आनंदीबाई पेशवे
postsaambhar:::Ashish Mali, रासायनिक अभियंता
इतिहासात अत्यंत कुटील आणि कारस्थानी स्त्री म्हणून आनंद बाईचे नाव प्राधान्याने घेतले जाते.पण त्यात किती खरे आणि किती खोटे हे इतिहासाला माहित.
पराक्रमी आणि दुर्गुनी नवरा(राघोबा दादा) आणि राज्य बुडव्या मुलगा दुसरा बाजीराव अशी आनंदीबाई कारस्थानी नाही तर दुर्दैवी आहे.
आनंदीबाईं ना मनापासून वाटत होते की राघोबा दादा पेशवे व्हावे. आपल्या पराक्रमी नवरा ज्याने मराठ्यांचा झेंडा अटकेपार पोचवलं त्याला पेशवे पद मिळावे हे काही गैर नाही. नानासाहेब पेशवे नंतर खर तर राघोबा दादांना पेशवे पद सहज मिळेल असे वाटले.पण ते तर माधवराव ना मिळाले. माधवराव लहान आहे आणि सर्व आपल्यालाच पहावे लागेल हा गैरसमज माधवराव पेशवे नी आपल्या कर्तबगार पराक्रम ने सिद्ध केला.
पण माधव राव पेशवे ची मृत्यू नंतर त्यांची इच्छा ला पुन्हा धुमारे फुटू लागले.माधवराव पेशवे नंतर पेशवे झालेले नारायण राव हे मनाने अस्थिर आणि संशयी होते. नारायण पेशवे याविषयी समकालीन पत्रामध्ये खूप चांगले लिहिले नाही. उदाहरण म्हणजे खालील वाक्य
- धन्यास धनी पण नाही
- श्रीमंतांचची मर्जी फारच उतावीळ आहे.लहान माणसांची चाल पडलेसे दिसते.
- आप पर कळत नाही, कारभारी म्हणतील ते प्रमाण.
'ध' चा 'मा' केला इतिहासात सापडते ते पेशव्यांचा बखर लिहिणारे कृष्णाजी विनायक सोहोनी यांनी.त्याचा कित्ता नंतर इतिहासकारांनी गिरवला. पण राजवाडे याना ते मान्य नाही. आजचे इतिहासकार कौस्तुभ कस्तुरे यानांपण मान्य नाही.
राघोबा दादा आणि सखाराम पंत बोकील यांनी सुमेरसिंग गारदी आणि इतर बरोबर नऊ लाख रुपये देऊन नारायण राव यास धरावे अस ठरले.पण आनंदीबाई यांणी पाहून 'धरावे' असे जे होते त्यात 'ध' चा 'मा' केला. ही गोष्ट सखारामपंत यांस माहित नव्हती. असे म्हटले आहे.
ध चा मा केलेल्या गोष्टीला अस्सल आधार आज सापडलेला नाही. अस्सल पत्र नाही.
खालील गोष्टी आहेत ज्या द्वारे आनंदी बाई नी यात सहभाग नसावा असे सिद्ध होते.
- पत्र मोडी लिपीत होते तर ध चां मा कसा होईल. देवनागरीत शक्य होईल पण मोडी मध्ये कसे ?
- नारायण पेशवे यांच्या हत्येनंतर महमद इसाक याला नाना फडणवीस ने पकडले पण त्यात त्यांनी म्हणाले की नारायण पेशवे याना पकडायल गेलो पण सुमरसिंग च्या हातातून आयत्या वेळी हत्या झाली. नारायण पेशवे याना मारण्याचा मानस कोणच नसतं. या जबानीत आनंदीबाईंचे उल्लेख पण नाही.
- नारायण पेशवे यांची पत्नी गंगाबाई याना आनंदीबाईं नेच गारदी पासून वाचवले.पण ज्या आनंदीबाईंने गंगाबाई गरोदर आहे असें जाणूनहि तिच्या सहगमनास म्हणजे सती जाण्यास विरोध केला. नारायणरावाच्या वधानंतर गंगाबाई सती जाऊं लागली तेव्हां आनंदबीईनें 'जातीस कुठें तुझी पाळी चुकली आहे' असे म्हटले असल्याचा हरिवंशाच्या बखरींत (कलम ७३) उल्लेख आहे.
- सातार च्या राजाराम महाराज कडे नारायणरावा करितां पेशवाईचीं वस्त्रें आणण्यास नारायणरावा बरोबर जाताना पंचवीस लक्षांच्या वातानासाठी राघोबा दादा अडून बसले होते पण आनंदीबाईनें 'वतन घेण्याऐवजी नारायणराव म्हणतो त्याप्रमाणें स्वतःच वडीलपणानें कारभार करावा' असा राघोबास सल्ला दिल्यावरून राघोबा दादा नारायणरावाबरोबर गेला
- आपल्यावरील झालेला हा आरोप स्वतः आनंदीबाईहि जाणून होती असें इतिहासंग्रहांत छापलेल्या (पु.६, अं. ४, ५, ६) मेणवली दफ्तरांतील एका पत्रावरून कळतें. तथापि त्याच पत्रावरून नाना फडणीस आदिकरून मंडळीस तिच्या अपराधाचें माप तिच्या पदरांत घालण्याइतका स्पष्ट पुरावा मिळाल नव्हता अशीहि कळते.
- राघोबादादाचें अस्सल पत्र रामशास्त्र्यांच्या हातीं पडलें असे जरी मानले (ग्रांटडफ) त्यावरून 'ध' चा 'मा' झाला होता हें जरी सिद्ध झाले तरी तो कोणीं केला हें त्यास गूढच राहिलें असावें.
- नाना फडणिसानें नारायण राव पेशवे यांचे मारेकरी तुळाजी पवाराची विचारणा घेतली त्यात आनंदीबाईंचें नांव पुढें आलें नव्हते.
- आनंदी बाई नी अनेक पत्रातून स्वतःचा मुलगा दुसरा बाजीराव याची वाईट वळणे आणि सवई च अनेकदा पत्रामध्ये उल्लेख केला आहे.(अर्थात त्याच्यावर चांगले वळण लागवें ही इच्छा.)अशी स्पष्टवक्ता बाईने मात्र स्वतःच्या आरोपाचे खंडन केले आणि लोकाकडे त्या काळी पुरावे मागितले.
संदर्भ
1.पेशवाई कौस्तुभ कस्तुरे
No comments:
Post a Comment