postsaambhar : डॉ . उदयकुमार जगताप
१६७४ मध्ये छत्रपतींची राजधानी रायगड म्हणून निश्चित झाले
सन १६७१ मध्ये रायगडची राजधानी करण्याचा निच्चय महाराजांचा झालेला दिसतो .
शके १५९३ मधील कागदपत्रांवरून किल्ल्यांसाठी किती खर्च करायचा याचा तपशील बघता रायगडासाठी ५० हजार होनाची तरतूद दिसते व इतर किल्ल्यांसाठी १० हजार होनांची तरतूद केलेली केली होती
या ५० हजार होनाच्या तपशिलात तळी ,घरे तटबंदी यासाठी खर्चाची तपशीलवार माहिती मिळते .
शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची निवड का केली, याबद्दल सभासद म्हणतो ,"राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट ,चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे ,,दीड गाव उंच पर्जन्यकाळी कडियावरी गवत , उगवत नाही आणि धोंडा तासीव एकाच आहे दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोटका दौलताबादचे दशगुणी गड उंच .असे देखोन बहुत संतुष्ट जाले
आणि बोलिले ,'तक्तास जागा ,गड हाच करावा "
शिवाजी महाराजांनी गंगासागर,व हत्ती तलाव पाण्याच्या सोयीसाठी अगोदर खोदले असावं असे वाटते.
रामचंद्र पंत अमात्य लिहितो " ',गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधवा , ,पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी ,टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी'
उत्तर भारतातील हिंदी" भूषण "कवी हा छत्रपतींच्या समकालीन होता.
तो राज्याभिषेकाच्या वेळेस उपस्थित असावा
"शिवराज भूषण" या त्याच्या काव्यात तो म्हणतो ,'शिवाजीने सर्व किल्ल्यांचा मेरुमणी व वैभवस्थांन अशा रायगड किल्यास आपले वसतिस्थान केले आहे . या किल्ल्यावरील शिवाजीचा दरबार ऐश्वर्य पाहून कुबेर लाजू लागला "
'हा किल्ला एव्हडा प्रचंड व विशाल आहे कि त्यात तिन्ही लोकांचे वैभव साठविले आहे सर्व यवनांना जिंकून राजा शिवाजीने रायगडला राजधानी केली आहे व जगात श्रेष्ठ यश संपादन केले "
कवी भूषण म्हणतो "आकाशाशी इतर कोठेच आधार नसल्यामुळे तप्त झालेले चंद्र- सूर्य रायगडवर विसावा घेतात"
' केळदिंनुपविजयम' या कानडी काव्यात रायगडचे वर्णन करताना 'भूतलात
आश्यर्यकारक म्हणून गणला जाणारा रायरी "असा उल्लेख आहे
मे १६७३ मध्ये टॉमस निकल्स हा इंग्रज प्रतिनिधी छत्रपतींना भेटण्यासाठी रायगडवर आला होता
त्याने रायगडचे वर्णन १६७३ मध्ये करून ठेवले आहे
तो म्हणतो,'अन्नाचा पुरवठा भरपूर असल्यासं अल्प शिबंदीच्या साह्याने रायगड सर्व जगाविरुद्ध लढू शकेल ४० फुटाची तटास दुसरी भिंत बांधून किल्ला अभेद्य बनवला आहे '
टेकडीच्या माथ्यावर मोठे शहर वसले आहे .घरे सामान्य प्रतीची आहेत .अत्युच्च भागी शिवाजीचा चौपसी वाडा आहे त्याच्या मध्यभागी मोठी इमारत आहे
त्या इमारतीत बसून शिवाजी कारभार पाहतो '.
काही परदेशी प्रवाश्यांची रायगडला पूर्वेकडील" जिब्राल्टर"" असे म्हटले आहे जिब्राल्टर" मधेही उणीव आहेत पाणी पुरवठा ,धान्यपुरवठा असा उणीव नसलेला फक्त रायगड !
१६७२ मध्ये मध्ये राजधानीची उभारणी झाली
त्याबाबत सभासद म्हणतो," रायगडास इमारती, सर कारकुनाचे वाडे ,दुकानांची चिरेबंदी करवली आपणास महालाचे अष्टकोनी बिछाने बसवायचे व विवेक सभा ,कल्याण महाल ,प्रगट सभा, दप्तर महाल ,खासे मंदिर ,अष्ट महाल व अष्टकुळवधूस व राजकुवरास राजकन्येस महाल बांधून दिले
१६७३-७४ मध्ये" रामजी दत्तो" या रत्नशाळेच्या अधिकाऱ्याकडून महाराजांनी सिहासन बनवून घेतले
सभासद म्हणतो , " ते ३२ मण वजनाचे होते ".
१८ मार्च १६७४ मध्ये काशीबाई साहेब यांचे निधन झाले
. छत्रपतींचा राज्याभिषेक समारंभ २९ मे पासून ६ जून १६७४ पर्यंत चालला .
सभासद म्हणतो' या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह ,मराठा पातशाह एव्हडा छत्रपती जाला हि गोष्ट सामान्य जाली नाही '
हेनरी ऑक्झेडनने आश्चर्य व्यक्त केले कि "गडावर हत्ती घोडे हे प्राणी राज्यांनी कसे आणले असतील "
. ११ दिवसांनी जिजाबाई पाचाड गावी मृत्यू पावल्या
.११ जून १६७४
दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर १६७४ साली झाला.
७ मार्च १६८० रोजी छत्रपतींचा मुलगा राजाराम याची मुंज झाली
१५ मार्च १६८० प्रतापराव गुजरांच्या मुलीबरोबर राजारामांचे लग्न रायगडावर झाले
३ एप्रिल १६८० छत्रपतींचे महानिर्वाण झाले .
सभासद म्हणतो ,"राजा साक्षात केवळ अवतारच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदेपासून रामेश्वरापर्यंत द्वाही फिरली. देश कबीज केला आदिलशाही, कुतुबशाही,निजामशाही,मोगलाई या चारी पातशाह्या व समुद्रातील बेवीस पातशहा असे जेर जप्त करून ,नवेच राज्य साधून मराठा पातशाह सिहासनाधीश छत्रपती जाहला प्रतिइच्छा मरण पावून कैलासास गेला ये जातीचा कोणी मागे जाहला नाही. पुढे होणार नाही असे वर्तमान महाराजांचे जाहले "
२० जुलै १६८० दिवशी संभाजीराजेंनी राज्य भिषेक रायगडी केला.
३ नोव्हेम्बर १६८९ रायगड मुघलांच्या ताब्यात आला संभाजी पत्नी येसूबाई व मुलगा शाहू याना कैद केले
औरंजेबाच्या मृत्यू नंतर रायगड सिद्दी याकूदखान याच्या हवाली करण्यात आला
१७३३ मध्ये रायगड छत्रपती शाहूंनी जिंकून घेतला
शाहूंचा वारस रामराजा याने ऑगस्ट १७७२ मध्ये रायगड नारायणराव पेशवे यांनी रायगडावर सत्ता प्रस्थापित केली
सखाराम बापू बोकील १७८१ मध्ये रायगडावर कैदेत मरण पावले
सवाई माधवराव यांची पत्नी यशोदाबाई हीच मृत्यू १४ जानेवारी १८११ मध्ये रायगडी झाला
१० मे १८१८ मध्ये रायगड इंग्रज अधिकारी
कर्नल प्रॉथरच्या ताब्यात गेला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळात व त्यानंतरच्या पडझडीच्या काळातील साक्षीदार रायगड आहे महाराष्ट्राचा मानबिंदू .सर्व तीर्थात पवित्र असे धारातीर्थ आहे .
No comments:
Post a Comment