायांनी जिंकला ; त्यामुळे अंत्रुजा , बाळी , चंद्रवाडी , अष्टगार , हमाडबासे , काकोडे , सांगे , केपे आणि काणकोण हे महाल हिंदवी स्वराज्यात आले होते . किल्ला एकंदरीत मजबूत स्थितीत होता , कारण शिवरायांनी स्वतः त्यात काही बदल करून त्यास प्रबळ बनविले होते .
दि. २७ ऑक्टोबर , १६८३ रोजी ,
व्हाईसरॉय आगाशीजवळ १२०० पोर्तुगीज शिपाई , २५०० साष्टीतील शिपाई , ३ नामचिन कॅप्टन तसेच ६ आधुनिक तोफा आणि गरजेचे युद्धसाहित्य व धान्यसामग्री यांसह पोहोचला . पुढे त्याने दुर्भाट घेतले [ इथे फितुरी झाली होती ] , दुर्भाट हे बंदर याआधी मराठ्यांकडे होते . त्यावेळी ३०० मराठे फिरंग्यांवर चालून गेले मात्र फिरंग्यांच्या सैन्यबळापुढे मराठ्यांस माघार घ्यावी लागली .
पुढे दि. १ नोव्हेंबर १६८३ रोजी ,
व्हाईसरॉय आपल्या फिरंगी फौझेनिशी फोंडया
- दुर्गाजवळ आले , त्यासमयी फोंडयाचे किल्ले - दार , पायदळाचे सेनापती , शूरवीर येसाजी कंक होते , तसेच त्यांच्याबरोबर त्यांचे पराक्रमी पुत्र कृष्णाजी कंकही होते , आणि ६०० मावळे होते , व २०० मावळे नजदिकच्या जंगलात होते . त्यावेळी शंभूराजे राजापूर येथे होते .
व्हाईसरॉयने फोंडा दुर्गाच्या , महादरवाज्याच्या बरोबर समोरील टेकडीवर त्याने तोफा डागल्या , आणि इशारा देऊन मारा सुरु केला . गडावरूनही तीव्र प्रतिकार होत होता , सलग ३ दिवस तोफगोळ्यांचा वर्षाव हा चालूच होता , पण तटबंदी काही केल्या पडत नव्हती , मात्र एक बुरूज ढासळला , येसाजी हे योग्य नियोजनपद्धतीने किल्ला लढवीत होते . व्हाईसरॉयने त्याच्या कॅप्टनला खंदक बुजविण्याचा आदेश दिला , कॅप्टनने कानडी लोकांच्या मदतीने बुजविला . गडावर येसाजी आणि मर्द मराठे पराक्रमांची शर्थ करत होते , व्हाईसरॉयने ही हल्ला तीव्र केला , आणि
तोफांच्या प्रभावी माऱ्यामुळे तटबंदीला बगधाड पडलं आता मराठ्यांच्या चिंता वाढल्या , तरीही चिवट मराठे किल्ला लढवीत होते , आता त्या तटबंदीच्या आतून शिरणार , व अखेरचा हल्ला करणार असा फिरंग्यांचा डाव होता आणि तितक्यात विजरईच्या सैन्याच्या मागून प्रचंड धुळीचे लोट उठले , येसाजी बुरूजावरून दुर्बिणीच्या मदतीने बघत होते , आणि पाहतात
तर काय , स्वतः धनी !!!!!! शंभुराजांना पाहून
येसाजींचा आनंद गगनात मावेना , राजे १५०० घोडदळ आणि निवडक पायदळानिशी आले , आता फिरंगी चांगलेच फसले . शंभूराजे स्वतः आलेत हे फिरंगी सैन्याला कापर फुटलं , यांच्यात प्रचंड घबराट निर्माण झाली , राजांनी विद्युत वेगाने फिरंग्यांवर आक्रमण केले . राजांना बहिर्जी नाईकांनी एक गुप्त खबर दिलेली की , रणांगणात व्हाईसरॉय नेमकी कुठे होता , राजांनी ते स्थान बरोबर हेरले , मराठे - फिरंगी सैनिकांत युद्ध सुरू झाले ,मराठे त्वेछाने लढत होते , राजांनी व्हाईसरॉय फ्रान्सिस्कु द तांव्हर कोंद - दी - आल्व्हर याला , एका
घोड्यावर बसून लढताना पाहिले , राजे त्याच्यावर चालून गेले , एक वार केला , पण व्हाईसरॉय वाचला , त्याला त्याच्या कॅप्टनने सुरक्षित जागी लगोलग हलविले , 【 परंतु सांगायची गोष्ट तो वार थोड्या अंतराने हुकला ,
वार हा विजरईच्या मानेवर होणार पण त्याने मान मागे वळविली , व तलवार ही त्याच्या शिरस्थानाला लागून , तो ज्या घोड्यावर बसला होता त्याच्या मानेवर तलवारीचा घाव बसला , आणि घोड्याची मान ही जमिनीवर पडली ,
हे पाहून विजरईला प्रचंड धडक बसली , कदाचित त्याने विचार केला असावा , अरे एका वारात जो आपल्या घोड्याची गर्दन कलम करू शकतो , जर तो वार आपल्यावर झाला तर काय होईल ? किती भयावह असेल ते ?????】, आणि रणसंग्राम चालू होता , अखेर अंधार पडला आणि युद्धविराम झाला .
व्हाईसरॉयने त्या दिवशी ,
रणांगणातील शंभूराजांना पाहून , त्यास चांग -
- लीच वचक भरली , त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला , ह्या आदेशामुळे फिरंगी सैन्यास खूपच बरे वाटले आणि दि. १० नोव्हेंबर १६८३ रोजी , फोंडयातून पळ काढला .
कृष्णाजी कंक यांनी , निवडक फौझेनिशी विजरईचा पाठलाग केला , दुर्भाट येथे चकमक झाली , दुर्भाटच्या नजदिक टेकडीपाशी काही फिरंगी सैनिक दबा धरून बसले होते , जेव्हा विजरईचा पाठलाग करत करत मराठे त्या टेकडीजवळ आले , विजरई निसटताना दिसला , तेव्हा कृष्णाजी कंक
तेज गतीने चालून गेले , पण टेकडीवरील फिरंग्यांच्या टप्प्यात जसे मराठे आले , तसा बंदुकीने मारा सुरू झाला , कृष्णाजी आघाडीवर होते , मारा अतिशय प्रभावी असल्यामुळे कृष्णाजी आणि काही मावळे जब्बर जखमी झाले . कृष्णाजी कंक यांना अनेक गोळ्या लागल्या होत्या , मराठ्यांना त्यासमयी माघार घ्यावी लागली , त्यांना गडावर आणण्यात आले . सर्व जखमींवर तातडीने उपचार सुरू झाले , कृष्णाजी यांच्या जखमा काही केल्या भरून येत नव्हत्या , अखेर त्यांनी गडावर देह ठेवला , मावळे सुद्धा धारातीर्थी पडले , तर अनेक मावळे जखमी झाले , राजांना अपरिमित दुःख झाले , राजांनी येसाजी कंक यांचे सांत्वन केलं .
फोंडयाजवळ पोर्तुगीजांचा
छत्रपती संभाजी महाराजांनी दारून पराभव केला , तो इतका जबरदस्त होता की , पोर्तुगीज फिरंग्यांना मराठ्यांनी पळून पळून मारलं ........इतका भीषणरीत्या पराभव प्रोतुंगीजांना स्वीकारावा लागला होता ,मराठ्यांनी पोर्तुगीजांचे बहुत युद्धसाहित्य जप्त केले होते . पुढे २ ते ३ दिवस राजे फोंडा दुर्गावरच होते .
फोंडयाच्या लढाई नंतर , छत्रपती संभाजी महाराज राजधानीकडे जातील असा , व्हाईसरॉयचा कयास होता , पण संभाजी महाराजांनी कडक शासन करण्याचे ठरविले होते . राजांनी दि. २४ नोव्हेंबर , १६८३ रोजी , गोवे प्रांतातील जुवे बेटावरील कोट व एकंदर प्रदेश हस्तगत केला . ही खबर जेव्हा गोव्यात समजली तेव्हा तिकडे हाहाकार उडाला , कारण आता फक्त खाडी ओलांडली की , मराठे राजधानी गोव्यात प्रवेशणार होते , आणि मराठ्यांचं शौर्य पाहून
फिरंगी सैनिकांत , मराठ्यांबद्दल प्रचंड दहशत होती , " हे व्हाईसरॉय जाणून होता " .
व्हाईसरॉयने त्याच्या युद्धमंडळाची तात्काळ बैठक घेतली , आणि मराठ्यांनी खाडी ओलांडण्याच्या अगोदर आपणाचं त्यांच्यावर हल्ला करून रोखू जेणेकरून पोर्तुगीजांची राजधानी गोवा वाचविता येईल हा मनसुभा होता .
त्याप्रमाणे व्हाइसरॉय आपल्या फौजेसह मराठ्यांवर , जुवे बेटावर चालून आला , राजांनी त्याला आत येऊन दिले . आणि मराठ्यांनी जो प्रतिहल्ला केला , त्याचे वर्णन करणे महाकठीण , मराठे पोर्तुगीजांना सपासप कापत होते , खंडोजी बल्लाळ ह्यांनी तर मोठा पराक्रम गाजविला होता . फोंडयाप्रमाणे , पोर्तुगीजांनी पळ काढावयास सुरुवात , व्हाईसरॉय जेव्हा पळत होता , तेव्हा राजांनी त्याचा पाठलाग सुरू केला , काही अंतरावर त्याकरिता बोटीची व्यवस्था केली होती . अखेर त्याने बोट गाठली . व्हाईसरॉय होडीतून बसून गोव्यात जाण्याच्या बेतात होता , तितक्यात त्याची नजर तेज घोड्यावर स्वार होऊन येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज , यांच्याकडे गेली तो होडीत बसून निघाला , राजेही पाण्यात उतरले ते ही घोड्यानिशी , तेवढयात राजे खूप पुढे गेले , पाण्याचा प्रवाह खूपच जोर धरत होता , व्हाईसरॉय देखील खूप पुढे होता , राजेही पाठलाग करनारच पण खंडोजी बल्लाळ यांनी घोड्यावरून उडी मारली , आणि पोहून राजांच्या घोड्याचा लगाम खेचला व राजांचा जीव वाचविला ; कारण निसर्गापुढे कोणाचंही काही चालत नाही . व्हाईसरॉय ह्यावेळी जखमी
झाला होता , केवळ दैव चांगले म्हणोनिच तो
वाचला , तसेच चिटणीस खंडोजी बल्लाळ यांची स्वामिनिष्ठा उल्लेखनीय आहे .
पुन्हा मोठा पराभव पत्करून
, पळ काढीत , व्हाईसरॉय गोव्यात आला , त्यासमयी राजधानीची परिस्थिती अशी झाली होती , ह्याचे सुरेख वर्णन , पोर्तुगीज कागदपत्रांच्या आधारे सरदेसाई यांनी केले आहे , सरदेसाई म्हणतात , " इकडे व्हाईसरॉयने जुवे
बेटातून पळून शहरात प्रवेश केला , तेव्हा शहरात सर्वत्र घबराट माजल्याचे त्याला आढळून आले , सैनिकांचा धीर प्रचंड खचला होता , ते मराठ्यांशी लढण्याच्या मनस्थितीत नव्हते , ते पाहताच व्हाईसरॉयही गर्भगळीत
झाला . त्याला काही सुचेना , तेव्हा त्याने सेंट झेवीयरला शरण जायचे योजिले , आणि तो चर्चकडे निघाला , त्याच्याबरोबर लोकांचा मोठा एक जमाव होता . सगळेजण मशाली पेटवून सेंट झेवीयरची शवपेटी ज्या तळघरात ठेवलीहोती , तिथे जाऊन त्यांनी ती शवपेटी उघडली . व्हाईसरॉयने आपला राजदंड आणि इतर राजचिन्हे झेवीयरच्या पायापाशी ठेविले , तसेच
त्या राजचिन्हाबरोबर , व्हाईसरॉयच्या सहीचा एक कागद होता , त्या कागदाच्या वतीने त्याने गोव्याचे राज्य सेंट झेवीयरला अर्पण केले , व त्याने चमत्कार करून शत्रूला माघारा परतवून लावावे , अशी याचना केली होती . विजरई मग झेवीयरच्या डोक्याजवळ गेला व डोळ्यात
अश्रू आणोन त्याने त्याची करुणा भाकली " .
खाडीला पाणी खूप प्रमाणात वाढले होते , पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी तेथूनच दि. २६ नोव्हेंबर , १६८३ ला माघार घेतली , इकडे फिरंग्यांना वाटले की त्यांचा सेंट झेवीयरनेच चमत्कार घडवून आणला , त्यानेच ह्या मराठ्यांच्या संकटापासून
रक्षिले . पुढे खरतर गोवा घेण्याचा बेत होता , परंतु शहा आलम कोकणातून गोव्याच्या दिशेने चालून येत होता , त्यामूळे राजांना मोहीम आवरून येणे बंधनकारक होते , आणि पुढे मराठा - पोर्तुगीज यांमध्ये तह झाला .
■ तह : -
दि. ७ जानेवारी १६८४ रोजी ,
पोर्तुगीज वकील , मॅन्युएल सारयव्ह द अलबु
केकी , हा तहाच्या कामाकरिता मराठ्यांकडे
आला होता . प्रत्यक्ष तह मात्र फोंडा येथे , दि. २५ जानेवारी , १६८४ रोजी झाला , ह्या तहाच्या समयी शहजादा अकबर आणि कवी कलश , राय किर्तीसिंग , आणि महादजी नाईक उपस्थित होते , ह्यावेळी पोर्तुगीजांनी , छत्रपती संभाजी महाराजांस आणि शहजादा अकबर यांस बडा नजराणा पेश केला होता .
[●]तहाच्या अटी : -
● छत्रपती संभाजी महाराजांनी , पोर्तुगीजांचे
जे प्रदेश व किल्ले हस्तगत केलेत , ते तेथील
तोफा , हत्यारासाहित परत करावेत .
● युद्ध सुरू झाल्यापासून व त्यापूर्वी जी एकमेकांची जहाजे एकमेकांनी घेतली असतील
, ती सामानासाहित परत करावीत .
● उभयतांनी पकडलेले कैदी सोडून द्यावेत .
● वसईच्या मुलखातील गावखंडी व दमण प्रांतातील चौथाई ज्याप्रमाणे रामनगरच्या राजाला देत असत त्याप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजांस देणे , त्याबदल्यात छत्रपती संभाजी महाराजांनी त्या प्रदेशाचे रक्षण करणे .
● उभयतांना एकमेकांच्या मुलखात पूर्वीप्रमाणे
व्यापारास मोकळीक असावी , व एकमेकांच्या
प्रदेशातून व्यापारानिमित्त सामानासह जाण्या - येण्यास कोणतीही अडचण नसावी .
● पोर्तुगीजांच्या किल्ल्यातील तोफखानाच्या
संरक्षणाखाली धाण्यसामग्री घेऊन मुघल फौझेकडे जाणाऱ्या जहाजांना पोर्तुगीजांनी परवानगी देऊ नये . पण ज्या प्रदेशात पोर्तुगीजांचा तोफखाना नसेल तेथे हे कलम लागू होणार नाही .
● छत्रपती संभाजी महाराजांनी कोला येथे सुरू
केलेल्या दुर्गाचे काम थांबवावे .
● जे कोकणातील देसाई छत्रपती संभाजी महाराजांच्याविरुद्ध बंड करून गोव्यात आले
होते , त्यांना माफी देण्यात यावी .
● पोर्तुगीजांच्या सीमांशेजारी , छत्रपती संभाजी
महाराजांनी किल्ला बांधू नये .
त्यावेळेस राजे तेथे नव्हते , त्यामुळे
राजांनी स्वाक्षरी नंतर केली असावी , तहनाम्यावर ....
■ पोर्तुगीजांच्याविरुद्ध मोहिमेबद्दल मत : -
जगाच्या इतिहासात , पोर्तुगीजांचा
एवढा मोठा आणि अपमानजन्य पराक्रम , छत्रपती संभाजी महाराजांखेरीज ह्यापूर्वी केला नव्हता , हे त्यांनीपण मान्य केले . औरंगजेब , जर दख्खन मध्ये स्वारीकरिता नसता तर , कदाचित संपुर्ण पोर्तुगीजांचे राज्य , छत्रपती संभाजी महाराजांनी , हिंदवी स्वराज्यात समाविष्ट केले असते , दत्तो वामन पोतदार ह्या मोहिमेबद्दल म्हणतात की , " छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील पराक्रमाचे शिखर " . एवढंच पोर्तुगीजांचा माज राजांनी धुळीस मिळविला .
■ पोर्तुगीजांच्याविरुद्ध मोहिमेचे परिणाम : -
● धृर्त पोर्तुगीजांना , छत्रपती संभाजी महाराजांना आदर आणि वचक निर्माण झाला .
● छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख , हे
पोर्तुगीज शिवाजी राजे असा करीत असत , पण ह्या मोहिमेनंतर छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख संभाजी राजा छत्रपती असा केला गेला होता .
● औरंगजेबास मदत करणे , पोर्तुगीजांनी
बंद केले .
● हिंदूंना धर्मांतराचा आणि गुलामगिरीचा त्रास
पुर्णतः बंद झाला .
● छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत जे दूत गोव्याला जात असत त्यांना सार्वभौम राजाच्या दूताप्रमाणे वागणूक मिळत नसत , तो मान मिळाला तो छत्रपती संभाजी महाराजांच्या दूतांना ! छत्रपती संभाजी महाराजांचे दूत गोव्याला निघाल्याचे समजले की , त्याला गोवा शहरी आणण्याकरिता , सजविलेली खास नौका येई , गोवा शहरात त्याच्यासाठी घर बघितले जाई , त्याची उत्तम व्यवस्था केली जाई.
जर छत्रपती संभाजी महाराजांनी ही मोहीम केली नसती , तरी मुघलांनी आणि पोर्तुगीजांनी मिळून कोकणात थैमान घातले असते , आणि कोकण प्रांताची अपरिहार्य हानी झाली असती , पण श्रींच्या आशीर्वादाने सर्व काही योग्य झाले . पुढे शहाजाद्याचा मोठा पराभव शंभूराजांनी केला , शस्त्र न उचलत ६० हजार मोगल मारले गेले .
पुढे राजांनी फोंडा दुर्गाची योग्य व्यवस्था लावली आणि दुर्गाचे नामकरण " मर्दनगड " , असे ठेविले . तसेच कृष्णाजी कंक यांनी १ हजार होन बक्षीस म्हणून दिले , येसाजी कंक यांनाही १ हजार होन बक्षीस म्हणून दिले , कृष्णाजी कंक यांच्या कुटुंबाची योग्य ती व्यवस्था लावली , ह्या मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या घरी योग्य ती मदत धाडली , व पराक्रम गाजवलेल्या सर्वांस योग्य तो मान , आणि बक्षीस दिले , यामुळेच छत्रपती संभाजी महाराजांना सर्वजण ,
" जाणता राजा " म्हणोन संबोधित असत .
एक वेळ शिवाजी परवडला , पण संभाजी काही औरच आहे , जमणारच नाही .
- पोर्तुगीज .
■ संदर्भ ग्रंथ : -
●छत्रपती संभाजी महाराज ( श्री. वा. सी. बेंद्रे ) ,
● शिवपुत्र संभाजी ( सौ. कमळ गोखले ) , ●ज्वलनज्वलज्वतेजस संभाजीराजा ( डॉ . सदाशिव शिवदे ) ,
● राजा शंभूछत्रपती ( श्री . विजय देशमुख ) ,
● मराठ्यांची इतिहासाची साधने ,
● मराठा - पोर्तुगीज संघर्ष ( श्री. सरदेसाई )
●ऐतिहासिक पत्रव्यवहार ,
●ऐतिहासिक बखरी , इंग्लिश दस्ताऐवज
● जेधे शकावली ,
● शिवकाल ,
● संभाजी ( श्री. विश्वास पाटील ) ,
●इतर ग्रंथ .
=■=■=■●●●●●●■=■=■=
आजपर्यंत प्रकाशित झालेले , " जगविजेता संभाजी " , ह्या फेसबुक पेजवर प्रकाशित झालेले लेख : -
[◆] छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित : -
● जाणता राजा .
● दक्षिणदिग्विजय ते उत्तरदिग्विजय .
● बुऱ्हाणपुरचं धन .
● शंभूराजांची सिद्दीवर जरब .
● शंभूराजे व इंग्रज संघर्ष .
● छत्रपती संभाजी महाराज आणि शहजादा अकबर .
● अजिंक्य रामसेज .
● शंभूराजांचे चिक्कदेवरायास शासन .
● चौलची लढाई .
● तारापूरची लढाई .
● पुणे प्रांतावरील लढाई .
● मराठ्यांची मोगलांवर झडप .
● वैज्ञानिक शंभूराजे .
● स्वराज्यनिष्ठ शंभूराजे .
[◆] छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित : -
● छत्रपतींच्या विशेष युद्धनीती .
● पुरंदरचा रणसंग्राम .
● शिवराय【 समज व गैरसमज 】.
● राजपुती जोहार आणि शिवराय .
● शिवप्रताप【 गाथा शौर्याची 】.
● मराठ्यांचे लष्कर व्यवस्थापन .
● प्रतापविजय .
[◆] ऐतिहासिक व्यक्तिविशेष लेख : -
● स्वराज्यसंकल्पक राजमाता जिजाऊसाहेब .
● हंबीररावांची स्वामीनिष्ठा .
● पेशवा बाजीराव - अद्वितीय योद्धा .
[◆] शिवबाचे शूरवीर ह्या उपक्रमाअंतर्गत : -
● शूरवीर येसाजी .
● शूरवीर तानाजी .
● शूरवीर कोंडाजी .
[★] विशेष लेख : -
● पानिपतचा महासंग्राम .
= =■●●●●●◆◆●●●●●■ = =
वरील सर्व लेख , आणि काही दुर्मिळ चित्रे , काही महत्वपूर्ण चित्रफिती ह्या खाली दिलेल्या लिंकवर आपण अभ्यासू शकता , एकवेळ लाईक नाही केले तरी चालेल पण , लेख अवश्य वाचा , लवकरच मराठा - पोर्तुगीज रणसंग्रामावर आधारित लेख प्रकाशित होईल .
■ जगविजेता संभाजी लिंक : -
https://www.facebook.com/ जगविजेता-संभाजी-22124527290 12520/
" अखंड भारताचा विजय आहे " .
|| जय हिंद ||
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमाहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 /
7741923346 .

https://www.facebook.com/
" अखंड भारताचा विजय आहे " .
|| जय हिंद ||
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमाहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 /
7741923346 .
No comments:
Post a Comment