विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 4 May 2020

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 82

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 82
 महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,

लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस

कसोटीचा प्रसंग------------------------------------------------------------------------------1



बा यजाबाईसाहेब दक्षिणेतून आल्यानंतर बहुतकरून ग्वाल्हेरीस राहत होत्या. त्यांचा वृद्धापकाळ झाला होता; तथापि त्यांचे शरीर तेजःपुंज असून त्यांच्या शक्ती विगलित झाल्या नव्हत्या. त्यांचा उत्साह त्यांची ताकद कायम असून, त्यांचा घोड्यावर बसण्याचा नित्यक्रम अव्याहत चालू होता. मित आहार, नियमित व्यायाम, व्यवस्थित वर्तन आणि सत्कार्यं कालक्षेप असा बायजाबाईसाहेबांचा आयुष्यक्रम असल्यामुळे त्यांचे आरोग्य कायम राहिले होते. त्यांचे सत्तर वर्षांचे वय झाले होते, तथापि त्यांची स्मरणशक्ति खंबीर असून त्यांची सर्व नैमित्तिक कृत्ये अगदी व्यवस्थितपणाने चालत असत. त्यांस इंग्रज सरकाराकडून दोन लक्ष शिंदे सरकाराकडून चार लक्ष मिळून एकंदर सहा लक्ष रुपये पेनशन मिळत असे. ह्या पेनशनाची त्या स्वतः उत्तम व्यवस्था ठेवीत असत. त्यांचा इतमाम, त्यांचा शागीदपेशा, आणि त्यांचा दानधर्म त्यांच्या वैभवास मोठेपणास शोभेल असाच होता. तथापि त्यांच्या दलतेमुळे त्यांस कधीही कर्ज होता, उलट त्यांच्या संग्रहीं। द्रव्यसंचय फार मोठा झाला होता. उत्तरोत्तर त्यांचे मन ऐहिक व्यवहार राजकारणे ह्यांपासून पराङ्मुख होऊन, कथापुराण ईश्वरभक्ति ह्यांच्याकडे विशेष लागले होते. तथापि, ग्वाल्हेरच्या राजकारणांत त्यांनी आपले अद्वितीय बुद्धिचातुर्य पूर्वी व्यक्त केले असल्यामुळे त्यांच्या शहाणपणाविषयीं त्यांच्या राजकारस्थानपटुत्वाविषयीं शिंदे३४ सरकारच्या दरबारांत इंग्रजी दरबारांत त्यांचा लौकिक अद्यापि गाजत होता. खुद्द महाराज जयाजीराव शिंदे हे प्रसंगविशेषीं त्यांची सल्लामसलत घेत असत; त्यांच्या शहाणपणाची फार तारीफ करीत असत. अशा रीतीने बायजाबाईसाहेबांचा ग्वाल्हेर येथे शांतपणाने प्रतिष्ठितपणानें कालक्षेप चालला होता. तो मध्यंतरीं, . . १८५७ सालचे बंड उद्भवले. त्याने त्यांचा, ग्वाल्हेर संस्थानचा, किंबहुना सर्व हिंदुस्थानाचा शांतपणा भंग केला. | . .१८५७ सालीं ग्वाल्हेर येथे जे भयंकर बड झाले, त्याचा वृत्तांत सर्वश्रुतच आहे. ह्या बंडाच्या योगाने ग्वाल्हेर येथे कांहीं वेळ राज्यक्रांति झाली. खुद्द महाराज जयाजीराव शिंदे ह्यांस आपल्या सर्व कुटुंबीय मंडळीसुद्धा आपली राजधानी सोडावी लागली. त्यांच्या पश्चात् श्रीमंत रावसाहेब पेशवे, झांशीच्या राणी लक्ष्मीबाईसाहेब, तात्या टोपे ह्यांनी ग्वाल्हेर सर करून तेथे नवीन राज्याची संस्थापना केली. ह्या बिकट प्रसंगी महाराज जयाजीराव शिंदे, महाराणी बायजाबाईसाहेब, आणि दिवाण दिनकरराव ह्यांनीं जें वर्तन केले, ते फार शहाणपणाचे धूर्ततेचे होते. त्यामुळेच ब्रिटिश राज्यसत्तेचा विजय होऊन ती पुनः संस्थापित झाली, असं ह्मणण्यास मुळीच हरकत नाही. ह्या अत्युत्कृष्ट वर्तनाबद्दल महाराज जयाजीराव शिंदे दिवाण दिनकरराव ह्यांची सर्वत्र प्रशंसा झाली आहे; ती योग्य आहे. तथापि, ह्या प्रसंगी महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांनी जें वर्तन केले, ते फार उदारपणाचे थोर मनाचे असून, ते अधिक स्तुतियोग्य होते, असे मटल्यावांचून आमच्याने राहवत नाही. महाराज शिंदे सरकार दिवाण दिनकरराव ह्यांनी सर्व लोकमताचा प्रवाह झुगारून देऊन, केवळ * ब्रिटिश सरकारचा स्नेह त्यांचा न्यायीपणा ? ह्यांकडे दृष्टि दिली, आणि आपल्या कुलास चिरभूषणावह अशीच गोष्ट केली. ह्यांत त्यांचे दूरदर्शित्व, चातुर्य आणि१३९ ग्रामाणिकपणा हे गुण व्यक्त झाले, हे सर्व ठीक झाले. परंतु ह्यापेक्षाही बायजाबाईसाहेबांच्या वर्तनांत अधिक प्रशंसनीय आणि अधिक तेजस्वी असा गुण दिसून आला. तो त्यांचे मानसिक औदार्य हा होय.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...