मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी
बायजाबाई शिंदे
भाग 86
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
कसोटीचाप्रसंग------------------------------------------------------------------------------6
इ. स. १८५७च्या मे महिन्यांत, ग्वाल्हेर येथील सैन्याने ज्या वेळीं बंडाचा झेंडा उभारला, व आपलें रुद्रस्वरूप व्यक्त करून रेसिडेन्सीवर हल्ला केला, त्या वेळीं महाराज जयाजीराव शिंदे ह्यांनीं रेसिडेन्सीमधील युरोपियन लोक वे त्यांची बायकामुले ह्यांस आपल्या राजवाड्यांत नेऊन तेथे त्यांचे जीव बचावले. त्या समयीं बायजाबाईसाहेब व शिंदे सरकारच्या महाराणी ह्या उभयतांनी त्यांस अभय देऊन त्यांची भीति दूर केली; व आपल्या खास मुतपाकखान्यांतून उत्तम उत्तम पक्वान्नं व निरनिराळे पदार्थ पाठवून त्यांच्या जेवणखाणाची उत्तम व्यवस्था केली. ही गोष्ट मेजर म्याक्फर्सन ह्यांनी ता. १० फेब्रुवारी इ. स. १८५८ रोजी आग्र्याहून पाठविलेल्या रिपोर्टमध्ये दाखल केली आहे. ह्या वेळीं बायजाबाईसाहेबांनी जी मदत केली, तिची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे. ह्यानंतर ग्वाल्हेर येथे बंडवाल्यांचे प्राबल्य विशेष झालें, व शिंदे सरकारचे सर्व सैन्य फितले जाऊन युरोपियन लोकांचे जीव सुरक्षित राहण्याची आशा नाहींशी झाली. तेव्हा महाराज जयाजीराव शिंदे व दिवाण दिनकरराव ह्यांनी त्यांस सुरक्षितपणे आग्रा येथे पोहोंचविले. पुढे कांहीं दिवसांनीं ग्वाल्हेरची स्थिति अतिशय भयंकर झाली, व बंडवाल्यांनी सर्व दिशा व्यापून टाकल्या. त्या वेळीं चतुर दिवाण दिनकरराव ह्यांनी फार शहाणपणाने राज्यसूत्रे चालवून, ह्या बंडवाल्या सैन्यास तेथेच थोपवून ठेविले. त्यामुळे आग्रा येथील किल्याचा आश्रय करून राहिलेल्या सर्व युरोपियन लोकांचे रक्षण झाले. इ. स. १८५८ च्या मे महिन्यांत, बंडवाल्यांचे पुढारी तात्या टोपे, रावसाहेब पेशवे, झांशीची राणी, बांदेवाले नबाब हे ग्वाल्हेरीवर चालून आले, व त्यांनीं शिंदे सर४६ । गर्दीतून एकसारखी धांवत गेली; व बंडवाल्यांनी तोफा व बंदुकी ह्यांचा मारा चालविला असतांना, त्यांतून प्रवेश करून, महाराजांचा शोध करूं लागली. तेथे महाराज सुखरूपपणे आग्यास गेले अशी जेव्हा तिची खात्री झाली, तेव्हा ती त्या गर्दीतून तशीच परत आली. तिचे धारिष्ट वू शौर्य पाहून सर्व लोकांस परमावधीचे आश्चर्य वाटलें. असो. येणेप्रमाणे खुद्द शिंदे सरकार व त्यांच्या सर्व राजस्त्रिया बंडवाल्यांस अनुकूल न होता, त्यांच्या तावडीतून निसटून सुरक्षितपणे ग्वाल्हेर राजधानीच्या बाहेर गेल्या. । शिंदे सरकार ग्वाल्हेरीहून निघून गेल्यानंतर बंडवाल्यांनी ता. १ जून इ. स. १८५८ पासून अठरा दिवसपर्यंत तेथे आपले साम्राज्य चालविले. त्या अवधीमध्ये त्यांनी तेथे जी बेबंद बादशाही स्थापन केली, तिचे वर्णन झांशीच्या राणीच्या चरित्रांत सादर केले आहे. ह्यास्तक त्याची पुनरुक्ति करण्याचे येथे प्रयोजन नाहीं. ता. १८ जून इ. स. १८५८ रोजी सर ह्यू रोज ह्यांचे सैन्य ग्वाल्हेरीवर चालून आलें, व त्यांचा व बंडवाल्यांचा घनघोर रणसंग्राम होऊन त्यांत विरुद्ध पक्षाकडील रणशूर सेनानायिका झांशीची राणी लक्ष्मीबाई ही धारातीर्थी पतन पावली; आणि बंडवाल्यांची वाताहत होऊन ग्वाल्हेरनगरी इंग्रज सेनापतीच्या ताब्यात आली. नंतर तेथे ता. १९ रोजीं, सर ह्यू रोज, सर रॉबर्ट ह्यामिल्टन, व मेजर म्याक्फर्सनप्रभृति , विजयी योद्ध्यांनी अलिजाबहादरांच्या लष्कर राजधानींत प्रवेश केला, आणि आपले दोस्त परम विश्वासू महाराज जयाजीराव शिंदे ह्यांना गादीवर बसविण्याचा विजयोत्साहपूर्वक प्रचंड समारंभ केला. ग्वाल्हेरचे विजयवृत्तं ऐकून गव्हरनरजनरल लॉर्ड क्यानिंग ह्यांस अत्यंत हर्ष झाला. त्यांनी शिंदे सरकारास राज्यारूढ करण्याबद्दल पूर्ण परवानगी दिली; आणि हे आनंदकारक वर्तमान सर्व हिंदुस्थानभर कळवून, प्रत्येक शहरीं शिंदे सरकारास sal१४७ सन्मानपूर्वक व जयघोषसूचक तोफांची सलामी द्यावी ह्मणूने आज्ञा फर्माविली. त्यामुळे सर्वत्र विजयोत्सव होऊन आनंदीआनंद झाला. शिंदे सरकारच्या ‘ फुलबाग येथील प्रासादामध्ये रोषनाई, मेजवान्या व दुरबार ह्यांचा थाट उडाला, व शिंदे सरकारच्या अप्रतिम साहाय्याबद्दल सर्व ब्रिटिश अधिका-यांनी त्यांचे फार फार धन्यवाद् गायिले. ह्या प्रसंगी बायजाबाईसाहेब ह्यांचाही योग्य गौरव करण्यांत आला, हें निराळे सांगावयाचे प्रयोजन नाहीं. महाराज जयाजीराव व बायजाबाईसाहेब ह्यांचा समावेश • शिंदे सरकार ' ह्या एकाच नांवांत होतो. | शिंदे सरकारच्या कृपासाहाय्याबद्दल आग्रा येथील दरबारामध्ये हिंदुस्थानचे गव्हरनरजनरल लॉर्ड क्यानिंग ह्यांनी ता.२ डिसेंबर इ. स. १८५९ रोजी त्यांचा फार सत्कार केला; व त्यांचे कृतज्ञतापूर्वक अत्यंत आभार मानून त्यांस दत्तकाची परवानगी दिली, व त्यांच्यावर अनेक प्रकारच्या मेहेरबान्या करून त्यांस तीन लक्षांचा मुलूख बक्षीस दिला. ह्या प्रसंगी त्यांनी आपल्या भाषणामध्ये, “शिंद्यांचे राजा छ व प्रतापशाली घराणे हे अक्षय्य नांदत राहून त्याचा सदैव उत्कर्ष व्हावा अशी सार्वभौम ब्रिटिश सरकारची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे, अशी महाराज शिंदे सरकार व त्यांचे प्रजाजन ह्यांनी खात्री बाळगावी ' असे आश्वासन दिले. ह्यांतील प्रत्येक शब्दच काय, परंतु प्रत्येक अक्षर देखील बहमूल्य रत्नाच्या किंमतीचे असून, त्याची योग्यता वरील जहागिरीपेक्षाही अधिक आहे, असे ह्मटल्यावांचून आमच्याने राहवत नाहीं. इ. स. १८५७ च्या बंडामध्ये शिंद्यांच्या घराण्याने ब्रिटिश सरकारावर केलेले उपकार जसे यावचंद्रदिवाकरौ विसरण्यासारखे नाहींत, तसे हे शब्दही
४८ यावचंद्रदिवाकरौ विसरले जाणार नाहींत अशी आशा आहे. ह्याच प्रसंगी गव्हरनरजनरलसाहेबांनीं, शिंदे सरकारचे दिवाण दिनकरराव ह्यांच्या अप्रतिम राजनिष्ठेबद्दल व अद्वितीय साहाय्याबद्दल त्यांचा योग्य नामनिर्देश करून त्यांचा उत्कृष्ट रीतीने सन्मान केला; आणि त्यांच्या संबंधाने असे उद्गार काढिले की, “अशा संकटप्रसंगी आपल्या राज्यकर्त्यांची सेवा करणारा आपल्यासारखा स्वामिनिष्ठ, धैर्यवान् आणि शहाणा दिवाण क्वचितच अवतीर्ण झाला असेल. हे धन्यवाद दिवाण दिनकरराव ह्यांस व त्यांच्या यजमानांस सारखेच भूषणावह होत ह्यांत शंका नाहीं. असो. ह्याप्रमाणे महाराज शिंदे सरकार ह्यांनी व त्यांच्या पितामही श्रीमती बायजाबाईसाहेब ह्यांनी इंग्रज सरकारास अत्युत्कृष्ट साहाय्य केले, त्याचे उत्तम सार्थक झाले. ह्या साहाय्यामुळे इंग्रजी राज्यावर आलेलें भयंकर संकट दूर होऊन ते चिरस्थायी झाले, ही गोष्ट निर्विवाद आहे. महाराज जयाजीराव शिंदे ह्यांच्या अनुकूलतेमुळे इंग्रजी राज्य बचावले गेले, ही गोष्ट इंग्रज ग्रंथकारांनी प्रांजलपणे कबूल केली ( आहे. ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर म्याक्फर्सन ह्यांनी शिंदे सरकार ' विरुद्ध पक्षास सामील झाले असते, तर बंडास काय स्वरूप प्राप्त झाले असते, ह्याची कल्पना करवत नाहीं. असे स्पष्ट उद्गार काढिले आहेत. त्याचप्रमाणे मध्यहिंदुस्थानचे पोलिटिकल एजंट सर रॉबर्ट ह्यामिल्टन ह्यांनी ता. २६ एप्रिल १८५८ च्या एका खलित्यामध्ये बायजाबाईसाहेबांचा नामनिर्देश करून असे लिहिले आहे की, “पेशव्यांच्या पक्षाने, होळकर, बायजाबाईसाहेब आणि शिंदे ह्या तिघांच्या नांवांचा उपयोग करून, लोकांमध्ये असंतोष उत्पन्न करण्याचे कामीं व राजद्रोह वाढविण्याचे कामीं शक्य तितका प्रयत्न केला. परंतु ह्या प्रत्येकाच्या ब्रिटिश सरकाराविषयींच्या ख-या भक्तीमुळे त्यास यश न येऊन, तो हताश, झाला. ह्या त्रयीपैकी एकाने जरी पेशव्यांचा पक्ष स्वीकारिला असता, तरी आह्मांस किती अडचणी प्राप्त झाल्या असत्या, त्याची कल्पना करवत नाहीं. तसे झाले असते, तर ठाकूर लोक व जमीनदार लोक लगेच यांस मिळाले असते; आणि प्रत्येक गांब उघडपणे आमच्या विरुद्ध होऊन पदोपदी आह्मांस विश्न आले असते. शेवटी आमचा विजय झाला असता ह्याबद्दल कोणास शंका नाहीं; परंतु एतद्देशीय संस्थानिक आमच्या विरुद्ध होऊन पुष्कळ दिवसपर्यंत हिंदुस्थानांत एकसारखें युद्ध चालले असते, तर त्या योगाने युरोपखंडामध्ये देखील अनेक भानगडी उत्पन्न झाल्या असत्या; आणि आह्मांस जी नेटिव्ह सैन्याची फायदेशीर व महत्त्वाची मदत मिळाली, ती नाहींशी झाली असती.)

सर राबर्ट
ह्यामिल्टन ह्यांच्यासारख्या चतुर मुत्सद्यांच्या
लेखणीतून हे शब्द
निघाले असल्यामुळे त्यांची योग्यता
किती आहे, हे
निराळे सांगण्याचे प्रयोजन नाहीं.
ह्यावरून बायजाबाईसाहेबांनी ह्या प्रसंगी
ब्रिटिश सरकाराशीं जें दोस्तीचे
व एकनिष्ठपणाचे वर्तन
केले, ते त्यांस
किती महत्त्वाचे व
कल्याणप्रद झाले, हे आपोआप
सिद्ध होते. अर्थात्
बायजाबाईसाहेबांचा व ब्रिटिश
सरकारचा मागील राजकीय संबंध
आणि प्रस्तुतचे त्यांचे
सोज्वल व सप्रेम
वर्तन ह्यांची तुलना
केली, ह्मणजे ह्या
वयोवृद्ध, सुशील, आणि सत्वस्थ
राजस्त्रीसंबंधाने, मोरोपंतांच्या वाणीने, आय. सुजनातें
सुखवाया सुयशें वरिती परासुता
राजे । निवविति
चंदन गंधे छेदूं
देती परा सुतारा
जे ॥ १ ॥ किंवा,
सुभाषितकारांच्या वाणीने, सुजनो न
याति विकृतिं परहितनिरतो
विनाशकालेऽपि । छेदेऽपि
चन्दनतरुः सुरभयति सुखं कुठारस्य
॥ १ ॥ असे ह्मटल्यावांचून
राहवत नाहीं. ==-=-
No comments:
Post a Comment