विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 July 2020

भारतीय कीर्तीचे इतिहासकार "कै. जदुनाथ सरकार" यांनी अहिल्यादेवी यांचा केलेला गौरव.

भारतीय कीर्तीचे इतिहासकार "कै. जदुनाथ सरकार" यांनी अहिल्यादेवी यांचा केलेला गौरव.

POSTSAAMBHAR :Avdhut Lalge


महेश्वर दरबारची बातमी पत्रे वाचून रियासतकार सरदेसाई यांना पाठवलेल्या पत्रातीत हा उतारा आहे :

"अहिल्याबाई बद्दल माझा आदर अमर्याद वाढला. इतके दिवस आपण तिला देवी म्हणत होतो राज्यपदारुढ असता, मालकीची धनदौलत असता, साधेपणाने राहणारी धार्मिक प्रवृत्तीची "माताजी" म्हणून आपण तिला मान देत होतो. तिने देवळे बांधली, घाट बांधले, पुष्कळ पैसा दानधर्मात खर्च केला. जमिनी आणि गावे इनाम दिली. परंतु आता मला तिचे वेगळे स्वरूप दिसून आले. अस्सल कागदपत्रानिशी आता तिला सिद्ध करता येते की, ती अव्वल दर्जाची मुसद्दी होती. म्हणूनच तिने इतक्या धोरणीपणाने महादजीचा पाठपुरावा केला. तिच्या सहकार्याशिवाय तिच्या आश्रयाशिवाय ही म्हणायला हरकत नाही - महादजीला उत्तरेकडील राजकारणाचे श्रेष्ठत्व मुळीच लाभले नसते.
"जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई"
श्री. रा. टिकेकर, पृष्ठ ९९-१००.
राज्य कारभारातील अडचणी अहिल्याबाईंनी बाणेदारपणे व मुसद्दीपणे कशा दूर केल्या हे त्या काळच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होतात.
अहिल्याबाईंनच्या घरातील नातलग आणि होळकर सेनेचे सेनापती तुकोजीराव होळकर. पुष्कळदा हेच तुकोजी त्यांना डोईजड होत होते. तुकोजीस पतीलबाबा (महादजी शिंदे) बदसल्ला देतात असे ऐकल्यावर अहिल्याबाई म्हणतात,
"तुमचे मानस असेल की बाईस चाहुकडून उपद्रव होऊन बंदोबस्त आपण केल्यावर बाईंना त्यांना काय कारायवाचे आहे. परंतु तुम्हासही कळले असु द्या. मी सुभेदाराची सुन आहे. तुकोजीबाबा हे माझे हातचे कामास लाविलेली आहे. आजकाल पटीलबाबांचा दम तुकोजीबाबा फार राखितात आणि पाटीलबाबांच्या चितात फार फंद असेल तर उभयताही फौजेस मजवर चालून यावे. सुभेदारांचे पुण्याप्रतापी येथे कोणी बांगड्या लेवून बसले नाही. श्री मार्तंड समर्थ आहे. जे ईश्वर घडविला ते खरे.
"ज्या मनगटात बळ बुद्धि चातुर्य आहे, तोच स्वकर्तृत्वार लोकाभिमुख राजा बनू शकतो"
- अहिल्याबाई होळकर
संदर्भ :- होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास
लेखक :- डॉ. गणेश मातकर
Image may contain: 10 people, indoor

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...