postsaambhar :डॉ. उदयकुमार जगताप
स्वराज्याच्या रक्षणासाठी पुरंदरच्या सरदारांनी छातीचा कोट केला .
काही सरदार शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात व काही पेशवाईत उपजले .
छत्रपतीच्या स्वराज्यासाठी रक्त सांडले
. त्यापैकी एक सरदार पिलाजीराव जाधवराव .
छत्रपती शाहू महाराजांना औरंगजेबाकडून महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी जी मात्तबर सरदार मंडळी गेली होती त्यामध्ये पिलाजीराव जाधवराव यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल .
छत्रपती शाहू महाराज प्रसन्न होऊन त्यांनी मौजे दिवे व मौजे नांदेड इनाम दिला .
पुढे छत्रपतीनी औरंगाबाद प्रांती कन्नड व फुलंब्री मोकासे सरंजामास दिले छत्रपती महाराजांचे प्रत्येक कामगिरी योग्यपणे,पराक्रमाने पार पाडू लागले . पेशवाईस त्रास देणाऱ्या दामाजी थोरात यास पकडून साताऱ्यास छत्रपतींच्या समोर हजर केल्याने त्यांचा नाव लौकिक वाढला
आणि बाळाजी विश्वनाथ व बाजीराव पेशवे यांचेबरोबर अनेक स्वार्या करून प्रदेश छत्रपतींच्या स्वराज्यात आणला.
नबाबावर स्वार्या करून मौजे गोळेगाव व मौजे मौजे मरकाल येथील जहागिरी मिळवली.
या दरम्यान छत्रसाल बुन्देलावर शत्रू चाल करून आला त्यावेळेस बाजीराव पेशवे यांच्याबरोबर जाऊन शत्रूचा नयनाट केला
. बुंदेल खंडाचा पाच लक्ष रुपयांचा प्रदेश स्वराज्यात आणला.
त्यावेळेस पिलाजीराव जाधवराव यांना मौजे वासा इनाम मिळाले. त्र्यंबकरावदाभाडे यांनी बाजीराव यांचेवर चढाई केली असता दाभाडेंची कुमक जड असतानाही पिलाजीराव जाधवांनी पराक्रमाची शिकस्त केली व दाभाडे यांना पिलाजीराव जाधवराव यांनी गारद केले .
वसईच्या चिमाजीअप्पा यांच्या मसलतीस पिलाजीराव जाधवराव यांनी जाऊन वसईचा प्रदेश स्वराज्यात आणला
.बंगालच्या मोहिमेत नानासाहेब पेशव्यांच्या बरोबरीने लढून सेनापती पद धारण करून अतुलनीय पराक्रम केला .
त्यामुळे श्रीमंत नानासाहेब पेशवे सरदार पिलाजीराव जाधवराव यांना 'काका' म्हणत होते.
बंदिखान्यातील लोकांची खातरजमा पेशवे पिलाजीराव यांच्याकडून करून घेत असत.
पुणे प्रांतातील वाघोली जहागिरी म्हणून देण्यात आली .
पेशवाईत सर्व फौजेची महत्वाची जबाबदारी पिलाजीराव जाधवराव यांच्याकडे देण्यात आली पिलाजी जाधवराव यांचा मृत्यू३ जुलै १७५१ रोजी झाला .
पुरंदर तालुक्यातील जाधववाडी येथे पिलाजीराव यांनी १७१०मध्ये जाधव गढीचे बांधकाम पूर्ण केले व ते तेथे राहू लागले .
पिलाजीराव जाधवराव यांचे पुत्र सटवाजीराव यांना दोन पुत्र झाले सुभानजी व जोत्याजीराव .
जोत्याजीराव हे जाधववाडी पुरंदर येथे वास्तव्यास राहिले व सुभानजीराव वाघोली येथे वास्तव्यास राहिले .
सुभानजीराव यांना दोन पुत्र संभाजीराव व माळोजीराव जाधवराव संभाजीराव यांना एक पुत्र पिलाजीराव व मालोजीराव यांचा वश वाघोली पुणे येथे वास्तव्यास राहिले .
मौजे दिवे येथील पिलाजीराव जाधवराव यांची गढी इतिहासाची साक्ष देत वर्षानुवर्ष निसर्गावर मात करीत मूकपणे उभी आहे .
No comments:
Post a Comment