विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 7 July 2020

जंजिरा स्वराज्यात आणण्याचा मनसुबा राखणारे वीर मराठा सरदार

जंजिरा स्वराज्यात आणण्याचा मनसुबा राखणारे वीर मराठा सरदार

१६८१ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी २०,००० सैन्य घेऊन जंजिराच्या मोहिमेवर निघाले, पण जंजिरा देखील एक अजिंक्य किल्ला होता. छत्रपती संभाजी महाराजांना हे समजले होते की जंजिराला थेट युद्ध करून जिंकून घेणे फार अवघड आहे.

काही करून छत्रपती संभाजी राजे यांना जिंजीरा स्वराज्यात घ्यायचा होता. जंजिऱ्याच्या मोहिमेसाठी शंभुराजेंनी कोंडाजी फर्जंद यांना बोलावले, संभाजी महाराजांनी कोंडाजींना सांगितले की “कोणत्याही परिस्थितीत जंजिरा हिंदवी हा स्वराज्याचा एक भाग असावा. यासनंदर्भात कोंडाजी फर्जंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात बैठक झाली आणि जंजिऱ्याची मोहीम आखली.

योजना निश्चित झाली पण स्वराज्यात आणि स्वराज्याबाहेर आवई अशी उठवली की छत्रपती संभाजी महाराज आणि कोंडाजी फर्जंद यांच्यात कमालीचे वाद झाल्याने कोंडाजी फर्जंद आणि शंभूराजे यांचे संबंध कमालीचे बिघडले.

त्यामुळे नाराज झालेल्या कोंडाजी फर्जंद यांनी स्वराज्यातून निघून बंडाची भूमिका घेतली. ही बातमी सिद्दी ला समजल्यावर त्याची ईच्छा झाली की कोंडाजी जर आपल्या गोट्यात आले तर आपली ताकद कैक पटीने वाढेल. कोंडाजी फर्जंद आपल्या सोबतीला ४० ते ५० मावळे घेवून थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर आले, आणि त्यांनी सिद्धी ला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली.

सिद्धी ला प्रथम आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला कारण शंभू राजांचा एक महत्वाचा आणि शूर मावळा त्यांच्या साथीदारांना घेऊन येवून मिळाला होता. सिद्धी ने त्याला आपली चाकरी दिली आणि कोंडाजी सिद्धी ची सेवा करू लागले आणि आपल्या मोहिमेत ठरल्या नुसार काम करत होते. हे करत असताना कोंडाजी बाबा सिद्द्या चा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत होते. सिद्दीच्या सेवेत, कोंडाजी बाबा आता नित्यनेमाने पालन करणारे बनले होते.

कोंडाजी यांनी किल्ल्याची पूर्ण पहाणी केली. त्यांनी दारुचं कोठार देखील शोधून काढले. कोणत्याही किल्ल्याची मुख्य ताकद असते दारू कोठार ते च आगीने फोडून टाकले तर गड सर होण्यासाठी जास्त त्रास होत नाही. कोंडाजी यांनी दिवस हेरून रात्रीत जंजिराचे सर्व दारूगोळ्यांचे कोठार नष्ट करण्याचे आणि शंभू-महाराजांच्या चरणी अर्पण करण्याचे ठरवले गेले. ही योजना आणि योजनेच्या दिवसाची माहिती छत्रपती संभाजी महाराजांच्या पर्यंत पोहोचवली. 

सर्व काही अचूक, पद्धतशीर, आणि योजने प्रमाणे घडत होते. त्या रात्री कोंडाजी वात पेटवून जंजिऱ्याच्या दारूगोळा नष्ट होणार होता. कोणालाही या बातमीची माहिती नव्हती, सुरीचे सूर लावण्यात आले होते.

आता काही क्षणातच जंजिरा महान मराठा साम्राज्यासमोर पराभूत होणार होता. हा मराठा साम्राज्याचा अविभाज्य भाग होणार होता. सिध्दीच्या संसाधनांचा नाश काही अंतरावर होता. कोंडाजी आपल्या सोबत्यांसह बोटींमध्ये बसणार होते. कोंडाजी जंजिऱ्यात असताना एक बाटगी म्हणजे दासी विकत घेतली होती. त्या बाटगी सोबत घेऊन आपल्या साथीदारांसह जंजिरा सोडण्याच्या तयारीत असतात.

परंतु त्या बाटगी तिच्या सोबत अजून एका दासीला घेण्याचा हट्ट करते, दासीला कोंडाजी फर्जंद यांचा डाव समजतो. आणि ती दासी कपडे आणि तीच सामान घेण्यासाठी पुन्हा किल्ल्यावर जाते आणि जंजिरेकर सिद्दीला ही हकीकत सांगते.

इतिहासानुसार, शेवटच्या क्षणी सिद्धिला ही बातमी मिळते. सिद्दी मोठी फौज घेऊन कोंडाजी फर्जंद आणि त्यांच्या साथीदारांसह पकडले जातात. जंजिरावर शेवटच्या टप्प्यात झालेल्या युद्धात रक्ताची होळी खेळत असताना कोंडाजी फर्जंद यांना वीर मरण प्राप्त होते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...