#कृष्णा_नदीपासून_रामेशवर_पर्यंत_मराठ्यांचा_दरारा_निर्माण_करणारा_वीर दक्षिणेत मराठ्यांना मदत करू शकेल असा एकमेव शूरवीर मराठा कर्नाटकाच्या हद्दीवर होता आणि त्यांचे नाव होते मुरारराव घोरपडे. मुरारराव हे अत्यंत शूर, मुत्सद्दी व धोरणी फौजबंद सरदार होते. सरसेनापती संताजी घोरपड्यांच्या वंशातील ह्या पुरुषाने आपल्या महापराक्रमाने हैदरअलीच्या विरोधातील मोहिमेत मराठ्यांना जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. राजाराम छत्रपतींचे प्रसिद्ध सेनापती संताजी घोरपडे यांस बहिरजी नावाचा भाऊ होता, बहिर्जींचा मुलगा शिदोजी व त्याचा मुलगा हा मुरारराव होय. संताजीच्या मृत्यूनंतर बहिरजीने कर्नाटकांत स्वतंत्रपणे गजेंद्रगड, गुत्ती वगैरे प्रांत मिळविला. मुरारराव घोरपडेही पेशवाईच्या काळांत ३० वर्षे स्वतंत्रपणे वागून हैदरअली, फ्रेंच, इंग्रज, अर्काटचे नबाब, साबनूर व कडाप्पाचे नबाब यांना एकमेकांविरुद्ध मदत करून मराठ्यांचा फायदा करून घेत असे. मुराररावाजवळ ८ ते १० हजार घोडदळ असून, ते उत्कृष्ट दर्जाचे असे. मुरारराव आपल्याला सातारकर छत्रपतींचा सेनापती म्हणत असे. मुराररावाने कर्नाटकांत मोठ्या प्रमाणात स्वराज्यप्रसाराचे काम केले. त्यानंतर थोरले माधवराव व सवाईमाधवराव यांच्या कारकीर्दीमध्येही मुराररावाने कर्नाटकांतील मराठा राज्य संभाळण्याचे बिकट काम पार पाडले. मराठ्यांच्या कर्नाकांतील बहुतेक मोहिमांत मुरारराव यांनी काम केले. रघूजी भोंसल्याच्या कर्नाटकाच्या स्वारीत मुरारराव हे हजर होते. व त्याबद्दल त्यांस तुंगभद्रेच्या काठचे तीन परगणे मिळाले होते व त्रिचनापल्लीचा किल्लाही १७४९ साली मुराररावांच्या हाताखाली ठेवला होता. १७५६ साली मुरारराव घोरपडे हे पेशव्यांच्या विचित्र वागण्यामुळे सावनूरकरास मिळाले होते. परंतु बळवंतराव मेहेंदळयाने त्यांची समजूत करून त्यांना परत आणले. मुरारराव घोरपडे यांची जहागिरी ही हैदरअलीच्या हद्दीला लागून असल्यामुळे हैदरअलीच्या व मुरारराव घोरपडे यांच्या नित्य झटापटी होत असत. मुरारराव घोरपडे यांचा बराचसा प्रांत हैदरअलीने घेतल्याने १७६२ साली थोरल्या माधवरावाच्या हैदरअलीवरील पहिल्या स्वारीत मुरारराव घोरपडे हा त्यांना सामील झाला. तेव्हां मुरारराव घोरपडे यांना सेनापतिपद दिले गेले व त्यांचा मुलुख हैदरअलीजवळून जिंकून १७६४-६५ साली त्यांस परत दिला. पेशवाईच्या भांडणामुळे कोणा एकाची बाजू न घेता बारभाईच्या कारकीर्दीत मुरारराव घोरपडे हे गुत्तीस तटस्थ राहिले होते. राघोबादादाने मुराररावांना आपल्या बाजूस वळविण्याचा केलेला प्रयत्न फुकट गेला होता. मराठे इंग्रजांशी गुजराथेत लढण्यांत गुंतले असता हैदरअलीने गुत्तीस वेढा दिला तेव्हां मुराररावाने अत्यंत शौर्याने पुष्कळ दिवस लढाई करून किल्ल्याचा बचाव केला. अखेर हैदरअलीने विश्वासघात करून किल्ला घेऊन मुराररावास १७७६ साली कपालदुर्ग किल्ल्यावर चांदीची बेडी घालून ठेविले. हैदरअलीच्या कैदेतच या शूर वृद्ध मराठा सेनापतीचा अंत झाला. कोणाचेही फारसे पाठबळ नसताना परमुलुखात तलवारीच्या जोरावर मिळविलेले गुत्तीसारखे संस्थान मुराररावाने उत्तम रीतीने राखले आणि कृष्णेपासून रामेश्वरपर्यंत सर्व राजवाडयांवर आपला दरारा बसविला. हैदरअलीच्या विरोधातील लढायांच्या वेळी इंग्रजांना अनेक वेळा साहाय्य केल्याबद्दल त्यांनी मुराररावाची स्तुति केली आहे. सन १७०४ पासून १७७६ पर्यंत अव्वल व उत्तर मराठेशाही पाहिलेला असा हा एकच दीर्घायुषी पुरुष होता.
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment