विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 20 June 2020

शुरवीर रामजी पांगेरा

शुरवीर रामजी पांगेरा...

दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला.
या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेलेहोते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला
मराठ्यांच्या ताब्यातहोता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.
कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता.
कारण मोगलांच्या फौजा केव्हा
स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होता रामाजी पांगेरा.
हा रामाजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर
थैमान घातले होते. (दि. १० नोव्हेंबर १६५९ ) त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होता.
एक दिवस दिवसाउजेडी त्याला हेरांनी खबर दिली की , औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ
घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामाजीची फौज चिमूटभरच होती.
ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर
जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामाजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला.
तो आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभा राहीला. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला
समजलेच होते. रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला , ‘ मर्दांनो , खानाशी झुंजायचंय ,
जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते) येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी , पळाल त्याला चोळीबांगडी ‘ असे बोलून रामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे
घेऊन त्याने एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचारली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले.
मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच…
वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडा आठवला. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता.
अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामाजी पांगेऱ्याने दाखवून दिले की ,
मराठीयांची पोरे आम्ही , भिणार नाही मरणाला. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला.
बाराशे मुघली पठाण रामजी व मावळ्यांनी यमसदनी पाठविले होते .
कण्हेरा गडाला दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही.
परंतु रामाजी पांगेरा स्वराजासाठी कामी आला.
काही दिवस लोटले.
सरसेनापती प्रतापरावांनी महाराजांना रामजी पांगेरा यांच्या
कोरजोई या गावी जाण्याचे सुचविले.महाराज कोरजाई गावात प्रतापरांवन बरोबर गेले. वीर रामजी पांगेरांच्या वडीलांना राजे भेटीस येत आहेत हा निरोप देण्यात आला.त्यांचे नाव मारुती पांगेरा .त्यांची तारांबळ उडाली,त्यांनी खराटा घेऊन कट्टा झाडला व घोंगडं हांतरल .
महाराज घोड्यावरुन पायउतार होताच मारुती पळत जाऊन पाया पडु लागले.महारांजानी त्यांना उठविले व हे काय करताय बाबा तुम्ही आर्शिवाद द्यायचे असतात. मारुतीबाबांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.त्यांनी राजेंना कटड्यावर बसविले व घरात जाऊन त्यांची पत्नी व रामजी पांगेरा यांची विधवा पत्नी व बारा वर्षांचा मुलगा यांना घेऊन आले व त्या सर्वांनी राजेंचे पाय धरले. मारुती बाबांना तर काय बोलावे सुचतच नव्हते.ते म्हणाले धाकल पोर रुपाजी शिवारात गेलाय निरोप धाडलाय ईल एवढ्यात.
त्या दु:खी घराचा आनंद पाहुन महाराजांना कसेबसे वाटले.
महाराज मारुती बाबांना म्हणाले "असुदे बाबा तुम्ही बसा माझ्यापाशी..."
"आमच नशीब थोर म्हणुन तुमच पाय गरीबाच्या घराला लागल"
नाही बाबा! हे गरीबाच घर नाही ,छातीचा कोट करुन दिलेरखानाला थोपविणाऱ्या रामजीच घर हे.
रामजीची आठवण झाल्यावर बाबांचे डोळे भरुन आले ,राजेंनी ही स्वताच्या डोळे पुसत बाबांना धीर दिला.
बाबा रडु नका...
"नाही रडत ,पोरानं कुळी धन्य केली म्हणुनतर तुम्ही गरीबाच्या घरी आलास आणि माझ घरच उध्दारुन गेलं."
राजे खीण् पणे हसले .
बाबा!आमच कसलं कौतुक ? रामजी सारख्यांच्या जीवावर
राज्य करीत राहणारे आम्ही!
राज्यांच्या या बोलण्याने मारुती बाबा कळवळले .
असं बोलु नकोबाबा तु हाईस म्हणुन पोरं पुढं बघुन लढत्याती.
कधी न्हाई ते मुलखात सण साजरा होतय. नाहीतर गरीबांच्या तोंडांत राखच कि,तु हाईस म्हणुन चार घास तोंडांत जात्यात.
राजेंना बाबांचे बोलणे कळेना ,
बाबा आमच्यामुळे कसे काय?
बाबा बोलले , कुलकर्णी , देशपांडे, पाटील,जागिरदार हे ईल ते पीक घेऊन जायाचे आण आम्ही रानातल्या मेरुल्या खाऊन जगायचं.
आणि आता ?
ती बैल दिसतात का तुझ्या सरकारीत मिळालं! शेतकऱ्याला
जनावर मिळाली ,देणं नसल तर पिकाला काय तोटा?दोन हिस्स घेतोस ,तीन मागीतलास तरी हसत देऊ.
महाराज पुढे बोलले ,"बाबा जीवाला जीव देणारी माणसं मिळाली मला आणि काय हवं."
रामजीचा धाकला भाऊ रुपाजी आला होता.शरीराने बलदंड होता तो.
महाराजांनी सोन्याची थैली काढून मारुती बाबांच्या हाती देण्याचा प्रयत्न केला तोर बाबांनी हात मागे घेतले व ते म्हणाले "राज ,पोरं गेलं म्हणुन देयायची काय भी गरज नाय,घर हाय,शिवारात शेत हाय आणि तु पाठीशी असल्यावर पैका कशाला लागतोय.
देणारच असशील तर या रुपाजीला रामजी सारखी पायापाशी
जागा दे.
महाराज कळवळुन बोलले "पण बाबा , घर कोण बघणार ,शेत कोण पिकवणार तेही स्वराजाचेच काम आहे."
मी काय म्हातारा झालोय होय ,अजुन खमक्या हाय घर अण् शेत स्वता बघीन ,आता
पण नाय अण काय नाय...

अशी माणसं रयत म्हणुन मिळणं हि या भुतलावरील अविश्वसनीय घटना आहे ,कारण या रयतेचा राजा शिवराय आहेत.
महाराजांनी रुपाजीला आपले केले...
महाराज सरसेनापती प्रतापरावांन वर खुप खुश होते व
महाराजांना त्यांचे जीवन सफल झाल्याचा आनंद झाला होता.
रयत व महाराज हे असं नातं होतं की परमेश्वराला पण हेवा वाटे...

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...