!! ती एक अहिल्या होती !!
POSTSAAMBHAR :Avdhut Lalge
श्री रमेश नाईक लिखित नाटकातील नाटकाचा शेवट होतो तेव्हा मतोश्रींवर रचलेल काव्य :-
अटकेवरती झेंडे रोविले मर्द मराठी छाती
दिल्लीचेही तख्त फोडले दुष्मणास ती भीती
माळव्याच्या मातीवरती कर्तृत्वाची ज्योती
काळावर अन अक्षय मुद्रा, तेजोमय आकृती
ती एक अहिल्या होती, ती एक अहिल्या होती
दिल्लीचेही तख्त फोडले दुष्मणास ती भीती
माळव्याच्या मातीवरती कर्तृत्वाची ज्योती
काळावर अन अक्षय मुद्रा, तेजोमय आकृती
ती एक अहिल्या होती, ती एक अहिल्या होती
इतिहासाचे पान सांगते मराठमोळी कथा
सह्याद्रीच्या कडेकपारी पानिपताची व्यथा
तिमिरामधुनी एक उजळली लोकहिताची नीती
देवत्वाची राजस मूर्ती, देवपणाची शक्ती
ती एक अहिल्या होती, ती एक अहिल्या होती
सह्याद्रीच्या कडेकपारी पानिपताची व्यथा
तिमिरामधुनी एक उजळली लोकहिताची नीती
देवत्वाची राजस मूर्ती, देवपणाची शक्ती
ती एक अहिल्या होती, ती एक अहिल्या होती
राज्यावरती होता आक्रमण, असो आप्त अन्य शत्रूही
शर्तीनेही हे राज्य राखिले, पराक्रमाची द्वाही
दानाचीही अखंड सरिता, सात्विकतेची मिती
मनामनातील रंग संगती जीची अखंड कीर्ती
ती एक अहिल्या होती, ती एक अहिल्या होती
शर्तीनेही हे राज्य राखिले, पराक्रमाची द्वाही
दानाचीही अखंड सरिता, सात्विकतेची मिती
मनामनातील रंग संगती जीची अखंड कीर्ती
ती एक अहिल्या होती, ती एक अहिल्या होती
माहेश्वरच्या मातीमध्ये शिवरायांचा असा वारसा
राजयोग हा कसा असावा रयतेपुढे स्वच्छ आरासा
लोकहितासत्व राज्य समर्पण, योगीपणाची कृती
कर्तव्याची अक्षय पूर्ती, जपली अनंत नाती
ती एक अहिल्या होती, ती एक अहिल्या होती
राजयोग हा कसा असावा रयतेपुढे स्वच्छ आरासा
लोकहितासत्व राज्य समर्पण, योगीपणाची कृती
कर्तव्याची अक्षय पूर्ती, जपली अनंत नाती
ती एक अहिल्या होती, ती एक अहिल्या होती
अहिल्याबाईंचे आयुष्य म्हणजे एका कर्मयोगिनी, समर्पित राज्यकर्त्या व्यक्तीमत्वाची प्रेरणादायी कर्तव्यगाथा आहे. वैयक्तिक आयुष्यात त्यांना आप्तजनांच्या मृत्यूचे अनेक आघात वारंवार सोसावे लागले, पण आपल्या खासगी आयुष्यातील दुःखाची छाया त्यांनी आपल्या राज्यकारभारावर वा लोकहिताच्या सार्वजनिक कामावर पडू दिली नाही.
प्रजेला पुत्रवत मानणारी ही प्रजावसल्या राणी. तीस वर्षे त्यांनी लोककल्याणकारी राज्यकारभार करून लोकांना सुख, शांती, समाधान दिले. सत्यनिष्ठा, सात्विकता, न्याय, पारदर्शीपणा, त्याग ही त्यांच्या विचारांची सूत्रे होती. ग्वालिअर चे महादजी, राजस्थानचे चंद्रावत, राघोबादादा, तुकोजीराव असोत व खुद्द पेशवे, त्यांनी आपल्या तत्वनिष्ठ कारभाराचा बाणा कधी सोडला नाही.
अडीचशे वर्षांपूर्वी स्त्रियांना कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य नसलेल्या काळात अहिल्याबाईंचे राज्यकर्ते पण उठून दिसते. त्यांचा कणखरपणा, दूरदृष्टी, विरक्तवृत्ती, औदार्य या सर्वांचे प्रभावी पण त्यांच्या चरित्रातून दिसते.
अहिल्याबाई या नावातच आदर्शत्वाचा आणि मानवतेचा संदेश आहे. आजच्या अस्वस्थतेच्या आणि दहशतीच्या काळात अहिल्याबाईंची नीती अंमलात आणली तर अनेक समस्यांचे निराकरण होईल, असे वाटते.
अहिल्याबाई या नावातच आदर्शत्वाचा आणि मानवतेचा संदेश आहे. आजच्या अस्वस्थतेच्या आणि दहशतीच्या काळात अहिल्याबाईंची नीती अंमलात आणली तर अनेक समस्यांचे निराकरण होईल, असे वाटते.
फोटो :- दिल्ली येथील लोकसभेत इंदोरच्या खासदार सुमित्राताई महाजन लिखित "मातोश्री" या नाटकाचा प्रयोग झाला तेव्हा देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या नाटकाचे पुस्तक प्रकाशित केले.
No comments:
Post a Comment