मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 83
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
कसोटीचा प्रसंग------------------------------------------------------------------------------2
बायजाबाईसाहेबांचा व ब्रिटिश सरकाराचा पूर्वीचा राजकीय संबंध लक्ष्यांत घेतला, तर त्यांनी ब्रिटिश सरकाराशीं जें वर्तन केले, त्यांत केवळ मनुष्यखभावास भूषणप्रद होणारी अशी साधुवृत्ति दर्शविली, असे झटलें। असतां खचित अतिशयोक्ति होणार नाहीं. दुस-याने कितीही अपकार । : केले, तरी ते विसरून, त्याच्यावर पुनः उपकार करणे, ही साधुरीति > होय, असे कोण ह्मणणार नाहीं ? । ३ । | बायजाबाईसाहेब व ब्रिटिश सरकार ह्यांच्यामध्ये मागें जीं अनेक राजकारणे झाली, त्यांच्या बरेवाईटपणाबद्दल चर्चा करण्याचे प्रयोजन नाहीं. शिवाय, त्या राजकीय गोष्टी असल्यामुळे त्यांतील सत्य प्रकार । प्रकाशांत येणे शक्य नाहीं. तथापि, स्थूल मानाने इतके ह्मणतां येईल की, हीं सर्व राजकारणे न्यायी व दयाळू राजनीतीच्या विरुद्ध असून त्यांच्यायोगाने बायजाबाईसाहेबांच्या मनांतील ब्रिटिश सरकाराविषयींचा ।। प्रेमभाव नाहीसा होणे अगदीं साहजिक होते. बायजाबाईसाहेब ह्या फार महत्वाकांक्षी व राजव्यवहार चतुर अशा स्त्रीमालिकेंत अग्रस्थानी शोभणाच्या असून, त्यांस ग्वाल्हेरचा राज्यकारभार चालविण्याची फार उमेद होती. गव्हरनरजनरल लॉर्ड आह्मर्त्य ह्यांनी दौलतराव शिंद्यांच्या इच्छेप्रमाणे बायजाबाईसाहेबांच्या हातीं सर्व राज्यकारभार सोपविला होता; व त्यांचे अनुयायी लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांनी त्यांस स्वतंत्र रीतीने राज्यकारभार चालविण्याबद्दल कुल अखत्यार दिला होता. असे असून, इ. स. १८३३ साली त्यांना एकाएकी अधिकारच्युत केले, ही गोष्ट ह्या स्वाभिमानी राजस्त्रीस बिलकूल आवडली । ८८१३६ नाहीं. तथापि तिने कोणत्याही प्रकारे अविचाराचे वर्तन न करितां, आलेलें संकट निमूटपणे सहन केले. त्या वेळी तिने युद्धाचा प्रसंग आणिला असता, तर तसे करणे तिला अशक्य नव्हते. परंतु इंग्रजांचे सैन्यबल व साधनप्राचुर्य ह्यांचा तिला अनुभव असल्यामुळे तिने तसा कोणताही अविचार मनांत आणिला नाही. परंतु तिच्या दुर्दैवाने, ब्रिटिश अधिका-यांस संशयपिशाचिकेने पछाडल्यामुळे, तिला अत्यंत त्रास व विपत्ति हीं सोसावी लागली, त्यास उपाय नाहीं ! . - बायजाबाईसाहेबांस ब्रिटिश अधिका-यांच्या अवकृपेमुळे जे क्लेश व * जे ताप सहन करावे लागले, त्यांचे वर्णन बाईसाहेबांची प्रत्यक्ष भेट घेतलेल्या आंग्ल स्त्रियांनी वेळोवेळी आपल्या ग्रंथांत दाखल केले आहे. ते वाचले ह्मणजे त्यांच्या अनुकंपनीय स्थितीबद्दल मनांत करुणा उत्पन्न झाल्यावांचून राहत नाहीं. मिसेस फेनी पाक्र्स ह्या आंग्ल स्त्रीने ता. ९ जून इ. स. १८३६ रोजी अलहाबाद येथे बायजाबाईसाहेबांची भेट घेतली होती. त्या भेटीची नोंद आपल्या रोजनिशीमध्ये लिहितांना तिने पुढील उद्गार काढिले आहेतः–“बायजाबाईसाहेबांस फार क्रूरपणाने व अन्यायाने वागविले जात आहे. ज्या महाराणीने ग्वाल्हेर संस्थानचा राज्यकारभार चालविला, तिला राहावयास येथे छप्पर देखील नाहीं. पर्जन्यकालास सुरवात झाली असून, तिला सक्तीने तंबूमध्ये राहावयास लाविलें आहे; व तिच्या मर्जीविरुद्ध तिला राजकीय कैदी करून येथे ठेविलें आहे.”
अशा प्रकारे हाल अपेष्टा बायजाबाईसाहेबांस फारच सहन कराव्या | लागल्या; एवढेच नव्हे, तर त्यांच्या काशी येथील राजवाड्यांतून ३७।। लक्ष रुपये ब्रिटिश अधिका-यांनी जबरदस्तीने जप्त केले व इंग्रजी खजिन्यांत नेऊन सुरक्षित ठेविले ! अशा रीतीने त्यांस इंग्रज अधि कायांनीं अप्रेमभावाने वागविलें. ह्या कष्टमय स्थितीबद्दल त्यांनी हिंदुस्थानचे गव्हरनर जनरल ह्यांस वेळोवेळी अर्ज पाठविले; व दुःखाने संतप्त होऊन, पुष्कळ झणझणित शब्दांनी त्यांच्या हृदयास द्रव आणण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांस ह्या राजस्त्रीबद्दल दया आल्याचे दिसत नाहीं. एका अर्जामध्ये त्यांनी खुद्द गव्हरनर जनरलसाहेबांस असे लिहिले होते की, “लॉर्डसाहेब, आपण माझे संरक्षक असतांना मला अशा प्रकारच्या विपत्तियातना भोगाव्या लागल्या आहेत, ही फार आश्चर्याची गोष्ट आहे. ह्याबद्दल इतकेंच मानणे भाग पडतें कीं, | १. काशी येथील बायजाबाईसाहेबांचा खजिना जप्त केल्याचा उल्लेख मिसेस फेनी पार्स ह्यांनी केला आहे. ह्या बाई काशी येथील बायजाबाईसाहेबांचा वाडा पाहण्याकरितां गेल्या होत्या. ज्या वेळी त्यांनी त्यांच्या खजिन्याच्या पेट्या पाहिल्या त्या वेळी त्यांस त्यांतील अठरा हजार मोहरा कंपनी सरकाराने नेल्या असे समजून आले. त्या लिहितात;-
हे केवळ आपल्यासारख्यास फार लज्जास्पद आहे !” बायजाबाईसाहेबांच्या ह्या स्पष्ट लिहिण्याने गव्हरनर जनरलसाहेबांच्या मनावर कांहींएक परिणाम झाला नाही. त्यांनी त्यांस एवढेच उत्तर पाठविलें कीं, “मनुध्याच्या आयुष्यात अशा प्रकारची स्थित्यंतरें हीं असावयाचीच. त्यावांचून कोणी सुटले नाहीं. ह्याकरितां ईश्वरेच्छा समजून, शांतपणाने, नशीबी काय असेल ते सोसिले पाहिजे !?? ह्या सर्व गोष्टी बंडाच्या पूर्वी कित्येक वर्षे घडलेल्या होत्या. तथापि बायजाबाईसाहेब ह्या कोणी सामान्य मनुष्य असत्या, तर त्यांच्या मनांत त्या वज्रलेपाप्रमाणे घट्ट बसून त्यांनी नेहभावाचा तेथे कधींही प्रवेश होऊ 3 दिला नसता. किंबहुना, बंडासारखी चांगली संधि प्राप्त होताच, त्यांनी दुखविलेल्या वाघिणीप्रमाणे चवताळून जाऊन त्यांचा सूड घेतला असता. परंतु अशा अप्रिय व अनिष्ट गोष्टी देखील सर्व विसरून जाऊन, बायजाबाईसाहेबांनी ह्या बिकट प्रसंगी सार्वभौम प्रभूस उत्कृष्ट साहाय्य केले, आणि सुवर्णाच्या कोंदणांत तेजस्वी रत्नाप्रमाणे चमकणारे आपल्या सुशील हृदयांतील प्रशंसनीय औदार्य सर्व जगास विश्रुत केले. ह्याबद्दल ह्या राजस्त्रीचे जेवढे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. 1.
No comments:
Post a Comment