विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2020

## सातारा ##






## सातारा ##

postsaambhar:डॉ उदयकुमार जगताप

बंदोबस्तासाठी मराठ्यांची राजधानी सातारा किल्ल्यावर स्थायिक झाली.

ती पुढे गैरसोयीची वाटू लागल्याने किल्ल्याच्या उत्तरेकडील बाजूस एक लहानसे शहर वसवले
व त्यास "शाहूनगर "नाव दिले.
त्यास हल्ली "सातारा" म्हणतात.

सर्व कारखाने किल्ल्यावर बांधले.
व वरच्या बाजूस वाडा बांधला .
"शाहू तलाव" म्हणून एक तलाव खालचे बाजूस बांधला. काही दिवसांनी पाणी पुरेनासे झाले म्हणुन "येवतेश्वराहून" नहर बांधून आणले
शाहू नगरची स्थापना सन 1721 मध्ये झाली .
शाहू महाराजांनी एक गेंडा पाळला होता .
तो ज्या माळावर बांधीत त्यास "गेंडामाळ" म्हणतात.
माहुलीजवळ एक पाणपोई बांधली त्यास "पोईचा माळ" म्हणतात.

शाहूची गादी पूर्वी सातारा किल्ल्यावर होती .
तीस शाहूनगरात माचीवर रंगमहालाचा वाडा बांधला तेथे आणली.
तख्ताचे मागील बाजूस चौकात विहीर होती
तीस "तख्ताची विहीर" म्हणतात..

रंगमहालाच्या बखळीत पूर्वी मोठा वाडा होता.
त्यात ते सिंहासन होते.
छत्रपतींच्या या गादीला तख्त, सिहासंन ,मंचक अशी नावे इतिहासात आढळतात .
त्या वाड्यास पुढे "सेनापतीचा वाडा "असे म्हणत.

तो इंग्रज सरकारने 1865 मध्ये विकला.
प्रतापसिंह महाराजांनी पुढे भवानी पेठेत वाडा बांधला .
हा वाडा "बाळासाहेब सेनापती "याना विकला म्हणून त्यास "सेनापतीचा वाडा "म्हणू लागले.
रंगमहालाचा वाडा 1874 मध्ये जळाला .
त्याचे काही अवशेष राहिले नाहीत.

"अदालत "म्हणून ज्या वस्तूला म्हणतात ती शाहू राज्यांनी बांधली .
त्यात पेशवे उतरत.
त्याच्या जवळ सरदार पुरंदरे यांचा वाडा आहे.
20 मार्च 1753 मध्ये मोठी आग लागली त्यात मोठे मोठे वाडे जळाले.
त्यात पेशवे,पुरंदरे,गोविंद चिटणीस नारोरं मंत्री दत्ताजी वाकनिस यांचे वाडे जळाले.

शहरातील पेठांची नावे सात वारांवरून ठेवली आहेत.

"रामाऊचा गोठ ,यादवगोपळ, पेठ व्यंकटपूरा, चिमणपूरा, दुर्गापुरा, केशरकर पेठ, राजसपुरा ,पंतांचा गोठ, रघुनाथपुरा ,
इत्यादी नावे ऐतिहासिक पुरुषांवरून पडली आहेत.. अदालत वाड्या पलीकडे खतीमबाचे घर व मशीद आहे.
माचीवर डफळ्यांची पागा "अक्कलकोटकर" यांचा वाडा
मंत्र्याचा वाडा,
पिंगळ्यांचे घर
शेखमीऱ्याच्या पागा या शाहूंच्या वेळच्या काही स्थळांचे अवशेष अजून शिल्लक आहेत .
"शेखमिरे "हे आदिलशाहीत वाई प्रांताचे सुभेदर होते ..
शाहू आले त्यावेळेस त्यांनी प्रतिनिधिस कैद करून शाहूंच्या स्वाधीन केले म्हणून शाहूची त्यांच्यावर मर्जी बसली.
येवतेश्वराहून ,महादऱ्याहून उत्तम पाणी आणून साताऱ्यास उत्तम पाण्याची व्यवस्था केली हे त्यावेळेस खरोखरीच आश्चर्यकारक होते.
मंगळवारात "रामाऊचा गोठ" म्हणून स्वतंत्र पेठ होती..
तेथे नागपूरकर भोसले यांच्या वाडा होता.

भोसल्यांच्या घरात "रामाऊ" नावाची स्त्री होती तिच्या नावावरून हे नाव पडले.
" व्यंकटपुरा "नाव हे इचलकरंजीकर घोरपडे यांचे वंशज व्यंकटराव घोरपडे यांच्यावरून हे नाव पडले.

बाजीराव पेशवे याचा मामा कृष्णराव चासकर याने साताऱ्यास येवतेश्वर पायथ्याशी एक देवालय बांधले त्यास" सदाशिवपुरा" म्हणू लागले.
व्यंकटराव घोरपडे आल्यानंतर त्यास व्यंकटपुरा नाव पडले.

"चिमणाजी दामोदर"
नावाचा शाहूंचा एक सरदार होता.
त्याची साताऱ्यास पागा होती.
त्यावरून "चिमणपूरा" नाव पडले .
राणी सगुणाबाई यांचे मुलीचे नाव "राजसबाई" तिच्या नावावरून "राजसपुरा".
हे नाव पडले
" यादव गोपाळ खटावकर "हे ताराराणी यांचे कारभारी छत्रपतींच्या दरबारी होते.. त्यांचे नावे पेठ वसवली. शाहूंनी याना खालशाचे उत्पन्न तोडून दिले
म्हणून या घराण्यास "खालशे "हे आडनाव पडले .
"रघुनाथपुरा "हे नाव बाजीराव पेशवे यांच्या मुलावरून पडले आहे.
सोमवार पेठेत "अंनगळाचा" वाडा होता.
त्यांचे नाव "परशुराम नारायण अनगळ "
मोठे सावकार होते .
माहुली येथील" रामेश्वराचे" देऊळ व एक घाट त्यांनी बांधला .

शनिवारात" बाळजीपंत नातू" यांचे दोन वाडे आहेत .
त्यातील जुना वाडा" प्रतापसिह महाराजांनी" बक्षीस दिला होता .
नांतूच्या वाड्या समोर" सुमंत" यांचा वाडाआहे .
सुमंत यांचे वंशज कराड जवळील" रिसवड "येथे राहतात .
"शिर्के "यांचा वाडा .शिर्के घराण्याशी छत्रपतींच्या घराण्याशी संबंध असल्याने त्यांचा वाडा साताऱ्यात होता
"पंडितराव " व" शिर्के" यांचे वाडे गुरवारात आहेत.

"तानशेठ भुरके"
हे शाहू राज्यांच्या वेळेस टांक साळी वर अधिकारी होते.
त्यांना हा अधिकार शाहूंनी 1740 मध्ये दिला .
त्यांचे पूर्वज हे संगमनेर येथे आदिलशहाकडे टंकसाळी वर होते .
त्यांचे पूर्वज सातारा येथे राहतात.
शाहूंच्या वाड्या समोर पूर्वी बाजार भरत असे.
त्यास "हुजूर बाजार" म्हणत.

राष्ट्रात हजारो नवीन कर्तबगार माणसे निर्माण केली हे शाहूंचे कृत्य न सांगताही चिरस्मरणीय झाले
आहे.

हजारो कुटुंबे सर्व जातींची , धर्माची व वर्गाची शाहूंच्या प्रोत्साहाने पुढे आली यात शंका नाही.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...