विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 2 May 2020

क्रांतीसुर्य राघोजी भांगरे

फाशी देण्यापेक्षा मला तलवारिने किंवा बंदूकीने एकदम वीरपुरुषासारखे मरण द्या" असे बाणेदारपणे न्यायालयात सांगणा-या

क्रांतीसुर्य राघोजी भांगरे
नाशिक परिसरातील त्याच्या बंडाचे वर्णन पुढील ओव्यांतून आपणास दिसून येते.
झाडामधी झाड उंच पांगा-याचा
राघूनं केलं बंड नाव सांग भांग-याचा !!
राघूनं केलं बंड नितरोज हरघडी
कत्तल केली पोलिसांची मुंड्या लावल्या हो झाडो-झाडी !!
राघूनं केलं बंड कुलंग गडाच्या माळीला
गो-या साहेबांच्या टोप्या ह्या गुंतल्या हो जाळीला !!
राघूनं केलं बंड बंड घोटी खंबाळ्याला
धरणी काय आली कोंभाळण्याच्या बांबळ्याला !!
राघूनं केलं बंड बंड तीरंगळ गडाला
यानं बसविला हादरा इगतपुरी या पेठाला !!
राघूनं केलं बंड बंड
आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे थोडक्यात जीवनचरित्र -
*१) राघोजी भांगरेचा जन्म - ८/नोव्हेंबर/१८०५*
*२) आईचे नाव - रमाबाई*
*३) वङिलांचे नाव - रामजी भांगरे*
*४) मुळ गाव - देवगाव, ता.अकोले, जि.अ-नगर*
*५) क्रांतीचा उदय - १८२६*
*६) क्रांतीची प्रतिज्ञा - १८२७*
*७) सह्याय्यक सल्लागार - देवजी आव्हाङ*
*८) अंगरक्षक - राया ठाकर*
*९) राघोजीचे उठाव उग्र - १८२८*
*१०) इंग्रज सत्तेचा विरोधात - १८३०*
*११) भिल्ल समाजाची मदत - १८३०*
*१२) राजे उमाजी नाईकांना अटक - १८३१*
*१३) राघोजींना पकङण्यास ५ हजारांचे बक्षिस - १८३२*
*१४) रतनगङ परिसरात उठाव - १८३८*
*१५) बापु भांगरेस अटक - १८३८*
*१६) गो-यांच्या मोठ्या फौजा दाखल - १८४३*
*१७) राजे प्रतापसिंग भोसले यांची भेट - १८४४*
*१८) जुन्नरचा उठाव - १८४५*
*१९) उठावाच्या ठावठिकाणाचे शोध - १८४६*
*२०) राघोजीस पकङण्यास रेजिमेंटल दाखल - १८४७*
*२१) पंढरपुर येथे भिल्ल नाईकांना एकत्र आणण्यासाठी गेले असता अटक - १८४८*
*२२) क्रांतीविर राघोजी भांगरेना ठाणे कारागृहात फाशी - २ मे १८४८.*
या महान आदिवासी क्रांतिकारकाच्या 172 व्या स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...