#सरसेनापती_संताजीराव_घोरपडे_यांचे_पुत्र_राणोजी_घोरपडे 🙏🚩
राणोजींच्या नेत्रदीपक यशाकडे इतिहासकारांचे जावे तसे लक्ष गेले नाही ,
,
सन . १७०१ व १७०२ ही वर्षे यांनी गाजवुन मलकापूर येथे बादशहाच्या
सैन्याच्या पिछाडीवर त्यांचा धाडसी हल्ला आणि सातारच्या किल्याला त्यांनी
दिलेला शह या त्यांच्या दोन मोठ्या कामगिरी
#वीर_राणोजी_घोरपडे यांच्या हालचाली व पराक्रम ,🚩
इ,स. २० एप्रिल १७०१
#_वीर_राणोजी_घोरपडे 🚩⚔️
*पन्हाळा वेढा चालू राणोजी घोरपडे वीस हजार सैन्यासहित चिकोडी ऐनापुराकडुन
पन्हाळ्याच्या दिशेने शहजादा बेदारबख्त सोळा हजार स्वरासहीत राणोजींच्या
विरुद्ध रवाना,*
,
३० एप्रिल १७०१
*राणोजी घोरपडे यांच्या विरुद्ध बेदारबख्तची रवानगी बरोबर बावीस हजार स्वार ,
,
२५ नोव्हेंबर १७०१
*संताजींचा मुलगा राणोजी घोरपडे आंब्याचे ठाणे उध्वस्त करून. मिरजेकडे जातात ,,,
,
६ डिसेंबर १७०१
*राणोजी घोरपडे यांचा हल्ला मलकापूर येथे मोगल सैन्यांच्या पिछाडीवर राणोजींचा जबरदस्त हल्ला,,
,
२३ डिसेंबर १७०१ बातमी
*राणोजी घोरपडे हे कराड भागात धामधूम करीत आहे, धान्याची रसद त्यांनी घेतली आहे मुहमद अमीनखान याची त्यांच्या विरुद्ध रवानगी,
,
२४ डिसेंबर १७०१
*राणोजी घोरपडे हे औरंगजेबाच्या छावनी पासुन चार कोसावर मलकापुरच्या दिशेने चालून आले,
मलकापुरचा ठाणेदार जमशीदखान विजापुरी याच्यावर हल्ला प्रखर युद्ध
जमशीदखानाच्या कुमकेला सवाई जयसिंग अवधूतसिंग (उदितसिंग ) मुहंमद अमीनखान,
,
२६ डिसेंबर १७०१
*काल रात्रीची बातमी राणोजी घोरपडे यांनी बादशहाच्या छावणी पासुन एक कोसावर वंजारांचे बैल लुटून नेले,
,
२९ डिसेंबर १७०१
*मुहमद अमीनखान व राणोजी घोरपडे यांचे कासेगांव जवळ युद्ध ,(कासेगांव पंढरपूर पासून चार मैलावर ),,*
,
३१ डिसेंबर १७०१
कराडचा ठाणेदार यासीनखान याजकडुन राणोजी यांनी दहा हजार सैन्यासहित चाल
करून ,येऊन बादशहापूर जाळून फस्त केले, यानंतर त्यांने दोन किल्यामधील
गढीला वेढा घातला, तेथील किल्लेदार (सातारचा) समसाल हा तोफांचा मारा करीत
आहे, मुहंमद अमीनखानाची रवानगी १७०१ च्या शेवटच्या दोन चार महीन्यात राणोजी
घोरपड्यांच्या पराक्रमाने मोगल हादरून गेले,
१ जानेवारी १७०२
*सातारचा फौजदार यासीनखान व राणोजी घोरपडे यांचे सातारा जवळ युद्ध व राणोजी वाईकडे,,
,
७ जानेवारी १७०२
*राणोजी विरुद्ध अमीनखान याची रवानगी त्याच्या बरोबर पाच हजार एकशे चौर्याण्णव स्वार देण्यात आले
,
२६ जानेवारी १७०२
*राणोजी घोरपडे पराडा (बार्शी जवळ)भागात फिरोजजंगाचा सरदार नाहरखान याच्याशी युद्ध ,
,
१५ फेब्रुवारी १७०२
*मोगल सेनापती फतेहुल्लाखान जबर जखमी राणोजी घोरपडे विजापूर प्रांतात
मुजाहिदखान बरोबर युद्ध विशाळगड किल्यासमोर मराठ्यांचा ख्वाजाखानाच्या
मोर्चावर हल्ला निकराची लढाई संगमनेर प्रांतात नेमाजी शिंदे संगमनेरचा
ठाणेदार मुबारिजखान यांच्या बरोबर युद्ध, राणोजी घोरपडे घारुर(मराठवाडा)
प्रांतात रूहुल्लापूर लुटून फस्त, केले औरंगखान याची मनसब कमी करावी आशी
आज्ञा,
२१ मार्च १७०२
राणोजी घोरपडे यांचा म्रुत्यु
संताजींचा
मुलगा राणोजी घोरपडे यांनी वाकिणखेडा तालुक्यातील (बेडरांचा प्रदेश भीमा
काठ सुरपूर तालुका गुलबर्गा जिल्हा कर्नाटक ) चंदनगढीला वेढा, घातला होता
ते स्वार घेऊन निघाले बेडरांशी त्यांचे युद्ध झाले, त्यात राणोजी घोरपडे
यांना बंदुकीची गोळी लागली , ते विर मरण पावले.
【 वीर राणोजी घोरपडे
यांच्या म्रुत्यु ने मराठ्यांची जबर हानी झाली. राणोजींने वडीलांचे
सरसेनापती संताजीराव घोरपडे यांचे नाव राखले.】 🙏🚩
औरंगजेबाची धोरणे ,
१७०१ व १७०२ या दोन वर्षातील पत्रव्यावहारातून अदूर दुष्टीच्या धोरणात फरक
पडल्याचे जाणवत नाही. मराठ्यांचे किल्ले घेतले की ही मोहीम संपेल ही
त्याची खुळी समजूत. पण मराठे एकीकडे बादशाही छावणीवर हल्ले करून वेढ्यात
अडथळे आणीत तर दुसरीकडे दक्षिणेत निर्वेध संचार करीत त्याच्या युध्दतंत्रा
समोर मोगल हेकीस आले कर्नाटकातील बेडर जातीशी युती ( धनाजी जाधव, राणोजी
घोरपडे, बहिर्जी हिंदुराव घोरपडे व वाकिण खेड्याचा ( गुलबर्गा जिल्हा,*
*कर्नाटक )पिडनाईक हा बेडर सरदार ही बादशहाला अस्वस्थ करणारी घटना होती ,
,
संदर्भ ● मोगल दरबाराची बातमी पत्र खंड २
आनुवादक संपादक - (सेतुमाधवराव पगडी)
PicArt - Anup Pawar
#घोरपडे_घराण्याचा_इतिहास
#सरसेनापती_संताजीराव_घोरपडे_प्रतिष्ठान
🙏🚩
लव नामदेव घोरपडे ✍️
No comments:
Post a Comment