विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2020

## विरगावचे दिनकरराव थोरात ##






## विरगावचे दिनकरराव थोरात ##

postsaambhar :डॉ उदयकुमार जगताप

हे घराणे विरगाव ,
तालुका- अकोला ,
जिल्हा -अहमदनगर
या ठिकाणी आहे.
या घराण्याचा मूळ पुरुष या गावी
सन1261 मध्ये आला.
असे कागदपत्रानुसार आढळून येते .
त्यांना" दिनकरराव" ही पदवी छत्रपतींच्या काळात मिळाली .
या घराण्यातील अनेक लोकांनी स्वराज्याची मनोभावे सेवा केली आहे .
या घराण्यातील "शकोजीराव थोरात "हा सरदार छत्रपतींच्या पदरी होता.
त्याने युद्धात केलेल्या अचाट पराक्रमाने आनंदित होऊन छत्रपतींनी त्यांना "दिनकरराव" पद देऊन नवलक्षांच्या सनदा करून दिल्या.
त्यांच्या घराण्यात 1851 पूर्वी पाचव्या पिढीपासून दिनकरराव अशी पदवी लिहिण्याचा प्रघात होता .

## चौधरी ##

या घराण्याकडे पूर्वी तोफखान्याची चौधीरकी होती .
नारायणराव पेशवे नंतर दादासाहेब पेशवे पुण्याहून स्वारीस निघाले असता "रुपराम चौधरी "यांचेकडे रथखाना व तोफखाना होता.
सांगोला येथे त्र्यंबकराव फौज घेऊन पेशव्यांच्या पाठीस लागले.
सांगोला येथे घनघोर युद्ध झाले.
त्यात "रुपराम चौधरी" यांनी तलवार चांगली चालवली
व त्र्यंबकराव यांच्या पाडाव केला .
पेशवे यांचे बरोबर रुपराम चौधरी सुरतेस गेले .
कोपरगावी पेशवे यांचा काळ झाला.
त्यांचे बरोबर रुपराम चौधरी होते.
माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत रुपराम चौधरी यांचेकडे पाचशे लोक कवायती कुडतीवले होते .
पुढे बदामाची लढाई झाली .
बदामी किल्ला सर केला.
त्यात चौधरी लोकांनी तलवार चांगली चालवली.
हे पेशव्यांच्या लक्षात आल्यावर आणखी सहाशे लोक चौधाऱ्यांकडे वाढवले .
व त्याचा दरमहा वाढवला .
पुढे श्रीरंगपट्टणम येथे स्वारी करण्यात आली.
त्यावेळेस चौधरी यांचे बरोबर सुमारे दोन हजार लोक पाठवण्यात आले .
या दरम्यान दुष्काळ पडला.
परंतु चौधरी यांनी कोकणातून अन्नधान्याचा पुरवठा केला.
फेब्रुवारी-मार्च 1795 मध्ये खर्ड्याची लढाई झाली .
त्यामध्ये चौधरी अग्रभागी होते .
चौधरी यांनी पराक्रमाची शर्थ केली .
तलवार चालवून मर्दुमकी गाजवली.
माधवराव पेशवे यांचा काल झाल्यानंतर बाजीराव पेशवे याना जुन्नरहून आणण्यासाठी परशुरामभाऊ पटवर्धन यांचे बरोबर चौधरी होते .
बाजीराव यांनी पेशव्यांच्याकडे राहून स्वराज्यासाठी अविरत कष्ट व लढाया केल्या.
हे जाणून बाजीराव याने चौधरी यांच्या कडे एक पलटण कायमची ठेवून दिली.
तोफखान्यांचे काम शंभर स्वार व पलटण असा सारा सरंजाम चौधरी यांचेकडे होता .
खान्देशात झालेली त्याकाळची बंड मोडून काढण्यात चौधरी याना यश आले.
"त्रिंबक किल्ला" सर होऊन "कोरीगड" ताब्यात घेण्यासाठी आदेश होताच त्यावर चढाई करून तो ताब्यात घेतला.
दररोज तोफा चालल्या होत्या.
पलीकडचे दोन अडीच हजार लोक पडले .
चौधरी यांचे जवळपास दोन अडीचशे लोक जखमी झाले काही मेले.
किल्ला अखेर सर केला .
चार महिने चौधरी किल्ल्यावर राहिले.
पुढे विंचूरकर व चौधरी याना कर्नाटक स्वारीवर बंदोबस्तास पाठवण्यात आले .
लढाई करून मोगलांना हद्दपार केले.
पुढे सिहगड ,त्र्यम्बक,पुरंदर कोरीगड व आणखी पाच गड चौधरी यांचे हवाली केले .
गायलगड स्वारी, खान्देशात भिल्लांचा बंदोबस्त यात चौधरी यांनी दोनवर्षं अविरत श्रम घेतले.
त्यानंतर त्यांनी पेशवे याना कळवले की
"माझी तबियत बेआराम झाली ,
माझ्याकडून सोडचिठ्या घ्याव्यात,
माझ्या तब्बेतीचा भरवसा नाही ."
पेशवे यांनी कळविले," घाबरू नये.
तुम्हास उतार पडेल."
त्यावर चौधरी यांनी कळविले," मला भरवसा पुरत नाही.
सोडचिठ्या घ्यावा.
किल्ले हवाली करून घ्यावे.
पुढे आठ दिवसांनी चौधरी मृत्यू पावले .अशारितीने चौधरी कुळाने स्वराज्याची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली आहे.
.सदरचे चौधरी हे
चास तर्फ
खेडसुभा,
पुणे हा या गावचे सरंजामदार होते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...