विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2020

# पुणे ##








# पुणे ##
postsaambhar :डॉ. उदयकुमार जगताप

नानासाहेब पेशव्यांच्या अमदानीत पुण्यात जे ऐश्वर्य खेळत होते, ते पुन्हा कधी दिसले नाही. देशो देशाचे सावकार पुण्यास एकत्र झाले होते. ठिकठिकाणच्या उत्तम जिनसा ,उत्तम हत्ती, उमदे घोडे ,कसबी लोक, राजे, राजवाडे या पुण्य भूमीत एकवटले होते . नाना प्रकारच्या सुवर्ण अलंकारांनी झालेल्या जरीच्या वेलबुट्टीने उन्हात प्रकाशणाऱ्या व भालदार चोपदार यांच्या ललकाऱ्याने रस्त्यास गजबजून टाकणाऱ्या अनेक पालख्या राजमार्गातून फिरत . घोड्यावरून फिरणाऱ्यांची गणतीच न्हवतीं. पुणे शहरावर पेशव्यांचे प्रेम होते . शहराच्या सुधारणेकडे पेशव्यांचे लक्ष असे . मंदिरे, पेठा ,रस्ते, वाडे, हौद, स्मारके हे त्यावेळच्या स्तिथी ची निदर्शक आहेत. सदाशिव पेठेच्या शेजारी दुसरी पेठ बसवून तिला मुलाचे नावावरून "नारायण पेठ "नाव ठेवले . शहरास कूस घालण्याचा कारखाना 1758 मध्ये चालवला. थेऊर, आळंदी, गणेशखिंड या मार्गना झाडे लावली. कात्रज येथे तलाव बांधला. त्याचे काम सन1729 मध्ये सुरू झाले व आठ वर्षांनी पूर्ण झाले . शनिवार वाड्यात पाणी आणले. पुढे 23 वर्षांनी खापरी नळ बदलून दगडी नळ घातला . नाना फडणवीसांनी दुसरा तलाव बांधून सदाशिवपेठेच्या हौदात पाणी आणले.
## पर्वती ##
पुण्य जवळील एका सुंदर टेकडीवर लहानसे देवस्थान होते . त्या ठिकाणाहून दिसणारा रम्य देखावा लक्षात घेऊन नानासाहेब पेशव्यांनी तेथे एक भव्य मंदिर बांधले. त्यात देवदेवेश्वराची स्थापना करून चार कोपऱ्यास चार लहान मंदिरे बाधूंन त्यात देवी, गणपती, सूर्य, विष्णू, यांची स्थापना केली. जुन्या "पर्वताई" ची मूर्ती देवीच्या मंदिरात आहे. या भव्य पंचायतन मंदिरासमोर चौघड्याची इमारत आहे. नानासाहेब पेशव्यांनी त्यावर जवळच एक वाडा सन 1754 मध्ये बांधला . विष्णूचे एक स्वतंत्र मंदिरही बांधले. खालच्या उतारावरची मैदानाची जागा बघून" रामणा" तयार केला. शाहू छत्रपतींच्या पादुका देवदेवेश्वर मंदिरात ठेवल्या. सतत पेशव्यांचे येणे जाणे वाढल्यामुळे शहरातील लोकांच्या बागा पर्वती परिसरात तयार झाल्या . पार्वती पायथ्याजवळ एक ओढा आहे त्याच्या अलीकडे पेशव्यांनी 1755 मध्ये एक तलाव बांधला . "पर्वती " मंदिराचे काम 1747 मध्ये सुरू होऊन 1761 मध्ये संपले. देवदेवेश्वराच्या मुर्त्या 1747 मध्ये तयार झाल्या. पुढे दोनवर्षानी स्थापना झाली . मंदिराच्या काळसास 1761 मध्ये सोने चढवले . तोळे1080.
पर्वती खालील बागेत एक पाळलेल्या प्राण्यांची पशुशाळा होती. त्यात नाना प्रकारचे जनावरे पक्षी, सर्प, मत्स्य, पाळण्यात आले होते. एका इंग्रज अधिकाऱ्याने "मेजर प्राईस" ने ही शाळा पहिली . त्याने तिचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो ,"एक सिंह व गेंडा मला खूप आवडला. ते असे वावरतात जणू काही ते रानात विहार करीत आहेत. त्याचे खाणे व निगा उत्तम रीतीने सांभाळली आहे. हरणे व काळवीट यांचे कळप बाळगले आहेत. या काळविटाना वाद्याच्या सुरावर व नादावर झोपळ्यावर बसून झोके घेण्यास शिकवले होते. सन 1792 सर चार्ल्स मॅलेट यास पेशव्यांनी मुद्दाम हा खेळ दाखवला होता . तो लिहितो," आम्ही 2 वाजता तंबूत येऊन बसलो. समोर दोन झोपाळे होते. त्यावर तीन काळवीट वाद्याच्या सुरावर नाचत झोपळ्यावर बसले . एक खाली सतरंजीवर बसला. वाद्ये बंद झाली. एका नोकराने त्यांना झोके देण्यास सुरुवात केली थोड्या वेळाने मोठ्या काळविटास माळ घालण्यात आली . मग सर्व निघून गेले. पेशवे म्हणाले, " हा खेळ आज सात महिने या जनावरास शिकवण्यात येत आहे ". आशा प्रकारे "हिराबागेमध्ये" मेजवान्या झडत असत. त्या आटोपल्यावर पर्वतीच्या तलावात दारुकाम सोडण्यात येई.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...