विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2020

## आग्र्याहून सुटका ##




## आग्र्याहून सुटका ##
postsaambhar :डॉ उदयकुमार जगताप

छत्रपती शिवाजी महाराज सन1666 च्या 5 मार्च रोजी आग्रा येथे जाण्यास निघाले. वाटेत औरंगाबाद येथे आठवडाभर थांबले होते,12 मे1666 मध्ये महाराज आग्रा येथे पोहोचले .महाराजांचे उत्कृष्ट वर्णन आणि त्यांच्या लावजम्याची माहिती राजस्थानी रेकॉर्डस मधून मिळते "शिवाजी हा फक्त 100 सोबत्याना घेऊन आला आहे. त्याचे रक्षक अडीचशे आहे शिवाजी जेंव्हा पालखीतून स्वार होऊन निघतो तेंव्हा त्याचे पायदळ सैनिक तुर्कांच्या पद्धतीने पुढे चालतात .त्याचा झेंडा नारंगी शेंदरी रंगाचा असून सोनेरी छाप आहे .दिसण्यात शिवाजी हा बांध्याने किरकोळ आहे .स्वरूपाने विलक्षण गोरा आहे .त्याच्याकडे पाहताच कोणालाही असे वाटावे की हा राज्याचं असला पाहिजे. तो अतिशय हिमतीचा आणि मर्द माणूस दिसतो. शिवाजीला दाढी आहे. त्याचा मुलगा नऊ वर्षाचा आहे. तोही विलक्षण स्वरूपवान आणि गोऱ्या वर्णाचा आहे . भेटीचे वर्णन राजस्थानी कागदपत्रांतून मिळते ,"रामसिंग व मुखलीसखान शिवाजीला दरबारात घेऊन येत होते, बादशहा दिवाणे खास मध्ये आला, असदखानला आज्ञा केली की ," शिवाजीला घेऊन या व हुजुरात हजर करा ". शिवाजीने नजर म्हणून एक हजार मोहरा आणि दोन हजार रुपये आणि निसार म्हणून पाच हजार रुपये अर्पण केले. शिवाजीचा मुलगा संभाजी याला बादशहासमोर आणले गेले. बादशहाला नजर म्हणून पाचशे मोहरा एक हजार रुपये निसार म्हणून दोन हजार रुपये अर्पण केले . तो दिवस म्हणजे बादशहाचा वाढदिवस होता. शहजादे अमीर उमराव व शिवाजीला पान विडा देण्यात आला, त्याला तहीरखानच्या जागी रायसिंगच्या समोर उभे करण्यात आले. खलतीची वस्त्रे जाफरखान व जसवंतसिंह याना देण्यात आली. शिवाजीला धक्का बसला , शिवाजीला राग डोळ्यात मावेनासा झाला. बादशहा रामसिंगास म्हणाले," शिवाजीला काय होत आहे? ते विचारा, रामसिंग जवळ आल्यावर शिवाजी म्हणाला," मी कसा मनुष्य आहे, ते आपण पाहिले आहे ,तुमच्या वडिलांनी ,बादशहाने पाहिलें, आणि मला मुद्दाम गैरवाजवी रीतीने उभे करण्यात आले ," त्यानंतर शिवाजी पाठ फिरवून निघाला .रामसिंगाने हात पकडला पण तो सोडवून दिवाणखाण्याच्या एका बाजूस येऊन बसला . रामसिंग तेथे गेला व समजूत घालू लागला . शिवाजी म्हणाला ,"माझे मरण आले आहे .एकतर तुम्ही मला मारा. नाहीतर मी स्वतः च आत्महत्या करिन .माझे डोके कापून घ्यायचे असेल तर घेऊन जा. मी हुजुरात येणार नाही ."रामसिंग बादशहा जवळ आला बादशहाने," शिवाजीला शिरोप्याची वस्त्रे द्या .त्याची समजूत घालून घेऊन या ,"अशी आज्ञा केली. त्याच्या जवळ उमराव आले आणि शिरोप्याची वस्त्रे परिधान करण्यास सांगू लागले. शिवाजी म्हणाला," मी शिरोप्याची वस्त्रे घेणार नाही . बादशहाचा चाकर म्हणून राहणार नाही. मला मारावयाचे असल्यास मारा. कैद करावयाचे असल्यास कैद करा . मी शिरोप्याची वस्त्रे घेणार नाही ", त्यानंतर तिघे उमराव बादशहा जवळ आले .त्यावर बादशहाने," रामसिंगास शिवाजीला तंबूत घेऊन जा व त्याची समजूत घाल ,"अशी आज्ञा दिली शिवाजी आणि आणि रामसिंग एकांतात बसले परंतु शिवाजीने ऐकले नाही .ही हकीकत राजस्थान साधनातील होय .
8 जून 1666 राज्यांनी आपल्या नोकरांना परत पाठवले .ते त्यांना म्हणाले," तुम्ही येथून निघून जा. माझ्याबरोबर कोणी राहता कामा नये .मी एकटाच राहीन. त्यांनी मला मारायचे ठरवले आहे ,तर मला मरून जाऊ द्या ," महाराज आग्र्याहून सुटण्या अगोदरच्या राजस्थानी पत्र, 23 ऑगस्टच्या पत्रातील मजकूर असा ,शिवाजी येथून जाण्यापूर्वी चार दिवस चौकी पहारे बरेच कडक करण्यात आले होते .बादशहाने पुन्हा एकदा आज्ञा केली की, "शिवाजीला ठार मारण्यात यावे ,"शिवाजीने आता ओळखले की आपली वाईट वेळ आली आहे .म्हणून तो तेथून निसटला . मराठी बखरीवरून 18 ऑगस्ट 1666 रोजी आग्र्यातून निघाले असे दिसते आहे. परंतु आलमगीरनामा मध्ये ही तारीख खात्री करून व शोध घेऊन यश न आल्याने दुसऱ्या दिवशीही दिली आहे, 19 ऑगस्ट , फोलादखानचे पहारेकरी सैनिकांचे हातही या प्रकरणात गुंतले असावेत. रामसिंगचा यात हात असावा असे औरंगजेब बादशहाला वाटले असावे. पण राजस्थानी पत्रावरून तसे वाटत नाही , शिवाजी महाराजांच्या दानधर्मचा आणि भेटीचा उल्लेख भीमसेन सक्सेना यांनी केला होता .पण शिवाजी महाराज फळांच्या पेटाऱ्यातून बसून निसटले ही कथा कशी पसरली ? पाहऱ्यावरील अधिकारी यांना जाब झाडतीपासून वाचवावे यासाठी ही कथा प्रचलित झाली असावी .3 सप्टेंबर च्या या पत्रातून याला पुष्टी मिळते. "दिवसाच्या चार घटिका झाल्या असता ,शिवाजी पळाला ही बातमी आली. पण चौकी पाहऱ्यावरील एक हजार माणसे असताना असे घडले ?तो नक्की केव्हा निघून गेला? अन कोणत्या चौकी पाहऱ्यातून गेला? हे त्या दिवशी कोणीही सांगू शकले नाही . या नंतर चर्चा झाली. आणि पेटऱ्यांची ये- जा होत होती शिवाजी हा पेटाऱ्यातून पळाला. असा निष्कर्ष काढला." औरंगजेब बादशहाने कसून चौकशी केली व आलमगीर नामा या सरकारी चरित्र यात स्पष्ट म्हणले आहे की" शिवाजी हा वेषांतर करून निघून गेला ". शिवाजी महाराजांचा समकालीन "कवी भूषण" याने आपल्या हिंदी काव्यातून शिवाजी महाराज वेषांतर करून आग्रा येथून निघाले असे असे म्हणले आहे,संस्कृत रचना करणारा "कवी जयराम पांडे "यानेही असेच विधान सूचित केले आहे. महाराज पेटाऱ्यातून निसटल्याची कथा बेपर्वा अधिकाऱ्याची खरडपट्टी होऊ नये व त्यांना शिक्षा होऊनये यासाठी घडवण्यात आली असे वाटते, 20 नोव्हेंबर1666 मध्ये राजे राजगडला पोहोचले. औरंगजेब बादशहाला याची खुप खंत आयुष्यभर वाटत राहिली , पन्नास वर्षे झाली अहमदनगर मध्ये आपल्या मृत्यूचे क्षण मोजत होता, त्याक्षणीही त्याला शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून गेले याची आठवण येत होती ,त्याने आपल्या मृत्युपत्रात म्हटले आहे की ," आपण क्षणभर गाफीलपणा केला त्यामुळे शिवाजीला सुटून जाता आले त्याचा परिणाम म्हणून कायमची डोकेदुखी आपल्यामागे लागली आहे , महाराज पुन्हा पकडले गेले असते तर?इतिहासकार साकी मुस्तईदखान औरंजेबाजवळ नेतोजी पालकरचे धर्मांतर करताना जवळ होता ,तो संभाजी राज्यांच्या मृत्यूच्या वेळीही जवळ होता तो म्हणतो,"यापूर्वी त्याने(संभाजीने )बादशहा च्या कृपेच्या महत्वाकडे दुर्लक्ष केले प्रथम तो आपल्या वडिलांच्या बरोबर बादशहाच्या दरबारातून पळून गेला दुसऱ्या खेपेस तो दिलेरखानाच्या पासून पळून गेला त्यामुळे त्याच रात्री त्याचे डोळे काढण्यात आले"

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...