विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 April 2020

खेड-कडूस लढाई


मुघल शासक मूहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब १७०७ मध्ये दख्खनच्या अहमदनगरला पैगम्बरवासी झाला तेव्हा त्याच्याकडे १६७८-१७०७ या कालखंडात मुघल-मराठा संग्रामात कैद झालेले कित्येक लोकं बंदिस्त होते. त्यांमध्येच १६८९ मध्ये रायगड पडल्यावर कैद झालेले स्वराज्याचे खरे वारसदार युवराज शिवाजी (२) उर्फ शाहू बिन छत्रपती सम्भाजीराजे भोसले हे होते.
औरंगजेब वारल्यावर त्याच्या ५ पैकी ३ जिवन्त मुलं मुअज्जम उर्फ शाहआलम (पुढील शासक बहादुरशहा), आजम व कामबक्ष यांच्यात मुघलांच्या कुळाचारानुसार संघर्ष अटळ होताच, शेवटी संस्कार ३२ नातेवाईकांना कंठस्नान घालून तख्त मिळवलेल्या तीर्थरूप औरंगजेबाचे ! तेव्हा आता शेवटी आपल्या कुळाच्या प्रथेनुसार तिघेही भाऊ दिल्लीकडे तख्त मिळवायला निघाले. वाटेतच मराठ्यांसारख्या कडवट व कणखर बाहेरील सत्तांची या सत्तासंघर्षात एकमेकांविरुद्ध मदत होऊ नये म्हणून त्यांच्यातच आपापसात कलह लावून त्यांना क्षीण करायला शहजादा आजमने एक युक्ती काढली व आपल्या ताब्यातील मराठ्यांचे वारसदार शाहूराजे यांना नर्मदेच्या तटावर दोऱ्हा गावाजवळ झुल्फिकारखान, राजा सवाई जयसिंह कच्छवाह यांच्या सल्ल्याने सोडून दिले.
शाहूराजे आता त्यांच्यासह कैद असलेल्या महादजी यमाजी बोकील, गदाधर प्रल्हाद नाशिककर, उद्धव योगदेव (शम्भूराज्यांच्या काळातील राजाज्ञा), मोरोपंत (सबनीस), कृष्णाजी महादेव जोशी व पुढे जोत्याजी केसरकर यांच्यासारख्या निष्ठावन्त लोकांना घेऊन सातपुडा ओलांडून खान्देशात पोहोचले.
यावेळी ७ वर्षांपासून अविरत मराठ्यांचे नेतृत्व आपल्या अल्पवयीन मुलास शिवाजीराजे यांस गादीवर बसवून छत्रपती राजा राम महाराजांच्या विधवा ताराबाई उर्फ सीताबाई करत होत्या. याकाळात त्यांनी स्वराज्याची केलेली सेवा वाखाणण्याजोगी होती.
रंतु या ७ वर्षात त्यांनी आपला महत्वाकांक्षी स्वभाव सोडला नव्हता ज्यामुळे स्वराज्याचे एकनिष्ठ रामचंद्र नीळकंठ बावडेकर सारखे अनेक लोकं राजकारणातून अंग काढू बघत होते. शिवाय याकाळातच अनेक लोकं ताराराणींचे चिरंजीव शिवाजीराजे यांच्याऐवजी शाहूराजे हेच खरे वारसदार आहेत असे मानत होते. ७ वर्ष औरंगजेबापासून स्वराज्याचे रक्षण करत असल्याने कर्माने आता स्वराज्यावर आपल्या मुलाचा हक्क आहे असे ताराबाईंचे म्हणणे होते पण जन्माने मात्र मराठ्यांच्या गादीचे खरे अधिकारी शाहूराजे आहेत असे शाहूराजे, खुद्द स्वर्गीय छत्रपती राजा राम महाराज आणि अनेक लोकांना वाटत.
या संघर्षात आपल्याकडील लोकं फितुरी करू नये म्हणून ताराराणींने सर्व मोठमोठ्या असामींना जलधारा हाती घेऊन शपथा दिल्याचे वर्णन आढळते ज्याला जागून पेशवे नीळकंठ मोरेश्वर पिंगळे, प्रतिनिधी परशुराम त्र्यम्बक किन्हईकर, मंत्री रामचंद्र त्र्यम्बक पुंडे, सरखेल कान्होजी तुकोजी आंग्रे यासारख्या लोकांनी ताराराणींचाच पक्ष धरून ठेवला. फितुरीची भीती वाटल्याने ताराराणींने अमात्य रामचंद्र नीळकंठ बावडेकर यांना तर विशाळगडी चांदीच्या बेड्या घातल्या म्हणजेच राजकैद केली. जन्मसिद्ध अधिकाऱ्याचा की कर्मसिद्ध व्यक्तीचा पक्ष धरावा हे न समजून सचिव शंकराजी नारायण गांडेकर यांनी तर शेवटी जलसमाधीच घेतली. पण शपथ मोडूनही सेनापती धनसिंह शम्भूसिंह उर्फ धनाजी जाधवराव, बाळाजी विश्वनाथ भट, चिमणाजी दामोदर मोघे, बहिरोजी मोरेश्वर पिंगळे, चिटणीस खंडो बल्लाळ चित्रे, मानसिंह मोरे यांच्यासारखी मोठी मंडळी शेवटी शाहूंराज्यांनाच जाऊन मिळाली व मराठी राज्यात फूट पडून पूढे १७११ मध्ये वारणेच्या तहानुसार स्वराज्याचे सातारा व कोल्हापूर असे दोन भाग झाले.
स्रोत : गोविंद सखाराम सरदेसाई लिखित मराठी रियासत मध्यविभाग भाग १

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...