मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी
बायजाबाई शिंदे
भाग 84
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
कसोटीचाप्रसंग------------------------------------------------------------------------------3
इ. स. १८५७ च्या बंडामध्ये बायजाबाईसाहेब ह्या इंग्रजांच्या . विरुद्ध होऊन बंडवाल्यांचा पक्ष स्वीकारतील की काय, अशी इंग्रज अधिका-यांस अतिशय भीति वाटत होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर एकसारखी नजर ठेविली होती. ह्या संबंधाने मरे साहेबांच्या हिंदुस्थानांतील बंड” नामक ग्रंथामध्ये पुढील मजकूर लिहिला आहेः ‘ह्याप्रमाणे चोहोंकडून एकत्र जमलेल्या व निरनिराळ्या हेतूने प्रोत्साहित झालेल्या बंडवाल्या सैन्याने महाराज शिंदे सरकार ह्यांस
ग्वाल्हेरच्या गादीवरून पळवून लाविले; आणि शिंदे सरकार व त्यांचे दोस्त ब्रिटिश सरकार ह्यांच्या विरुद्ध नवीन राज्य संस्थापित केले. ह्या बंडवाल्यांच्या कारकीर्दीमध्ये बारा महिनेपर्यंत कंपनी सरकारचे जुने व अनुभवी कामगार, शिंदे घराण्यातील एका विविक्षित माणसाकडे राजद्रोहाचा प्रवेश होईल की काय, अशी शंका बाळगून, त्याकडे एकसारखे लक्ष्य लावून बसले होते. हे माणूस ह्मणजे वयाने वृद्ध असलेल्या
महाराणी वायजाबाईसाहेब ह्या होत. ह्यांचे ग्वाल्हेर येथे चांगले वजन असून त्यांचे नांव सर्वत्र महशूर झाले होते. बंड होण्यापूर्वी साठ वर्षे, *दक्षिणची सौंदर्यलतिका' ह्मणून त्यांची प्रसिद्धि असून, इ. स. १७९७ सालच्या विजयी दौलतराव शिंद्यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांनी साठ वर्षांपयेत आपल्या आयुष्यातील विविध स्थित्यंतरांचा अनुभव घेतला होता. व लग्न झाल्यानंतर तीस वर्षांपर्यंत आपल्या यजमानावर व ग्वाल्हेरच्या दरबारावर वर्चस्व चालवून, पूर्वेकडील स्त्रियांचे ठिकाणीं सामान्यतः जी कार्यक्षमता दृष्टीस पडते, त्यापेक्षा अधिक कार्यक्षमता दाखविली होती. इ. स. १८२७ मध्ये दौलतराव शिंदे हे निपुत्रिक मरण पावले. त्यांच्या पश्चात् हिंदु चाली प्रमाणे बायजाबाईसाहेबांनीं शिंद्यांच्या कुलांतला एक मुलगा दत्तक घेतला, आणि त्यास गादीचा धनी केले. बायजाबाईसाहेब ह्या मुख्य राज्यसूत्रचालक व मुकुटराव हे भावी राजे असे बनल्यानंतर, त्यांच्यामध्ये सात वर्षेपर्यंत अनेक तंटेबखेडे झाले. शेवटीं, इ. स. १८३४ सालीं, मुकुटरावांस गादी मिळाली, वबायजाबाईसाहेबांस राज्यत्याग करून धोलपुरास जाणे भाग पडले. तथापि, बायजाबाईसाहेब ह्या मुकुटरावांपेक्षा राज्यकारभार करण्यांत अधिक चतुर आहेत, अशी लोकांची समजूत असल्यामुळे कलह । चालू झाला; व ग्वाल्हेरच्या पुष्कळ मराठे सरदारांस त्यांनींच राज्यकारभार करावा हे पसंत वाटू लागले. न्यायाकरितां ह्मणा, अथवा राजधोरणाच्या ? कांहीं विशिष्ट हेतूकरितां ह्मणा, परंतु ब्रिटिश सरकाराने बायजाबाईसाहेबांच्या विरुद्ध पक्ष स्वीकारिला; आणि त्यांनी त्यांस ग्वाल्हेर संस्थानच्या । हद्दीबाहेर दूर ठिकाणी राहावे असा हुकूम फर्माविला. इ. स. १८४३ मध्ये मुकुटराव शिंदे मृत्यु पावले, व ग्वाल्हेर संस्थानावर ब्रिटिश सरकारचे वर्चस्व अधिक स्थापित झाले. तेव्हां त्यांनी कैलासवासी महाराजांच्या घराण्यांपैकी एक नवीन मुलगा पसंत करून त्यास शिंद्यांच्या गादीवर बसविले. ह्या नवीन शिंदे सरकाराजवळ ह्या वृद्ध महाराणी बंडाचा१४२ प्रादुर्भाव होईपर्यंत राहिल्या होत्या, असे दिसून येते. ह्या सन्मान्य बाईसाहेबांच्या विरुद्ध चकार शब्द काढण्यास मुळीच जागा नव्हती; परंतु ज्या वेळी बंड उद्भवलें, व झांशीची राणी, अयोध्येची बेगम ह्यांच्यासारख्या कर्तृत्वशाली स्त्रिया इंग्रजांच्या विरुद्ध पक्षास मिळाल्या, व बायजाबाईसाहेब ह्याही त्यांच्याप्रमाणे कर्तृत्वशाली आहेत हे जेव्हा इंग्रज मुत्सद्यांच्या लक्ष्यांत आले, तेव्हां त्यांच्या हालचालीवर नजर ठेवणे त्यांस अत्यंत अवश्य वाटू लागले. त्यांतूनही, कांहीं वर्षांपूर्वी, ग्वाल्हेर संस्थानांतील इंग्रजांच्या राजकीय वर्तनाविरुद्ध तक्रार करण्यास बायजाबाईसाहेबांस कांहीं सबळ कारण झाले असल्यामुळे, त्यांच्यावर सक्त नजर ठेवणे अधिक जरूर झाले. परंतु कितीही सूक्ष्म दृष्टीने निरीक्षण केले, तरी बायजाबाईसाहेबांचा बंडवाल्यांशी संबंध होता, असा संशय घेण्यासारखी एकही गोष्ट त्यांच्या वर्तनांत आढळून आली नाहीं.” ह्याप्रमाणे बायजाबाईसाहेबांसंबंधाने युरोपियन लोकांस जी शंका वाटत होती, ती त्यांच्या निर्मल वर्तनाने अगदीं वृथा ठरली; एवढेच नव्हे, तर त्यांच्याकडून इंग्रज लोकांस व खुद्द महाराज जयाजीराव शिंदे ह्यांस अनपेक्षित परंतु अप्रतिम असे साहाय्य मिळाले. |

No comments:
Post a Comment