postsaambhar :डॉ. उदयकुमार जगताप
माधवराव पेशवे यांचा जन्म 16 फेब्रुवारी1745 मध्ये सावनूर (कर्नाटक)येथे झाला.
माधवराव पेशवे यांना
20 जुलै 1761 मध्ये पेशवाईची वस्त्रे मिळाली .
माधवराव पेशवे यांनी स्वतः कर्नाटकात चार स्वाऱ्या केल्या.
मागील तीन पिढ्यांचा चुका सुधारून राज्याचा गाडा पूर्वपदावर आणला .
उंच, थोराड, बळकट शरीरयष्टी ,डोळे पाणीदार व चेहरा उग्र होता.
गौर वर्णीय असा हा पेशवा होता .
परंतु क्षय रोगामुळे त्यास कधीच मासलता आली.
नाही .
या पेशव्याने मृत्यूला न घाबरता कृतकृत्यतेच्या आनंदाने "आम्ही महायात्रेस जातो. स्वारीची तयारी करा." म्हणून सांगितले .
"प्राण जातेसमई अन्न घालू नका .दूध किंवा गंगोदक घाला ."असे म्हणाले. "गजानन, गजानन" म्हणत वयाची अठ्ठावीस वर्ष पूर्ण होण्याआधीच 18 नोव्हेंबर 1772 मध्ये परलोकवास केला.
थेऊरास प्राण गेला.
रामबाईने हसतमुखाने सहगमन केले.
माधवराव यांचे रमाबाई यांचे 9 डिसेंम्बर 1753 मध्ये माधवरावांच्या वयाच्या आठव्या वर्षी लग्न झाले.
ती शिवाजी बल्लाळ जोशी यांची .
कन्या लग्नप्रसंगी पाच वर्षांची असावी .
कित्येक प्रसंगी ती स्वारीत बरोबर असे.
त्यास मूल झाले नाही. नवऱ्याची कडक शिस्त पाळून लौकिक मिळवला .
पानिपतावर मराठी राज्यास उतरती कळा लागली हा गैरसमज दूर करण्यात माधवराव यशस्वी झाला .1764 मध्ये त्याने कर्नाटकात हैदरवर स्वारी केली.
सन 1764 मध्ये गोपाळराव पटवर्धन याना घेऊन पुन्हा स्वारी केली व तह घडवून आणला.
17 67 मध्ये पुन्हा स्वारी केली पण त्यात निकाल लागला नाही.
म्हणून चौथ्यांदा 1769 मध्ये तो पुन्हा हैदरवर चालून गेला.
पण प्रकृतीने दगा दिला व मिरजेतून तो माघारी फिरला .
पेशवे ,निजाम व नागपूरकर भोसले यांच्या पदरी तीन व्यक्ती प्रसिद्ध पावल्या त्या पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी होत .
पेशवांच्या दरबारी सखाराम बापू बोकील ,निजामाचा विठ्ठल सुंदर परशुरामी, भोसल्यांच्या दिवाकरपंत चोरघडे .
माधवरावाने या शहाण्यांच्या खटपटी हणून पाडताना नानां फडणवीसचा उपयोग केला .
एकास स्वर्ग दाखवला दुसऱ्यास कैदेत घातले व तिसऱ्यास निर्माल्य बनवले .
सत्य, निःपक्षपाती, हुकमाची बजावणी, वचन पाळणे
या गुणांनी माधवरावाने राज्यकारभारास उच्च व निर्मल स्वरूप आणले.
माधवरावाच्या आकरा वर्षाच्या कारकिर्दीत सात मोठ्या पाच लहान स्वार्यांचा समावेश आहे .
कौटुंबिक, बाह्य उपाधी, स्वाऱ्यांचे व प्रवासाचे श्रम राज्यकारभाराची विवंचना यात त्याचे तारुण्य खर्च झाले .
माधवराव मितभाषी होता.
उत्तम ,बरे, ठीक, जरूर नाही, अशा भाषेने अथवा संकेताने तो कामाचा निकाल लावी.
उगाच वादविवाद हुज्जत घालीत नसे .
कामास येणारी माणसेही मोजकेच बोलत .
बुद्धी तेजस्वी व प्रखर होती.
परावलंबनाची त्यास चीड असे.
माधवराव यांची कारकीर्द म्हणजे माणसे तयार करण्याची शाळाच बनली.
अनेक तरुण व सेवानिष्ठ माणसे त्याने तयार केली.
त्याची राहणी साधी,
श्रमशील होती.
त्यास चैन अराम बिलकुल खपत नसे.
आपण या मराठी राज्याचे सेवक आहोत ही ऐकनिष्ठ भावना त्याच्यात होती.
त्याला मृत्यूचे भय कधी वाटले नाही.
" ईश्वर करील तसे होईल" हे माधवरावास कधी पटले नाहीं .
"मनुष्य प्रयत्न बलवत्तर आपण करू तसे होईल ."हे त्याने त्याच्या स्वतः च्या उदाहरणाने पटवून दिले.
निजामाने पुणे जाळाले त्याने पुन्हा पेठा वसवल्या.
माधवराव पेशव्यास राग अनावर होई .
रागाच्या भरात तो खाडकन एखाद्याच्या तोंडात मारी.
छड्या मारी.
नारोआप्पा तुळशीबागवले हे खरे पुण्याचे शिल्पकार त्यांनी पुण्याची रचना केली,
त्यांच्यासारखी अनेक लोक गोपाळ पटवर्धन,
नाना पुरंदरे ,शहाजी भापकर, खंडेराव दरेकर, महिपतराव कवडे, जानोजी धुळप ,मुरारराव घोरपडे अशी अनेक माणसे त्यांनी गोळा केली.
शिवाजी महाराज ,बाजीराव व माधवराव पेशवे ही कर्तबगार माणसे दहावीस वर्ष जास्त जगती तर हा इतिहास खात्रीने बदलला असता . ग्रँड डफ म्हणतो
"पानिपतच्या संहाराने मराठी राज्याचे नुकसान झाले नाही इतके माधवराव पेशवे यांच्या अकाली मृत्यूने झाले ".
No comments:
Post a Comment