विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 8 July 2020

सरदार त्रिंबकजी डेंगळे-------------7

सरदार त्रिंबकजी डेंगळे-------------7
लेखन- © सुमित अनिल डेंगळे.
त्रिंबकजीच्या भेटीचे वर्णन करताना हेबर म्हणतो, ‘तो काहीसा बुटका, तरतरीत व चिडचिडा दिसणारा व्यक्ती आहे. जेव्हा मी त्याला पाहिले त्याने मळके सूती धोतर घातलेले असून लाल रंगाची किनार डोक्यावरून व खांद्यावरून निष्काळजीपणाने टाकलेली होती. कर्नल अलेक्झांडरने मला त्याची ओळख करून दिली. तो सभ्यतापूर्वक मला सामोरे गेला. त्याने बंधुभावपूर्वक मला देण्यासाठी काही सुंदर फुले तोडून आणली. त्यानंतर त्याने मला त्याची बाग व देवघर दाखवले आणि काही सामान्य संवादानंतर मी त्याच्यातला एक अनोखा योद्धा अनुभवला जेव्हा तो हसून मला म्हणाला, ‘तुम्हाला माझी ओळख इतरत्र करून द्यायला आनंद झाला असता.’ मी त्याला अभिवादन केले व तेथून निघालो.’

पुढे तो म्हणतो, ‘तो आता, माझ्या मते पाच वर्षांपासून कैदेत आहे आणि आयुष्यभर इथेच राहण्याची शक्यता आहे किंवा त्याचा आश्रयदाता बाजीराव असेपर्यंत. तो त्याच्या सद्यस्थितीसाठी बॉम्बेचे गव्हर्नर एल्फिन्स्टन यांना जबाबदार धरतो. तो म्हणतो, ‘एल्फिन्स्टन माझा सर्वात चांगला मित्र आणि सर्वात वाईट शत्रू आहे.”
त्रिंबकजीविषयी चिंता व्यक्त करताना हेबर म्हणतो, ‘त्याचं जीवन आता उदास, नीरस आणि कंटाळवाणं झालंय. त्याची पूर्ण करमणूक म्हणजे त्याच्या देवाची पूजाअर्चा, बागकाम व नोकरांसोबतच्या गप्पा. हल्ली तो त्याच्या हिशोबात फारच व्यस्त असतो. त्याच्या स्वयंपाक्याने त्याचे तूप चोरल्यामुळे त्याने केवढातरी आरडाओरडा केला होता. काय त्याच्या नशिबाने ही वेळ त्याच्यावर आणली की एक खुनी, दंगेखोर व खोटारडा व्यक्ती म्हणून त्याला आता जगावं लागतंय. मला आशा आहे की मला त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करता येईल.’

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...