विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 20 July 2020

##मराठे आणि राजपूत ##



##मराठे आणि राजपूत ##

postsaambhar : Udaykumar Jagtap

मराठे आणि राजपूत हे दोन्हीं आर्यवंशीय क्षत्रिय आहेत . महाराष्ट्रात आर्यानी वस्ती पाणिनी नंतर आणि कात्यायनी पूर्वी म्हणजे इ. स .न.८०० नंतर आणि इ.स.पु ३०० च्या अगोदर केली.
बुद्धाच्या काळी म्हणजे इ.स.पु. ५०० च्या सुमारास महाराष्ट्रात आर्यानी वसती केली .हे आर्य मुख्यत्वे चंद्रवंशी होते. आर्य हे द्रविड मिश्रित प्रारंभी पासून आहेत
.प्रथम आलेल्या नागकन्योत्पन्न चंद्रवंशी आर्यानी रट्ट हि संज्ञा दिली . हा शब्द राष्ट्र वरून निघालेला आहे . राजा अशोकाच्या शिलालेखात पैठणच्या रट्टांचा उल्लेख येतो .
आंध्रभृत्यानी याना जिंकून राज्य स्थापिले . मराठे क्षत्रियांनी आपले राज्य पुन्हा प्रस्थापित केले त्यात त्रैकूट होते याच राष्ट्रकूटांना जिंकून चालुक्यांनी आपली सत्ता स्थापन केली .
चालुक्य हे आयोध्येकडील क्षत्रिय मानव्य गोत्री होते . उत्तरेकडील क्षत्रिय येऊन वेळोवेळी दक्षिणेत येवूंन राज्य स्थापित असल्याचे दिसूनयेत आहे . दक्षिणेतील अस्सल मराठे व उत्तरेतील राजपूत यांचे शरीरसंबंध होऊन एकीकरण झाल्याचे दिसत आहे .
क्षत्रिय हे भिन्न आहेत असा समज सन १२०० पर्यंत प्रचलित न्हवता . दक्षीणेतील मराठे राज्यांच्या मुली राजपूत घराण्यात जात वा तिकडच्या मुली इकडच्या घराण्यात येत .
या चालुक्याना जिंकून राष्ट्रकुटांच्या आपले राज्य स्थापले . हे मालखेडचे राष्ट्रकूट फारच शक्तिमान होते . त्यांनी उत्तरेस स्वाऱ्या करून कनोजही जिंकले
यांच्यानंतर पुन्हा चालुक्य घराणे उत्कर्ष पाऊन कल्याणचे उत्तर चालुक्य घराण्याने २०० वर्ष राज्य केले. यानंतर देवगिरीचे यादव यांनी महाराष्ट्रावर राज्य केले.
५०० पासून १३०० पर्यंत सुमारे ८०० वर्षात चालुक्य ,राष्टकूट, हैहय, शिलाहार कदम यादव इत्यादी राजकन्या आल्या व इकडील कन्या राजपुतांनी केल्या .
मराठे राजवंश व राजपूत राजवंश यात विवाह संबंध याप्रमाणे होत . राजघराण्यातील संबंध १२०० च्या सुमारास निषिद्ध मनू लागले .
याचे कारण सन ११०० नंतर सर्वचहिंदूंच्या सर्वच वर्णात पोटजाती उत्पन्न झाल्या . मग राजपूत ,मराठे व इतर क्षत्रिय अशा तीन जाती पडू लागल्या . याचे मुख्य कारण चालीरीती व प्रत्येक जण दूरच्या कुळास हिनं समजू लागला .
सन १३०० नंतर राजकुलातील शरीरसंबंध मराठे व राजपूत यांच्यात बंद पडले .
राजपुतांनी आपली ३६ कुळे सन ११०० मध्ये निश्चित केली . याच न्यायाने यानंतर मराठ्यांनी आपली ९६ कुळे परिगणित केली
९६ कुळांचे मराठे व इतर मराठे निराळे असा महाराष्ट्रातही भेद पडला . उत्तरेतील काही राजपूत कुळे मुसलमानी आमदानीत महाराष्ट्रातील मराठ्यांच्यात येउन स्थायिक झालेली दिसतात .
भोसले हे शेवटचे असावेत . त्यापूर्वी निंबाळकर आले आहेत . पवार ,यादव ,रटकूटे ,चाळके हे खूप जुने राजपूत महाराष्ट्रात आलेले आहेत .
कराड चे " डुबल " हे भारद्वाजी चालुक्य होत . सन १३२० पूर्वी मराठे राजपूत यांच्यात भेदभाव न्हवता .
त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार होत होते हे दिसून येते
. वंश -------मराठयांत तीन वंश मानतात सूर्य चंद्र व शेष राजपुतांतही तीन मानतात सूर्य चंद्र अग्नी सोळंखी हे कुल राजपुतांतील चालुक्य सोमवंशी आहेत त्याच प्रमाणे परमार व चव्हाण हे सूर्यवंशी आहेत . व यादीतील माहिती हि परंपरेची आहे काल्पनिक नाही .
गोत्र ----------- प्राचीन निश्चित परंपरागत वंशप्रमाणे गोत्र हि एक प्राचीन महत्वाची बाब आहे . राजपूत यादवांप्रमाणंच जाधवांचे गोत्र आत्रि आहे .हि पूर्वीच्या शिलालेखांतून आली आहेत , व तीच अद्याप कायम आहेत . सोळंखीचें भारद्वाज ,पवारांचे वशिष्ठ ,चव्हाणांचे वत्स ,तवरांचे आत्रि ,भोसल्यांचे गोत्र कौशिक हे नवीन आहे कारण ते शिसोदे आहेत . भोसल्यानी महाराष्ट्रात आल्यावर नवीन पुरोहित मानले तेंव्हा त्यांचे गोत्र बदलले असावे .
गादी ---------- गोत्रानंतर महत्वाचे म्हणजे गादी होय हि मूळची सर्व राजकुळे आहेत. ती मूळची कोठून आली हे यात नमूद केलेले असते . यात बराच इतिहास भरलेला असतो .
जाधवांची गादी देवगिरी , भोसल्यांची चितोडगड, पवारांची धार ,चव्हाणांची रणथंबोर ,तवरांची हस्तिनापूर ,हि कुळे निःसंशय राजपूत असून ती त्या ठिकाणावरून आली असावीत
गादी देण्याचा हेतू हि सर्व कुळे राज्य राज्य करणारांची आहेत हे दाखवण्याचा हेतू असतो .
९६कुळी मराठे हे प्रत्यक्ष राज्य करणाऱ्यांचे निदान मांडलिक राज्य करणाऱ्यांचे वंशज आणि इतर सामान्य मराठे असा भेद पडलेला दिसतो
. हे राज्य न करणारे मराठे क्षत्रिय सुद्धा क्षत्रिय असल्याने आपल्यास राजे हे पद घेत असत .
निशाण ---------- हा राज्यवाचक आहे गादी बरोबर निशाण कोणत्या रंगाचे वं चिन्हाचे आहे हि माहिती यातून मिळते . प्रत्येक राज्याचे चिन्ह वेगवेगळे होते . पवारांच्या लाल निशाणावर हनुमान ,मोरे च्या निशाणावर मोर,मानेंच्या निशाणावर गरुड आहे भोसलेंचे निशाण भगवे आहे
देवक -----------लग्नाच्या वेळेस प्रत्येक कुळातील काही विशिष्ठ वस्तू देवात ठेवून तिची पूजा करायची अशी चाल मराठ्यांच्यात आहे .
देवकाचा उपयोग हा गोत्र सारखा लग्न ठरवताना उपयोगी येतो . एकाच गोत्रात मुलगी देवयाची नाही असा नियम आहे
तसाच एकाच देवकात मुलगी देता येणार नाही असा नियम मराठ्यांच्यात दिसून येतो . परंतु हल्ली बर्याचजणांची देवके बदललेली दिसतात .
स्वतःच्या कुळात मुलगी देऊ नये यासाठी हि योजना पूर्वी केली होती
.
वेद -----------जाधव यांचा वेद सामवेद आहे . पवार ,गायकवाड , चव्हाण यांचा ऋग्वेद
ब्राह्मणाप्रमाणेच मराठयांतही ऋग्वेद ,यजुर्वेद वगैरे भेद आहेत . वेद हे गोत्राप्रमाणंच मुळापासूनच असावेत असे वाटते .
चारी वेद ब्राम्हण क्षत्रिय यांनी पठण करावेत असा पूर्वी नियम होता . पण चार वेद पठाण करणे कठीण म्हणून प्रत्येक कुळाने नंतर आपल्या पठणाचा व विधीचा वेद ठरविला व त्या प्रमाणे शेकडो वर्ष परिपाठ सुरु ठेवला .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...