" श्रीशंभूछत्रपती "
छत्रपती शंभूराजांच्या , " छत्रपती " बनण्याला एक पार्श्वभूमी आहे , ह्या विशेष लेखात , युवराज शंभराजे ते छत्रपती शंभूराजे हा संभाजी महाराजांच्या आयुष्यातील एका महत्वपूर्ण प्रवासाचा सखोलपणे आढावा घेणार आहोत .
■ स्वराज्याचा वारस कोण ? : -
शंभूराजे दि. २१ डिसेंबर १६७९ रोजी , मामुरखानाच्या ( दिलेरखानाच्या ) मोगली गोटातून बाहेर पडले , पुढे दि. १३ जानेवारी १६८० रोजी , युवराज शंभूराजे सरनौबत हंबीरराव ( हंसाजी मोहिते ) , यांसोबत किल्ले पन्हाळ्यावर आले होते . खानाच्या छावणीत जाणे , हा छत्रपती शिवराय आणि युवराज शंभूराजे यांच्या प्रभावी राजकारणाचा एक भाग होता , वास्तविक बखरकारांनी त्याचा वेगळा अर्थ काढून शंभुराजांवर , ' फितूरीचे ' आरोप केले , परंतु सत्यापुढे कोणाचे काहीच चालले नाही . पुढे शिवरायांनी , किल्ले पन्हाळगडावर जाऊन शंभूराजांची भेट गेली , पिता - पुत्रांमध्ये मसलत झाली , शंभुराजांचे अपार कौतुक केले , व पुढची दिशा ठरवली . छत्रपती शिवरायांनी शंभूराजांच्या दिमतीस म्हळोजी घोरपडे नावाचा विश्वासू , शूर आणि अनुभवी सरदार दिला होता .
त्यानंतर राजारामराजेंच्या विवाहाकरिता , शिवराय राजधानीकडे रवाना झाले . नंतर राजारामराजांचे , दि. १५ मार्च रोजी , लग्नकार्य हे स्व. सरनौबत प्रतापराव गुजर , यांची कन्या , जानकीबाई ह्यांबरोबर झाले , समारंभ निर्विघ्न पार पडले .
आता प्रश्न असा , कि स्वराज्याचा वारस कोण ? , "
छत्रपती शिवरायांचं , त्या प्रसंगावेळी वय ५० वर्षे पुर्ण होते , ह्याचा अर्थ कि राजे वृद्ध झाले नव्हते , त्यामुळे वाटणीचा प्रश्नच उरत नाही [ कोणत्याही समकालीन साधनात वाटनिचा उल्लेख नाही ] .
आणि जर प्रश्न असेल तर जन्माने आणि कर्माने स्वराज्याचे वारस हे , " युवराज शंभूराजे " च होते .
पुढे दि. २४ मार्च १६८० रोजी , राजे आजारी पडले , व दि. ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवरायांचे राजधानीत , अकाली महानिर्वाण झाले . ह्या ह्रयदद्रावक प्रसंगाने संपूर्ण स्वराज्य हबकले .
शिवरायांच्या मृत्यूचे संशोधन व्हायला हवे , त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत , आणि पुराव्याद्वारे सत्य माहिती लवकरच प्रकाशित करणार आहोत . " इतक्यात काही लिखाण करणे योग्य ठरणार नाही " .
◆ महानिर्वाणाचा प्रसंग : -
दि. ३ एप्रिल १६८० , शनिवार ,सूर्योदयानंतर दोन प्रहरांनी राजांनी किल्ले रायगडावर देह ठेविला . राजांचे अंत्यविधी सुरू झाले , " शिवरायांच्या पवित्र देहाला अग्नी देण्याचे कार्य हे भोसले घराण्यातील दूरचा नातेवाईक साबाजी भोसले याने केले " . मुळात शंभूराजांच्या अनुपस्थित अग्नी देण्याचे महापुण्याचे कार्य राजारामराजेंनी करावयास हवे होते ; परंतु सत्ताप्राप्तीसाठी त्यांनी केले नसावे किंवा करून दिले नसावे ; हिंदूसंस्कृतीनुसार मृत्यू झाल्यावर , परिवारास सुतक लागते , व १२ दिवस परिवारातील व्यक्तींनी काही व्यवहारीक कार्ये तसेच महत्वाची कार्ये करायची नसतात , पण परिवारातील राजकुमार असेल तर सिंहासनाच्या शास्त्रानुसार पुढील राजास सुतक लागता कामा नये , लागत नाही , आणि जास्ती काळ सिंहासन रिकामे ठेवता येत नाही , राजाच्या मृत्यूनंतर लगेचच नवीन राजाच्या नावाची ग्वाही दिली जाते , हि एक प्रथा आहे ; कदाचित या प्रथेनुसारच साबाजी भोसले यास राजांच्या पवित्र देहाला अग्नी द्यायला सांगितले असावे . पुढे १० दिवसांनी , आबासाहेब गेल्याची बातमी शंभुराजांना कळली , नंतर मंत्रीमंडळामार्फत सोयराराणी आणि कपटी अनाजीने , दि. २१ एप्रिल १६८० रोजी ,
राजरामास मंचकी बसविले वा मंचकरोहण केले , आणि सर्वत्र नव्या राजाची ग्वाही फिरवली . पुढे लगेचच प्रधानमंडळी ( अनाजी , मोरोपंत ) ५ हजार फौझेसह शंभुराजांना अटक करण्यास निघाले , रायगडहून प्रधानमंडळी तळबीडला गेले , त्यांच्या पक्षात हंबीररावांना सामील करण्याच्या हेतूने ते गेले होते .
● सरनौबत हंबीररावांसमोर पेच : -
हंबीररावांनी प्रधानांचे योग्यप्रकारे आदरातिथ्य केले , त्यांचं बोलणं एकूण घेतलं . हंबीररावांच्या बरोबर रंगोजी ( रुपाजी ) भोसले , महादू भोपाळकर गुजर , हे सेनानी होते . शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिण जिंकण्यासाठी मोठ्या लवाजम्यासह येणार आहे अशी बातमी , सरनौबतांना मिळाली होती , तशीच चिन्हे दिसत होती . औरंगजेबाचे आव्हान फक्त शंभूराजेच परतवू शकत होते , हे हंबीररावांना ठाऊक होते ; त्यामुळे हंबीररावांनी सोयराबाई आणि प्रधानांच्या पक्षास साथ न देता , स्वराज्यहित जाणून , शंभुराजांना साथ द्यायचे ठरविले होते . सरनौबतांनी प्रधानांना गाफील ठेवून योग्य संधी मिळता , लगोलग कैद करून , युवराज शंभुराजांसमोर हाजीर केले , शंभूराजांनी प्रधानांना आणि हिरोजी फर्जंद यांस कैद केली , पन्हाळगडाचे कारभारी जनार्दन हणमंते ह्यास आधीच कैद केले होते .
पुढे शंभूराजांनी स्वराज्याचा कारभार तेथुनच सुरू केला , सर्व गडावर खलिते पाठविले , नंतर स्वराज्यनिष्ठ सरदार पिलाजी शिर्के यांस १५ हजाराची फौज देऊन रायगडाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले .
■ युवराज शंभूराजे रायगडावर : -
जेधे शकावलीतील
नोंदीनुसार राजशक ७ , रौद्र ( दि. ३ जून १६८० ) , पन्हाळगडावरून शंभूराजे , सातारा - कराड मार्गे किल्ले प्रतापगडावर गेले , व भवानी देवीचे दर्शन घेऊन पूजा केली आणि आषाढ शुद्ध २ शुक्रवारी , शंभूराजे दि. १० जून ला रायगडावर आले , राज्य करू लागले .
शंभूराजे रायगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर त्यांनी प्रथम राजमाता जिजाऊंच्या पवित्र समाधीचे दर्शन घेतले , जवळजवळ ३ वर्षे शंभूराजे रायगडापासून दूर होते , नंतर शंभूराजांनी सोयरामातोश्री , पुतळामातोश्री [ पुतळामातोश्री यांनी शंभूराजांस सर्व वृत्तांत सविस्तररीत्या सांगितला ] आणि अन्यदोन मोतोश्रींचे सांत्वन केले , त्यांना धीर दिला ,राजारामराजेंना भेटले , राज्यकारभारास प्रत्यक्ष प्रारंभ केला .
रायगडावर , युवराज शंभूराजांनी पुन्हा शास्त्रानुसार विधिपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांची उत्तरक्रिया केली . क्रियेच्या १०व्या दिवशी , दि. २७ जून १६८० रोजी , श्रीमती पुतळाराणीसाहेब सती गेल्या [ शंभूराजांनी पुतळामातोश्रींना खूप समजावले , परंतु त्यांनी काही ऐकले नाही ] .
◆ युवराज शंभूराजांचे मंचकारोहण : -
शके १६०८ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंच ( नागपंचमी ) म्हणजेच दि . २० जुलै १६८० ( मंगळवार ) रोजी , युवराज शंभूराजे यांचे मंचकारोहण झाले आणि " राजा " झाल्याचे जाहीर केले . पुढे सर्वमुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून , प्रधानांना नजरकैदेतून मुक्त केले ( रायगडावर आल्यावर प्रधानांना , त्यांच्या वाड्यावरच नजरकैदेत ठेवले होते ) . पुढे दि . २९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी देह ठेविला . शंभूराजांनी मंचकारोहणानंतर कोकणामध्ये , राजापूर येथे नव्या सुभेदाराची नेमणूक केली . हिंदवी स्वराज्याची घडी व्यवस्थितपणे बसविली .
•■• शंभुराजेंचा राज्याभिषेक : -
सन १६८१ हे साल चालू झाले , राजधानीत शंभूराजांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली . सर्वत्र आनंद होता , कारण स्वराज्याचे धाकले धनी आता , "छत्रपती" होणार होते . राज्याभिषेकासाठी " शिवयोगी पंडित " , ह्या अग्रगण्य महापंडितास बोलविले होते [ उतार वयामुळे गागाभट्ट यांना राज्याभिषेक कार्यास येणे जमले नाही ] रायगड तरआनंदाने दुमदुमू लागला . अखेर मुहूर्त शिवयोगी पंडितांनी निश्चित केला , माघ शुद्ध सप्तमी ....
राज्याभिषेक -
- विधीपूर्वी करावयाचे प्रायःश्चित विधी , तुलादान विधी हे विधी , दि. ३० डिसेंबर १६८० रोजी पार पाडण्यात आले होते ; त्यानंतर शुभमुहूर्तावर शंभूराजे किल्ले प्रतापगडावर जाऊन , " श्री आदिशक्ती तुळजाभवानी मातेचे पूजन " , मराठ्यांच्या कुलदेवतेस अभिषेक करून आले .
शके १६०८ , रौद्रनाम संवत्सरे जानेवारी १४ , १५ , आणि १६ , इ.स. १६८१ रोजी शंभुराजांना विधियुक्त राज्याभिषेक झाला . दि. १६ जानेवारी १६८१ , मंगळवार , माघ शुद्ध सप्तमी , रोजी सकाळी ३ वाजता राज्याभिषेकाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली , राजांनी प्रथम जगदीश्वराचे दर्शन घेतले होते , नंतर शंभूराजांचे पवित्र स्नानास सुरुवात झाली , मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी दूध , मध , दही तसेच शिवयोगी पंडितांनी सप्तगंगेचे कलश घेऊन प्रत्येकांनी , शंभूराजांच्या मस्तकावर अभिषेक केला , येसूराणीसाहेबांस व युवराज यांवर सुद्धा अभिषेक करण्यात आला . गडावर सर्वत्र आनंद होता , नंतर इतर मंत्रविधी झाले . शंभुराजांवर लाह्या , बत्तासे , फुलं , सुवर्णफुलं , सुवर्णमोहरा उडविल्या जात होत्या , पारंपरिक आदिवासींचे , धनगरांचे नृत्य , गायन होत होते .
पुढे मुख्य राज्यरोहनाचा , विधी सुरु झाला , हा विधी राजदरबारात झाला , दरबारात प्रचंड रयत होती , आणि तितक्यात शंभूराजांचे आगमन झाले , सुर्याचाही प्रकाश दीपवेल इतकं तेज हे शंभूराजांच्या शुभ मुखा वर होते . दरबाराची पहिली पायरी चढताना
शंभुराजांना दिसले ते , सुभेदार तानाजी मालुसरे , नरवीर कोंडाजी फर्जंद , शूरवीर बाजीप्रभू देशपांडे , महापराक्रमी मुरारबाजी देशपांडे , सरनौबत प्रतापराव गुजर , सूर्यराव काकडे ; पुढे द्वितीय पायरी चढताना शंभूराजांना दिसले ते , स्वराज्य संस्थापक महामहिम शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊमांसाहेब ; पुढची पायरी चढतात तर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज , मातोश्री सईबाई आणि पुतळाबाई , या महानुभावांनी
शंभूराजांस आशीर्वाद दिले . राजे सिंहासनाकडे प्रयाण करत होते , तेवढ्यात शिवयोगी पंडित समोर आले , आणि म्हटले हे राजन थांबावे , राजांचा राजतीलक केला , ह्या सिंहासनाच्या पायऱ्या चढण्यापूर्वी तुम्हांस शपथ घ्यावी लागेल , सप्तस्वर्गात निवास करणाऱ्या देवतांनो ऐका , सप्तपाताळात भ्रमण करणाऱ्या अशुभांनो ऐका याद राखा , आणि शंभूराजांनी शपथ घेतली , " मी संभाजी , आज ह्या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे , मी भूपती , ही भूमी माझी पत्नी , व रयत माझी लेकरे , म्हणोन मी या रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करीन . माझे शासन हे निःपक्षपाती आणि विनयशील असेल , स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदो याकरिता मी प्रतिबध राहीन . मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही किं:बहुना आईच्या मायेने सांभाळ करेन " , आणि सर्वत्र जयघोष सुरू झाला , छत्रपती संभाजी महाराज की जय , असा नाद घुमू लागला , नगारखान्यावरून तुतारी गरजू लागल्या , साऱ्या प्रजेने , हिंदवी स्वराज्याच्या द्वितीय छत्रपतींस आशीर्वाद दिले , पुढचे विधी झाले , तसेच छत्रपती संभाजी महाराजांवर छत्र धरण्याचा मान , सरदार पिलाजीराव शिर्के ह्यांस मिळाला , शिवरायांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम भव्यदिव्य झाला . रायगडावर भरपूर प्रमाणात मंडळी उपस्थित होती . जेवण , दानधर्म मोठ्या प्रमाणात झाले .
● काही बखरकारांनी , राज्याभिषेक समारंभावेळी काही अपशकून झाल्याचे उल्लेख केलेत , ते पुढीलप्रमाणे : -
१. संबंध दिवस आकाश अभ्राच्छादित असल्याने , सूर्यदर्शन झाले नाही .
२. शंभूराजांचा रथ मोडला .
३. दानधर्माच्या गर्दीत ब्राह्मण चिरडून मृत्यू पावले .
असं काहीही घडलं नाही , बखरकारांनी आपल्या कल्पनेतून हे असं काही मांडलं आहे .
★ छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा : -
श्री |
शंभो शिव जातस्यमुद्रादयौ रिव राजते |
यदं |
क सेविनो लेखा |
वर्तते कस्यनो परि |
मराठीमध्ये अर्थ : - छत्रपती संभाजीराजांची राजमुद्रा सूर्याच्या तेजप्रमाणे शोभते आणि राजमुद्रेची आश्रित असलेली लेखा कोणावरही अंमल गाजविते अशी हि शिवपुत्र शंभूची मुद्रा प्रकाशित आहे .
★ छत्रपती संभाजी राजांची मर्यादा : -
" मर्यादेयं विजयते "
हि छत्रपती संभाजीराजांची " मर्यादा " आहे , संभाजीराजांची आणखी एक मुद्रा असल्याचे म्हटले जाते , पण ती कोठेही वापरात आलेली दिसत नाही .
°■° छत्रपती संभाजीमहाराजांचे मंत्रीमंडळ : -
■ छत्रपती : - संभाजी महाराज .
■ महाराणी येसूबाई : - छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत रायगडाचे सर्व
अधिकार ह्यांकडे असतील .
◆ पेशवे : - निळो मोरोपंत पिंगळे .
◆ अमात्य / मुजुमदार : - अनाजी दत्तो .
◆ डबीर : - जनार्दनपंत .
◆ सुरनिस : - आबाजी सोनदेव .
◆ सरनौबत : - हंबीरराव मोहिते .
◆ चिटणीस : - बाळाजी आवजी .
◆ दानाध्यक्ष : - मोरेशवर पंडितराव .
◆ वाकेनवीस : - रामचंद्र .
◆ छंदोगामात्य : - कवी कलश .
◆ न्यायाधीश : - प्रल्हादपंत .
अशाप्रकारे युवराज शंभूराजे , स्वराज्याचे "धाकले धनी"झाले आणि आहेत . पुढे छत्रपती संभाजी महाराजांची , राज्यसभेतून हत्तीवरून मिरवणूक निघाली , विशेष म्हणजे ह्या हत्तीला महावत नसतो , ह्या अतिविशेष राज्याभिषेकसमयी हा मान , स्वराज्याच्या सरनौबत यांकडे राखीव असतो , त्यानुसार सरनौबत हंबीरराव पुढे बसले होते , आणि विविध वाद्यांच्या बरोबरीने मिरवणूक , श्रीजगदीश्वराच्या दिशेने
निघाली , राजांनी श्रींचे दर्शन घेतले , आणि पवित्र शिवसमाधीचे दर्शन घेऊन ह्या महान सोहळ्याची सांगता झाली [ रायगडावर या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे व रयतेचे यथोचित आदरातिथ्य करण्यात आले. ]
अशाप्रकारे , छत्रपती संभाजीमहाराजांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य -रित्या आणि श्रींच्या आशीर्वादाने निर्विघ्नपणे
पार पडला .
आजपर्यंत प्रकाशित झालेले , " जगविजेता संभाजी " , ह्या फेसबुक पेजवर प्रकाशित झालेले छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित लेख : -
● जाणता राजा .
● दक्षिणदिग्विजय ते उत्तरदिग्विजय .
● बुऱ्हाणपुरचं धन .
● शंभूराजांची सिद्दीवर जरब .
● शंभूराजे व इंग्रज संघर्ष .
● छत्रपती संभाजी महाराज आणि शहजादा अकबर .
● अजिंक्य रामसेज .
● शंभूराजांचे चिक्कदेवरायास शासन .
● चौलची लढाई .
● तारापूरची लढाई .
● शंभुराजांचा महाविजय .
● पुणे प्रांतावरील लढाई .
● मराठ्यांची मोगलांवर झडप .
● वैज्ञानिक शंभूराजे .
● स्वराज्यनिष्ठ शंभूराजे .
■ संदर्भ ग्रंथ : -
●छत्रपती संभाजी महाराज ( श्री. वा. सी. बेंद्रे ) ,
● शिवपुत्र संभाजी ( सौ. कमळ गोखले ) , ●ज्वलनज्वलज्वतेजस संभाजीराजा ( डॉ . सदाशिव शिवदे ) ,
● राजा शंभूछत्रपती ( श्री . विजय देशमुख ) ,
● मराठ्यांची इतिहासाची साधने ,
● मराठा - पोर्तुगीज संघर्ष ( श्री. सरदेसाई )
●ऐतिहासिक पत्रव्यवहार ,
●ऐतिहासिक बखरी , इंग्लिश दस्ताऐवज
● जेधे शकावली ,
● शिवकाल ,
● संभाजी ( श्री. विश्वास पाटील ) ,
●इतर ग्रंथ .
" अखंड भारताचा विजय आहे " .
|| जय हिंद ||
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमाहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 /
7741923346 .

No comments:
Post a Comment