मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी
बायजाबाई शिंदे
भाग 85
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
कसोटीचाप्रसंग------------------------------------------------------------------------------5
बायजाबाईसाहेब ह्यांच्या शहाणपणाचा व इभ्रतीचा लौकिक महाराष्ट्रांत व उत्तर हिंदुस्थानांत सर्वत्र पसरलेला असल्यामुळे, ह्या बंडाच्या प्रसंगी त्यांचे नांव पुढे करून, आपला पक्ष लोकप्रिय करण्याचा प्रयत्न बंडवाल्यांचे पुढारी रावसाहेब पेशवे, तात्या टोपेप्रभृति पुरुषांनी केला होता. इतकेच नव्हे,तर बायजाबाईसाहेबांस अनुकूल करून घेण्याकरितां, त्यांनी आपला वकील रामचंद्रशास्त्री हा त्यांच्याकडे पाठविला होता. बायजाबाईसाहेब अनुकूल झाल्या, तर त्यांचे अपार द्रव्यभांडार प्राप्त करून घेण्याची, व त्यांच्या सत्कीर्तीचा व वजनाचा लोकचित्ताकर्षणाचे काम विद्युल्लतेप्रमाणे उपयोग करण्याची, बंडवाल्यांस फार फार आशा होती. परंतु बायजाबाईसाहेब ह्यांनीं, ह्या प्रसंगी आपल्या मनाची लोकोत्तर निश्चलता व्यक्त१ ४३ करून, बंडवाल्यांच्या कोणत्याही विनवणीचा किंवा भुलथापीचा त्यावर परिणाम होऊ दिला नाहीं. पूर्ववयांत त्यांना स्वतंत्र राज्यकारभार चालविण्याची महत्वाकांक्षा होती; व तत्प्रीत्यर्थ त्यांनी प्रयत्नही केला होता. परंतु ह्या वेळीं अविचारी बंडवाल्यांचे प्रभुत्व स्वीकारण्याची किंवा साम्राज्यवैभव उपभोगण्याची त्यांस इच्छा नव्हती. त्यांच्या ठिकाणीं युक्तायुक्त व कार्याकार्य जाणण्याची शक्ति चांगली असल्या मुळे त्यांनी बंडवाल्यांचा पक्ष स्वीकारिला नाहीं. एवढेच नव्हे, तर बंडवाल्यांची सर्व पत्रे त्यांनी इंग्रज अधिका-यांकडे पाठविलीं, बंडवाले लोकांनीं ग्वाल्हेर प्रांतांतील प्रजेस व संस्थानच्या कामगार लोकांस अनुकूल करून घेण्याकरितां बायजाबाईसाहेबांच्या नांवाचा बळेच उपयोग केला; व त्यांच्याकडून आपणांस पूर्ण अभयवचन असल्याची पत्रे आली आहेत, अशी खोटी गप्पही उठविली. परंतु त्यांत तथ्यांश बिलकूल नव्हता, हें निराळे सांगवयास नकोच. १ ग्वाल्हेरचे पोलिटिकल एजंट मेजर म्याक्फसन ह्यांच्या चरित्रांत, खुद्द रावसाहेब पेशवे ह्यांनी आमेन येथील शिंद्याच्या मुलकी कामगाराजवळ वायजाबाईसाहेबांची पत्रे आल्याबद्दल व शिंदे सरकारचे आपणास उत्तेजन असल्याबद्दल खोटी वल्गना केल्याचा उल्लेख आहे:
बायजाबाईसाहेबांनी ह्या प्रसंगी महाराज जयाजीराव शिंदे व दिवाण दिनकरराव ह्यांच्या मसलतीप्रमाणे वागून, युरोपियन लोकांचे व त्यांच्या स्त्रियांचे संरक्षण करण्याचे काम चांगली मदत केली. इ. स. १८५७च्या मे महिन्यांत, ग्वाल्हेर येथील सैन्याने ज्या वेळीं बंडाचा झेंडा उभारला, व आपलें रुद्रस्वरूप व्यक्त करून रेसिडेन्सीवर हल्ला केला, त्या वेळीं महाराज जयाजीराव शिंदे ह्यांनीं रेसिडेन्सीमधील युरोपियन लोक वे त्यांची बायकामुले ह्यांस आपल्या राजवाड्यांत नेऊन तेथे त्यांचे जीव बचावले. त्या समयीं बायजाबाईसाहेब व शिंदे सरकारच्या महाराणी ह्या उभयतांनी त्यांस अभय देऊन त्यांची भीति दूर केली; व आपल्या खास मुतपाकखान्यांतून उत्तम उत्तम पक्वान्नं व निरनिराळे पदार्थ पाठवून त्यांच्या जेवणखाणाची उत्तम व्यवस्था केली. ही गोष्ट मेजर म्याक्फर्सन ह्यांनी ता. १० फेब्रुवारी इ. स. १८५८ रोजी आग्र्याहून पाठविलेल्या रिपोर्टमध्ये दाखल केली आहे. ह्या वेळीं बायजाबाईसाहेबांनी जी मदत केली, तिची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे. ह्यानंतर ग्वाल्हेर येथे बंडवाल्यांचे प्राबल्य विशेष झालें, व शिंदे सरकारचे सर्व सैन्य फितले जाऊन युरोपियन लोकांचे जीव सुरक्षित राहण्याची आशा नाहींशी झाली. तेव्हा महाराज जयाजीराव शिंदे व दिवाण दिनकरराव ह्यांनी त्यांस सुरक्षितपणे आग्रा येथे पोहोंचविले. पुढे कांहीं दिवसांनीं ग्वाल्हेरची स्थिति अतिशय भयंकर झाली, व बंडवाल्यांनी सर्व दिशा व्यापून टाकल्या. त्या वेळीं चतुर दिवाण दिनकरराव ह्यांनी फार शहाणपणाने राज्यसूत्रे चालवून, ह्या बंडवाल्या सैन्यास तेथेच थोपवून ठेविले. त्यामुळे आग्रा येथील किल्याचा आश्रय करून राहिलेल्या सर्व युरोपियन लोकांचे रक्षण झाले. इ. स. १८५८ च्या मे महिन्यांत, बंडवाल्यांचे पुढारी तात्या टोपे, रावसाहेब पेशवे, झांशीची राणी, बांदेवाले नबाब हे ग्वाल्हेरीवर चालून आले, व त्यांनीं शिंदे सर१४४ बायजाबाईसाहेबांनी ह्या प्रसंगी महाराज जयाजीराव शिंदे व दिवाण दिनकरराव ह्यांच्या मसलतीप्रमाणे वागून, युरोपियन लोकांचे व त्यांच्या स्त्रियांचे संरक्षण करण्याचे काम चांगली मदत केली.

No comments:
Post a Comment