विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 June 2020

शिवकन्या राणुआक्का यांचा भुईंज येथील 300 वर्षापूर्वीचा वाडा

"

शिवकन्या राणुआक्का यांचा भुईंज येथील 300 वर्षापूर्वीचा वाडा "राणुआक्का या शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या द्वितीय कन्या. राणुआक्का म्हणजे प्रेम, त्याग ,समर्पण, ह्यांचा अखंडपणे वाहणारा झराच जणु .राणु आक्कांचा जन्म इ.स.1651 मधे राजगडावर झाला.इ.स.1660 मधे जिजाऊ माँसाहेब व शिवाजी महाराज यांनी राणुआक्का यांचा विवाह सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर एक वर्षांनी राजगडावर लावून दिला.राणुआक्का यांचा विवाह शिंदखेडचे लखुजी जाधवराव यांचे पुत्र दत्ताजी,दत्ताजी यांचे पुत्र ठाकुरजी व ठाकुरजी यांचे पुत्र अचलोजी जाधवराव यांच्याशी झाला होता. जाधवरावांच्या घरी राणुआक्का देऊन जिजाऊ माँसाहेबांनी आपले माहेर, तर शिवाजी महाराजांनी आपले आजोळ नव्या नात्याने जवळ केले.राणुआक्कांचे आपले छोटे बंधु शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम होते. शंभूराजेंना आईची ऊणीव राणुआक्कानी कधीच भासु दिली नाही. आपल्या बंधुच्यामागे कायम त्या ढाली सारख्या ऊभ्या रहात. अशाया राणुआक्का पुणे सातारा महामार्गावर भुईंज या गावी सिंदखेडकर लखुजी जाधवरावांचे वंशजांमध्ये दिल्या होत्या. . निजामशाहाने लखुजी जाधवरावांच्या मुला नातवासहीत त्यांची हत्या केली ,त्या नंतर सर्व जाधवराव महाराष्ट्रात विखुरले गेले. यांची प्रमुख घरे भुईंज, माळेगाव, वाघोली , येथे स्थायिक झाली
या प्रमुख घरापैकी भुईंज हे घर .येथेच राणुआक्का यांचे वास्तव्य होते.आजही भुईंज येथील वाडा इतिहासाच्या पाऊलखुणां जपत मोठ्या दिमाखात उभा आहे.राणुआक्का यांचे वंशज महेंद्रसिंह ऊर्फ भैय्या साहेब जाधवराव तेथे वास्तव्यास आहेत
" शिवकन्या राणुआक्का यांना
मानाचा मुजरा, "

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...