विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2020

## पवार सुपेकर ##





## पवार सुपेकर ##

postsaambhar :डॉ. उदयकुमार जगताप

बाबूजी पवार व केरोजी पवार हे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदरी सरदार होते.
पुढे राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या पदरीही त्यांनी स्वराज्याची सेवा केली आहे.
दामाजी व तिमाजी यांच्या बंडाचा बिमोड करण्यात या सरदारांचा सातारचे छत्रपती याना खूपच मदत झालेली दिसून येते .
त्यांची फौज वाढवून बारा हजार केल्यामुळे त्यांना
" सेना बारा हजारी 'किताब देण्यात आला .
दोघा बंधूनी गंगथडी व खानदेश प्रांतात तापी नदी पर्यंत स्वराज्याचा अंमल वाढवला .
बाबूजी पवार यांना दोन पुत्र
पहिला काळोजी
यास १)कृष्णाजी (विश्वासराव) सुपेकर
२)तुकोजी पवार गणेगावकर
३)जिवाजी पवार हिंगणीकर
४)मानाजी पवार सुपेकर

पैकी तुकोजी व जिवाजी 1725 मध्ये बाजीराव पेशवे यांच्या बरोबर माळवा प्रांतात लढले .

दुसरा पुत्र संभाजी
यास
१)उदाजी पवार मलठणकर
२)आनंदराव पवार कवठेकर
३)जगदेवराव चितेगावकर

अशाप्रकारे वंश विस्तार झाला.
मानाजी पवार यांनी पानिपतात तलवार चालवून मर्दुमकी गाजवली .
दिल्ली जवळ पटपरगंज येथे देह ठेवला .
यांच्या नंतर यादवराव पवार हे सरदार झाले.
हे महादजी शिंदे यांच्याबरोबर राहून हिंदुस्तानात ज्या लढाया झाल्या
त्यात या चार पवार बंधूंचे कर्तृत्व आख्या हिंदुस्थानने पाहिले.
पैकी यादवराव तापीनदी काठी मृत्यू पावले.
सुपेकर पवार यांचेकडे छत्रपती शाहू महाराजांनी बाबूजी यांचे वडील घर कृष्णाजी याना विश्वासराव हे सरकारातील मानाचे पद दिले .
त्यांचा व मानाजी पवार यांचा वंश सुपे, तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे आजही पहावयास मिळतो.
यत्यांचेकडे खालील गावांचा सरंजाम होता.

हवेली परगणे संगमनेर
देवपूर परगणे संगमनेर
बेलापूर परगणे संगमनेर
राजूर परगणे अकोले
परगणे नाशिक
परगणे कुंभारी
परगणे बारागाव नांदूर
परगणे शेवगाव
परगणे सातारा हरसूल
परगणे कोतुळ
परगणे धुळे
परगणे चाळीसगाव
परगणे झडगे
वाघलीबार
फुटगाव मोकसे

या कुळीचे लोक जगदंबेचे उपासक,
शककर्ते युधिष्ठिर ,
राजा विक्रमादित्य,
राजा भोज
व ज्याने जगदंबेस स्वतःचे शीर कापून देवीस अर्पण केले ते क्षत्रिय, धारचे जगदेवराव पवार यांचे वंशज होत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...