भारतीय भूमीवर सत्ता गाजवण्याच्या आकांक्षेने भारतात उतरलेल्या इंग्रजांसमोर कित्येक राज्यकर्त्यांनी आणि संस्थानांनी गुडघे टेकवले.
पण भारतीय इतिहासात एक असा राजा होऊन गेला ज्याने इंग्रजांच्या सत्तेला भिक घातली नाही.
उलट – या राजाने इंग्रजांना स्वत:पुढे हात पसरवण्यास भाग पाडले.
त्या राजाचे नाव ‘
श्रीमंत महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय’… ज्याने करोडो रुपयांचे कर्ज देऊन खुद्द इंग्रजांना आपला कर्जदार बनवलं होत.‘मध्य भारताचे महाराजा’ म्हणून त्या काळी त्यांना ओळखले जायचे.
इंग्रजाच्या रेल्वे प्रकल्पामुळे जनतेला होणारा फायदा लक्षात घेऊन महाराजा तुकोजीराव होळकर यांनी इंग्रजांना पहिल्या टप्प्यासाठी ‘एक करोड रुपये’ कर्ज स्वरुपात दिले.
या कर्जामधून इंग्रजांनी इंदोर जवळची तीन रेल्वे सेक्शन जोडण्याचे काम पूर्ण केले.
महाराजा तुकोजीराव होळकर यांनी दिलेल्या करोडो रुपयांच्या कर्जाच्या माध्यमातून सात वर्षांच्या कालावधीत इंग्रजांनी ‘खंडवा-इंदोर’, ‘इंदोर-रतलाम-अजमेर’ आणि इंदोर-देवास-उज्जैन’ या तीन रेल्वे लाईनचे निर्माण केले. यापैकी ‘खंडवा-इंदोर’ लाईनला ‘होळकर स्टेट रेल्वे’ या नावाने देखील संबोधले जाते.
महाराजा तुकोजीराव होळकर यांनी १०१ वर्षासाठी द.सा.द.शे. ४.५ टक्के दराने कर्जाची रक्कम इंग्रजांना उपलब्ध करून दिली.
पण राजांचं vision एवढ्यावरच थांबत नाही !
एकीकडे कर्ज देत असतानाच जनतेला होणारा फायदा लक्षात घेऊन त्यांनी रेल्वे रूळ टाकण्यासाठी इंग्रजांना मोफत जमीन देखील दिली…!
डोंगराळ भाग असल्याकारणाने अतिशय मेहनतीने या मार्गांवर रेल्वे रूळ टाकण्यात आले, तसेच मार्गात येणाऱ्या नर्मदा नदीवर देखील मोठे पूल बांधण्यात आले.
इंदोर मध्ये टेस्टिंग साठी आणले गेलेले पहिले वाफेचे रेल्वे इंजिन हत्तींच्या मदतीने खेचून रेल्वे रूळापर्यंत आणण्यात आले हे विशेष!
सदर घटना भारतीय इतिहासासाठी आणि भारतीय रेल्वेसाठी अतिशय महत्वपूर्ण घटना मानली जाते.
ज्या इंग्रजांसमोर कित्येक निष्पाप बांधवांना नामुष्कीने हात जोडावे लागले, त्याच इंग्रजांनी एका भारतीय आणि महाराष्ट्रीयन घराण्यातील राजासमोर पैश्यांसाठी हात पसरावे लागले यापेक्षा अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी दुसरी कोणती असेल?!
No comments:
Post a Comment